How To Clean Toilet Mirrors : पावसाळ्यात बाथरूममध्ये घाण साचणे ही तर अगदी सामान्य बाब आहे. त्यामुळे कधी कधी दुर्गंधीची समस्या उद्भवते. कधी कधी जास्त आर्द्रतेमुळे जीवाणू वाढू लागतात, पृष्ठभागावरून पायदेखील घसरतो. तर कधी कधी घाण इतकी वाढते की, ती साफ करणे कठीण होते. अशा परिस्थितीत काही टिप्सच्या मदतीने तुम्ही बाथरूम सहजपणे स्वच्छ करून, पहिल्यासारखे चकचकीत करू शकता.
टाइल्स करा साफ
बाथरूमच्या फरशी आणि भिंतींवरील टाइल्सवर साबण आणि घाणीचा थर साचतो. तो स्वच्छ करण्यासाठी एक बादली कोमट पाणी घ्या आणि त्यात बेकिंग सोडा, व्हिनेगर व लिक्विड डिटर्जंट घाला. आता ब्रश किंवा स्क्रबरच्या मदतीने टाइल्स घासून घ्या. त्यामुळे जमा झालेली घाण लगेच निघून जाईल.
टॉयलेट सीट आणि सिंक स्वच्छ करा
कधी कधी टॉयलेट सीट आणि सिंक खराब होऊन जातात. त्यामुळे दिसायला टॉयलेट सीट आणि सिंक घाणेरडे दिसतात आणि त्यामुळे दुर्गंधीदेखील येऊ लागते. अशा परिस्थितीत तुम्ही टॉयलेट क्लीनर वापरू शकता. सर्वप्रथम टॉयलेट क्लीनर सीटवर लावा आणि १० ते १५ मिनिटे तसेच राहू द्या. आता ब्रशच्या मदतीने घासून घ्या. त्यामुळे डाग निघून जातील आणि वाससुद्धा येणार नाही.
आरसे आणि खिडक्या स्वच्छ करा
गरम पाण्यामुळे बाथरूममधील आरशांवर वाफ जमा होते. तसेच खिडक्यांवर धूळ साचते. ती अस्वच्छता दूर करण्यासाठी व्हिनेगर आणि पाणी समान प्रमाणात मिसळून घ्या आणि ऩंतर ते द्रावण स्प्रे करा. मग पुन्हा मायक्रोफायबर कापडाने ते पुसून टाका. त्यामुळे आरसा लगेच चमकेल.
वेळोवेळी स्वच्छ करीत राहा
आठवड्यातून किमान दोनदा बाथरूम स्वच्छ करा. त्यामुळे टाइल्स, टॉयलेट सीट व ड्रेनेजवर घाण साचणार नाही, ज्यामुळे दुर्गंधीची समस्यादेखील दूर होईल. त्यामुळे जीवाणू आणि जंतूंदेखील कमी होतील. अशा रीतीने नियमितपणे केलेली स्वच्छता बाथरूमला नेहमीच चमकदार ठेवेल.