Eating Disorder म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

इटिंग डिसऑर्डरची लक्षणे कशी ओळखायची आणि यावरील उपचार जाणून घ्या.

Eating Disorder म्हणजे काय? जाणून घ्या लक्षणे आणि उपाय
Photo -freepik

शरीर निरोगी राहण्यासाठी आपण योग्य आहार वेळेवर घेणे आवश्यक असते. पण कधी कधी नकळत आपल्या खाण्याच्या सवयी बदलतात आणि आपल्याला असं का होत आहे यामागचे कारण समजत नाही. यालाच इटिंग डिसऑर्डर (Eating Disorder) म्हणतात. इटिंग डिसऑर्डर म्हणजे नेमकं काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडतो. यांची लक्षणे कशी ओळखायची आणि यावर काय उपाय करावा जाणून घेऊया.

खाण्याच्या चुकीच्या सवयी कधी कधी गंभीर मानसिक आजराचे स्वरूप धारण करतात, इटिंग डिसऑर्डर हा यातीलच एक प्रकार आहे. हा आजार महिला, पुरुष कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो. सर्वात जास्त युवा पिढीमध्ये ही समस्या आढळून येते. कारण युवा पिढीला आपण सतत आकर्षक दिसावे असे वाटत असते, त्यामुळे वजन वाढणार नाही याची ते सातत्याने काळजी घेत असतात. इटिंग डिसऑर्डर झालेला व्यक्ती शरीराचा आकार आणि वजन यांचा गरजेपेक्षा जास्त विचार करायला लागतो. यामुळे ते एकतर खूप कमी जेवतात किंवा अतिप्रमाणात जेवतात.

Health Tips : ‘या’ सवयींमुळे तुम्ही होताय लठ्ठपणाचे शिकार; आजच करा बदल

इटिंग डिसऑर्डरचे (Eating Disorder) मुख्यतः तीन प्रकार आहेत.

१. एनोरेक्सिया नर्वोसा (anorexia nervosa)

या प्रकारांमधील व्यक्ती भूक लागल्यानंतर देखील जेवण टाळतात. प्रमाणापेक्षा जास्त व्यायाम करतात ज्यामुळे त्यांचं वजन वेगाने कमी होते. बहुतांश वेळा तरुणी या प्रकाराला बळी पडतात असे निदर्शनास आले आहे. या प्रकारात अशक्तपणा, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, निद्रानाश आणि नैराश्य या समस्यांना सामोरे जावे लागते.

२. बुल्मिया नर्वोसा (Bulimia nervosa)

या प्रकारात पीडित रुग्ण त्यांचे आवडते खाद्यपदार्थ मनसोक्त खातात. पण नंतर मुद्दामून उल्टी करून खाल्लेले अन्न शरीराबाहेर काढतात. जेणेकरून त्यांना खाद्यपदार्थांचा आस्वाद देखील घेता येईल आणि त्यांचे वजन देखील वाढणार नाही. या प्रकारात डिहाइड्रेशन, थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, घसा खवखवणे या समस्यांना सामोरे जावे लागते.

३. बिंज ईटिंग डिसॉर्डर (Binge eating disorder)

या प्रकारामध्ये सतत काहीतरी खाण्याची इच्छा होत राहते. म्हणजेच या प्रकारातील रुग्ण सतत बिस्कीट, वेफर्स असे पदार्थ थोड्या वेळाच्या अंतराने सतत खात राहतो. तणाव, नैराश्य यांमुळे रुग्ण या आजाराचे बळी होतात. या प्रकारात कोलेस्ट्रॉल आणि साखरेचे प्रमाण वाढणे, तसेच वजन वाढणे या समस्यांना सामोरे जावे लागते.

Health Tips : जेवताना पाणी प्यायल्याने वजन वाढते का? जाणून घ्या

लक्षणे

  • जेवणावर कोणतेही नियंत्रण नसणे. म्हणजेच प्रमाणापेक्षा जास्त जेवण करणे किंवा याउलट काहीच न खाणे. त्यामुळे वजन अतिप्रमाणात वाढणे किंवा अतिप्रमाणात कमी होणे.
  • रुग्णाला सतत थकवा जाणवतो. तसेच त्या व्यक्तीची सतत चिडचिड होणे, चक्कर येणे ही देखील लक्षणे दिसू शकतात.
  • शरीराचा आकार आणि वजन याबाबतीत ती व्यक्ती सतत चिंताग्रस्त असते.

उपचार

मानसशास्त्रज्ञ आणि न्यूट्रिशनिस्ट यांच्या सल्ल्याने यावर उपचार केले जातात. तज्ज्ञांच्या सूचनांचे पालन केल्यास यावरील लक्षणे नियंत्रित करता येतील.

(येथे देण्यात आलेली माहिती घरगुती उपचार आणि सामन्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीसाठी तज्ञांचा सल्ला घ्या.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: What is eating disorder know the symptoms and remedies pns

Next Story
Janmashtami 2022 Panchamrut and Sunthavada: कृष्णाचे आवडते पंचामृत आणि सुंठवड्याची पारंपरिक रेसिपी
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी