Benefits of amla water: आवळा हे एक फळ आहे, जे भारतात शतकानुशतके त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखले जाते. ते केवळ आयुर्वेदिक औषधांचा एक महत्त्वाचा भाग राहिलेले नाही तर ते पोषक तत्वांनी समृद्ध असलेले सुपरफूड म्हणूनदेखील ओळखले जाते. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, रोगांशी लढण्यासाठी आणि एकूण आरोग्य सुधारण्यासाठी लोक बऱ्याच काळापासून आवळ्याचं सेवन करत आलेले आहेत. त्याला इंडियन गुसबेरी असेही म्हणतात. हे फळ इतके पौष्टिक आहे की आजच्या काळातही त्याची मागणी सतत वाढत आहे. काही लोकांना आवळ्याची चव तुरट आणि तिखट वाटते, ज्यामुळे ते खाणे थोडे कठीण होते.

अशा परिस्थितीत आवळा पाण्यात उकळून किंवा त्याचा रस बनवून प्यायल्यास तो चवीला हलका होतो आणि शरीराला अनेक जबरदस्त फायदेही मिळतात. आयुर्वेदिकतज्ज्ञ आणि योगगुरू बाबा रामदेव यांच्या मते, आवळा खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते. हे फळ रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते. ते त्वचा आणि केसांचा रंग सुधारते. आवळा यकृताचे आरोग्यदेखील सुधारतो. आवळ्याचे पाणी बनवून तुमच्या रोजच्या आहारात त्याचे सेवन केल्यास तुम्हाला कोणते आरोग्य फायदे मिळू शकतात ते जाणून घेऊयात.

आवळा खाल्ल्याने आयुष्य वाढते

आयुर्वेदात आवळा हे एक रसायन मानले जाते. त्यात असलेले शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि वृद्धत्वविरोधी गुणधर्म शरीराला आतून निरोगी आणि तरुण ठेवतात. दररोज एक आवळा तुमचे वय वाढवतो.

आवळा हा पोटासाठी अमृत आहे

आयुर्वेदात आवळ्याला पोटाचे रक्षक म्हटले जाते, कारण त्याचे गुणधर्म पचनसंस्था मजबूत करण्यापासून ते पोटाच्या अनेक समस्या मुळापासून बरे करण्यापर्यंत परिणाम दर्शवतात. ते पोटासाठी अमृत मानले जाते. आवळ्यामध्ये असलेले फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स पचनसंस्था सुधारतात आणि अन्न लवकर पचण्यास मदत करतात. ते पोटातील आम्लता नियंत्रित करते. पोटातील सगळी घाण एकाच दिवसात बाहेर पडायलाही या पाण्यानं मदत होते. ते सेवन केल्याने पोटातील वायू, आम्लता आणि छातीत जळजळ यापासून आराम मिळतो.

रक्ताची कमतरता भरून काढते

नियमित आवळ्याचे सेवन शरीरात हिमोग्लोबिन तयार होण्याच्या प्रक्रियेस सक्रिय करते, ज्यामुळे रक्ताचे प्रमाण आणि गुणवत्ता सुधारते. दररोज एक आवळा खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. आवळ्याचे पाणी प्यायल्याने अशक्तपणामुळे होणारा थकवा, चक्कर येणे आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारख्या समस्या हळूहळू कमी होऊ लागतात.

आवळा मधुमेह नियंत्रित करतो

अनेक संशोधनात हे सिद्ध झाले आहे की ज्या लोकांना रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त आहे त्यांनी दररोज आवळ्याचे पाणी प्यायल्यास त्यांना फायदा होतो. हे पाणी रक्तातील साखरेचे प्रमाण सहज सामान्य करते.रिकाम्या पोटी आवळ्याचे पाणी पिल्याने साखर नैसर्गिकरित्या सामान्य होते.

घरी आवळ्याचे पाणी कसे बनवायचे

आवळ्याचे पाणी बनवण्यासाठी, प्रथम १ ते २ ताजे आवळे घ्या आणि ते चांगले धुवा आणि त्यांचे लहान तुकडे करा. आता हे तुकडे एका ग्लास सामान्य पाण्यात टाका आणि २-३ तास ​​भिजवू द्या.जर तुम्हाला हवे असेल तर ते रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी रिकाम्या पोटी प्या. सकाळी ते गाळून हळूहळू घ्या.