नवरात्र हा केवळ श्रद्धेचा उत्सव नाही तर संयमाचा आणि आत्मनियंत्रणाचा कालखंड आहे. भारतभर लाखो भक्त हे नऊ दिवस नियमित आहार टाळतात. अल्पकाळ उपवास शरीरासाठी काही फायदेशीर ठरतो; परंतु नऊ दिवस सलग फक्त पाणी पिऊन उपवास गंभीर धोके निर्माण करू शकतो. यात इलेक्ट्रोलाइट्सचा असमतोल, निर्जलीकरण आणि स्नायूंचा क्षय यांचा समावेश होतो.
पारंपरिक नवरात्र आहारामध्ये फळे, दूध, सुकामेवा आणि उपवासातील धान्यांचा समावेश होतो जे शरीराला पोषण पुरवतात आणि आरोग्याची काळजी घेत सणाची अध्यात्मिक भावना जपतात.
नऊ दिवस उपवास केला तर काय होते? विज्ञान काय सांगते? (What happens if you fast for 9 days: Science reveals benefits and risks)
Navratri Fasting :नवरात्रात अनेक जण हलका आहार घेतात, तर काही पूर्ण उपवास (काहीही न खाता उपवास) करण्याचा विचार करतात. धार्मिक दृष्टीने हा शुद्धीकरण, आत्मनियंत्रण आणि भक्तीचा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. पण विज्ञानाच्या नजरेतून पाहिल्यास अल्पकाळाचा हा उपवास (१२–२४ तास) इन्सुलिन संवेदनशीलता वाढवतो, फॅट्सचे उर्जेत रुपांतर करण्यासाठी मदत करतो आणि पेशींमध्ये दुरुस्ती प्रक्रिया सक्रिय करतो. तर दीर्घकाळासाठी उपवास (काही दिवस सलग) शरीरामध्ये इलेक्ट्रोलाइट्सचा तुटवडा जाणवतो, रक्तदाब कमी होऊ शकतो, स्नायूंचे नुकसान होऊ शकते आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होते.
यावर सुरक्षित पर्याय हाच आहे की उपवसादरम्यान फळे, दूध, नारळपाणी आणि भगर यांसारख्या उपवासाची धान्याचा आहारात समावेश करावा जेणेकरून शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीरात पाण्याची पातळी राखली जाते. विशेषत: मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला न घेता सलग नऊ दिवस फक्त पाणी पिऊन उपवास करणे टाळावे.
नवरात्र उपवास – दिवस १ ते ३ : (Navratri fasting days 1–3)
पहिल्या तीन दिवसांत बहुतेकजण फळे, दूध आणि हलका उपवासाचा आहार घेतात. मात्र जर कोणी फक्त पाणी पिऊन उपवास करण्याचा प्रयत्न केला, तर २४ तासांत यकृतातील ग्लायकोजेन (साठवलेली साखर) संपते. त्यानंतर शरीर ऊर्जा मिळवण्यासाठी फॅट्सकडे वळते आणि केटोन तयार करते.
तिसऱ्या दिवशी उपवासाची प्रक्रिया पूर्ण जोमात असते. Nature Metabolism मधील अभ्यासानुसार, उपवासामुळे रक्तातील ३०% हून अधिक प्रथिनांमध्ये बदल होतो. यामुळे ऊर्जा वापर, रोगप्रतिकारक शक्ती आणि दुरुस्ती प्रक्रिया नव्याने आकार घेतात. आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा टप्पा “शुद्धीकरण काळ” म्हणून पाहिला जातो; तर जैविक दृष्टीने शरीर सर्व्हायवल सिस्टीम (जगण्याची व्यवस्था) म्हणून कार्यरत होते.
नवरात्र उपवास – दिवस ४ ते ६ (Navratri Fasting – Days 4 to 6)
उपवास पुढे सुरू राहिल्यास शरीरात केटोन हे प्रमुख ऊर्जा स्त्रोत बनतात. या काळात हार्मोन्समध्ये बदल दिसतो, इन्सुलिन, लेप्टिन आणि IGF-1 कमी होतात, तर कॉर्टिसोल (ताण हार्मोन) वाढतो. सात दिवसांच्या पाण्याच्या उपवासावरील संशोधनात आढळले की,”स्नायूंची ताकद टिकून राहते, पण सहनशक्ती १५–१६% नी घटते.”
नवरात्रात फळे आणि दूध घेणारे लोकांना या टप्प्यावर थोडे अशक्त किंवा कमी ऊर्जा जाणवतात, पण दैनंदिन कामे पार पाडू शकतात. मात्र फक्त फक्त पाणी पिऊन उपवास करणार्यांना इलेक्ट्रोलाइट्सचा असमतोल होतो, भोवळ येते, थकवा जाणवतो आणि अशक्तपणा जाणवतो.
नवरात्र उपवास – दिवस ७ ते ९ (Navratri Fasting – Days 7 to 9)
नवरात्राचा शेवटचा टप्पा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सर्वात शक्तिशाली मानला जातो; विशेषतः जेव्हा सलग नऊ दिवस अन्न खात नाही तेव्हा शरीराच्या दृष्टीने हा सर्वात धोकादायक ठरू शकतो. ८–१० दिवसांच्या उपवासावर झालेल्या अभ्यासात दिसून आले की या काळात ग्रोथ हार्मोन्स झपाट्याने कमी होतात, कॉर्टिसोल वाढतो आणि स्नायूंसह अवयवांतील प्रथिनांचा अधिक तुटवडा होतो.
नवव्या दिवशी संभाव्य धोके(Possible Risk on the ninth day:)
- इलेक्ट्रोलाइट्सचा असमतोल, ज्याचा हृदयाच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो
- रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, त्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो
- रक्तदाब घटणे आणि बेशुद्धी येणे
- उपवासानंतर अचानक जड जेवण घेतल्यास शरीराला धक्का बसू शकतो
पारंपरिक नवरात्र उपवासाचे फायदे (Benefits of traditional Navratri fasting)
- फळे, दूध, सुकेमेवे आणि हलका शाकाहारी आहार घेऊन पारंपरिक पद्धतीने उपवास केला तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात:
- पचण्यास जड कार्बोहायड्रेट्स टाळल्याने पचन सुधारते
- वजन नियंत्रणास मदत होते
- रक्तातील साखरेच्या चढउतारांवर नियंत्रण राहते
- मानसिक एकाग्रता व शांतता लाभते
- भक्तीभाव जोपासत शरीराला पोषण मिळते.
अत्यंत कठोर (फक्त पाण्याचा) नऊ दिवस उपवासाचे धोके ( The Risk of a very strict (water only) nine-day fast)
- गंभीर पोषणतूट आणि अशक्तपणा
- स्नायू व अवयवांचे नुकसान
- इलेक्ट्रोलाइट्स कमी झाल्याने हृदयाच्या ठोक्यांमध्ये बिघाड
- उपवासानंतर चुकीच्या पद्धतीने जेवण घेतल्यास जीवघेणे परिणाम
निष्कर्ष : संतुलित उपवासच सुरक्षित (Conclusion: Balanced fasting is safe)
नवरात्र उपवास हा भक्ती आणि संयम यांचा सुंदर संगम आहे. विज्ञानही मान्य करते की,अल्पकाळ उपवास मेटाबॉलिझम सुधारतो आणि पेशींची दुरुस्ती करतो. मात्र, सलग नऊ दिवस पूर्ण अन्नत्याग धोकादायक ठरतो.
सर्वात आरोग्यदायी मार्ग कोणता?(What is the healthiest way?)
फळे, दूध, सुकेमेवे आणि हलके शाकाहारी पदार्थ यांचा पारंपरिक उपवास आहार.
यामुळे भक्तीभावही टिकतो आणि शरीरालाही आवश्यक पोषण मिळते.