नियमित चालणे शरीरासाठी उत्तम व्यायाम मानला जातो. चालल्यामुळे कॅलरी बर्न होऊन, वजन कमी होण्यास मदत मिळते. चालणे हा सर्वात सोपा व्यायाम आहे, म्हणून ज्यांना कठीण व्यायाम करणे शक्य नाही किंवा त्यासाठी वेगळा वेळकाढता येत नाही अशा व्यक्ती रोजच्या व्यायामात चालण्याचा समावेश करू शकतात. हृदय आणि रक्तवाहिन्या निरोगी ठेवण्यासाठी दररोज चालणे फायदेशीर ठरू शकते. तसेच चालल्यामुळे अपचनाची समस्या देखील कमी होते. यासह चालण्याचे आणखी कोणते फायदे आहेत जाणून घ्या.

चालल्याने शरीराला मिळणारे फायदे :

diy health benefits of onions what happens your body if yo do not eat onions for a month
आहारात महिनाभर कांद्याचे सेवन न केल्यास शरीरात काय बदल होतील? तज्ज्ञ म्हणाले…
This is what happens when you chew cloves everyday
रोज एक-दोन लवंग चघळल्या तर शरीरावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांकडून जाणून घ्या उत्तर…
bottle gourd halwa for diabetics and heart patients
मधुमेही अन् हृदयरोग्यांसाठी ‘दुधी हलवा’ ठरतो फायदेशीर? डॉक्टर्स नेमके काय सांगतात जाणून घ्या…
Overhydration: This is what happens if you drink too much water What Is Overhydration
सावधान.! जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी ठरते धोकादायक; वजनानुसार दररोज किती पाणी प्यावे?

आणखी वाचा : पायांच्या स्नायूंमध्ये सतत वेदना जाणवतात का? ‘हे’ सोपे उपाय करून पाहा लगेच जाणवेल फरक

  • कॅलरी बर्न : चालल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास मदत मिळते. तुम्ही नेहमीच्या गतीने चाललात तर याचा परिणाम दिसणार नाही, याएवजी वेगाने चालण्याचा प्रयत्न करा.
  • स्नायू मजबुत होतात : चालल्यामुळे पायांचे स्नायू मजबुत होतात. त्यांना अधिक मजबुत करण्यासाठी जॉगिंग, सायकलिंग असे व्यायाम करू शकता.
  • हृदयाचे आणि रक्तवाहिन्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत मिळते : दररोज ३० मिनिटे चालल्याने हृदयविकाराचा धोका कमी होऊन हृदयाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. तुम्ही जितका जास्त वेळ चालाल तितके हृदयासाठी आणि शरीरासाठी फायदेशीर ठरते.
  • रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते : अमेरिकन डायबेटीज असोसिएशनने प्रकाशित केलेल्या एका अभ्यासानुसार दररोज चालल्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
  • शरीरातील ऊर्जा वाढते : नियमित चालल्याने शरीरातील ऊर्जा वाढण्यास मदत होते. जर तुम्ही थकलेले असाल तर चालल्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होऊन तुम्हालाफ्रेश वाटू शकते. कारण चालल्यामुळे ऑक्सीजनचा प्रवाह वाढण्याबरोबर शरीरातील कॉर्टिसोल, एपिनेफ्रिन आणि नॉरपेनेफ्रिन या एनर्जी हॉरमॉन्सची पातळी वाढते.