सध्या धावपळीच्या जगात अनेकदा आपण आरोग्याकडे लक्ष देत नाही अशात वजन वाढीच्या समस्या अधिक जाणवतात.वजन कमी करण्यासाठी काही लोकं वाट्टेल ते प्रयत्न करतात. जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर आहारतज्ज्ञांनी सांगितेलेले हे पदार्थ तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता.
सध्या सोशल मीडियावर न्युट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी वजन कमी करताना कोणता आहार घ्यावा, याविषयी सविस्तर माहिती सांगितली आहे.
अंजली मुखर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे-
१. बदाम आणि सोया मिल्क
२. सँडविच करताना गव्हाच्या पीठापासून बनवलेला ब्रेड असावा आणि त्याबरोबर चिकन, काकडी, टोमॅटो, चटनी आणि पनीर तुमच्या आवडीनुसार खावेत.
३. एक वाटी मोड आलेले मुग आणि सॅलड
४.मुठभर चणा आणि शेंगदाणे
६.गव्हाच्या भुशापासून पोळी करावी आणि तुम्ही नियमित खाणाऱ्या पोळ्याची संख्या अर्धी करावी.
७. ऑम्लेट खावे.
८. नियमित एक फळ खावं. सफरचंद, संत्री, एक वाटी टरबूज, २० चेरी, इत्यादी.
हेही वाचा : डाएट करताना मॅगी खावी का? वाचा, न्यूट्रिशनिस्ट काय सांगतात…
anjalimukerjee या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही पोस्ट शेअर करण्यात आली असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलेय, “जेव्हा तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करता तेव्हा तुम्ही काय खाता याबरोबरच तुम्ही किती खाता आणि कितीदा खाता, हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे.”
त्या पुढे सांगतात, “मी सांगितलेला आहार दर तीन तासानंतर घ्यावा. त्यामुळे या आठ वरील पर्यायापैकी तुम्ही दररोज सहा पर्याय निवडू शकता.”
अंजली यांच्या या पोस्टवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान टिप्स दिल्या आहेत.” काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारले आहेत.