गोदरेज इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे अध्‍यक्ष व व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. नादिर गोदरेज यांनी भारतातील पाककला क्षेत्रातील दिग्‍गजांच्‍या उपस्थितीत गोदरेजच्‍या फूड ट्रेण्‍ड्स अहवालाच्‍या पाचव्‍या पर्वाचे अनावरण केले. २०१८ मध्‍ये वार्षिक उपक्रम म्‍हणून सुरू करण्‍यात आलेल्‍या ‘गोदरेज फूड्स ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ – कलेक्‍टर्स एडिशन’मध्‍ये २०० हून अधिक विचारवंत एकत्र आले, ज्‍यामध्‍ये सेलिब्रिटी शेफ्स, घरगुती शेफ्स, व्‍यावसायिक शेफ्स, फूड ब्‍लॉगर्स, आरोग्‍य व्‍यावसायिक, मीडिया व्‍यावसायिक, मिक्सोलॉजिस्ट, पोषणतज्ञ, रेस्टॉरटर्स, सॉमेलियर्स, अन्‍न उत्पादक अशा व्‍यक्‍तींचा समावेश होता, ज्‍यांनी त्‍यांच्‍या संबंधित क्षेत्रांमधील कौशल्‍याबाबत सखोल माहिती सांगितली.

काय सांगतो रिपोर्ट?

  • संस्‍कृतीचा पुन्‍हा शोध- ५५.६ टक्‍के पाककला पॅनलचा व्‍यक्‍तींमध्‍ये आहाराच्‍या माध्‍यमातून मूळ संस्‍कृतीचा पुन्‍हा शोध घेण्‍याचा वाढता कल असण्‍याचा अंदाज आहे. याच संदर्भात ५०.८ टक्‍के तज्ञ पॅनलच्‍या मते, पाककला संस्‍कृतींबाबतच्‍या उत्‍सुकतेसह व्‍यक्‍ती त्‍यांच्‍या स्‍वत:च्‍या पाककलांव्‍यतिरिक्‍त इतर पाककलांसह प्रयोग करतील.
  • स्‍नॅकिंग – आरोग्‍याला प्रबळपणे प्राधान्‍य दिले जात असल्‍यामुळे ५५.६ टक्‍के पॅनलचा अंदाज आहे की, मिलेट-आधारित स्‍नॅक्‍सना मागणी असेल.
  • डाइनिंग इन – होम डिलिव्‍हरीमध्‍ये वाढ होण्‍याची शक्‍यता आहे. ८० टक्‍क्‍यांहून अधिक पॅनलचा अंदाज आहे की, ग्राहक विश्‍वसनीय स्रोतांकडून होम-डिलिव्‍हर केल्‍या जाणा-या भोजनावर अवलंबून असतील.
  • डायनिंग आऊट – आरोग्‍यदायी खाद्यपदार्थाच्‍या सेवनाचा रेस्‍टॉरंट मेन्यूमध्‍ये निवड केल्‍या जाणा-या पाककलांवर परिणाम होईल. ५० टकके पॅनलने भारताच्‍या माऊंटन पाककलांची निवड केली, तर ४८.४ टक्‍के पॅनलने ईशान्‍यकडील पाकलांचा अधिक वापर होण्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला.
  • आरोग्‍यदायी स्‍वच्‍छता व जीवनशैली- २०२२ मध्‍ये अन्‍न सुरक्षिततेवर लक्ष केंद्रित केले जाईल. ७०.८ टक्‍के पॅनलने विश्‍वसनीय स्रोतांकडून स्‍वच्‍छ, आरोग्‍यदायी पॅक केलेले मीट व सीफूडच्‍या गरजेला प्राधान्‍य दिले. तर ४५ टक्‍के पॅनलने घरातील कीटक निवारण, स्वच्छता आणि स्वच्छता उत्पादनांचा सक्रिय वापर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.
  • आहारातील मेद(maida)– २०२२ मध्‍ये आहारामधील मेदांचे सेवन व बदल महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय असेल. आमच्‍या ८० टक्‍क्‍यांहून अधिक पॅनलचा कोल्‍ड प्रेस्‍ड अनरिफाइन्‍ड तेलांचा अधिक वापर होण्‍याचा अंदाज आहे. तर ७१ टक्‍के पॅनल गोरमेट प्रि‍मिअम तूपाच्‍या प्रकारांमध्‍ये वाढ होण्‍याचा अंदाज वर्तवला आहे.
  • डेसर्ट्स- ६१.७ टक्‍के पॅनलचा आरोग्‍यदायी डेसर्ट्स घरातील आहार व डायनिंग आऊट मेन्यूमध्‍ये समाविष्‍ट होतील, असा अंदाज आहे. ५७.४ टक्‍के पॅनलचा अंदाज आहे की थोड्या प्रमाणात, नियंत्रितरित्‍या डेसर्ट्स सेवन करण्‍याला प्राधान्‍य मिळेल. भारतीय मिठाईसंदर्भात ४० टक्‍क्‍यांहून अधिक पॅनलने घरातील पारंपारिक, प्रादेशिक भारतीय गोड पदार्थ व मिठाईंप्रती कल वाढण्‍याचा अंदाज वर्तवला आहे आणि ५० टक्‍के पॅनलचा उद्योगामधून गोरमेट मिठाईप्रती (पारंपारिक भारतीय गोड पदार्थांसाठी उच्‍चस्‍तरीय पर्याय) लोकप्रि‍यता वाढण्‍याचा अंदाज आहे.
  • पेये– भारतामध्‍ये गोरमेट इंडियन कॉफीचे प्रमाण वाढले आहे. ७० टक्‍के तज्ञ पॅनलचा २०२२ मध्‍ये नॉन-अल्‍कोहोलिक बेव्‍हरेज सेगमेंटमध्‍ये अव्‍वल प्राधान्‍य गोरमेट इंडियन कॉफीला दिले जाण्‍याचा अंदाज आहे, तर ५० टक्‍क्‍यांहून अधिक पॅनलचा भारतीय मूळ आर्टिसनल कॉफी/चहा ब्रॅण्‍ड्स घरांमध्‍ये लोकप्रि‍य ठरण्‍याचा अंदाज आहे.
  • फूड स्‍टडीज- ५५ टक्‍क्‍यांहून अधिक पॅनलचा अंदाज आहे की, लोक पाककला वारसा दाखवण्‍याला प्राधान्‍य देतील, तर ६४.१ टक्‍के व्‍यावसायिक हॉस्पिटॅलिटी प्रोग्राममधील (उदा. वाइन्‍स, मिक्‍सोलॉजी, ब्रीड्स इत्‍यादींमधील विशेषीकृत) विशेष कौशल्‍यांना दाखवतील.

गोदरेज फूड्स ट्रेण्‍ड्स रिपोर्टबाबत बोलताना गोदरेजच्‍या कार्यकारी संचालक व प्रमुख ब्रॅण्‍ड अधिकारी तान्‍या दुबाश म्‍हणाल्‍या, ”मला गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्टच्‍या २०२२ कलेक्‍टर्स एडिशनला सादर करण्‍याचा आनंद होत आहे. आहार उद्योगामधील सर्वोत्तम विचारवंतांना एकत्र आणण्‍याचा आणि आहार क्षेत्रामध्‍ये उदयास येणा-या ट्रेण्‍ड्सना सहयोगाने ओळखण्‍याचा मनसुबा राहिला आहे.”

(हे ही वाचा: Health Tips: ब्रश न करता पाणी पिणे आरोग्यासाठी खरच फायदेशीर आहे का? जाणून घ्या)

त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”निष्‍पत्तींनुसार वर्ष २०२२ आरोग्‍यदायी सेवनासाठी ओळखले जाईल. उदयास आलेल्‍या काही इतर प्रमुख ट्रेण्‍ड्समधून आपल्‍या मूळ पाककलांचा पुन्‍हा शोध, स्‍थानिकांना पाठिंबा आणि सर्व भारतीय गोष्‍टींचा अभिमान बाळगणे दिसून येते. पारंपारिक आहार यंत्रणा, पाककला पद्धतींमधील अंतर्गत कौशल्‍य आणि आपण सेवन करत असलेल्‍या आहारासोबत सखोल संबंध निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित असेल.”

(हे ही वाचा: Hair Care Tips: केस कधी धुवायचे कसं ओळखायचं? जाणून घ्या)

परफेक्‍ट बाईट कन्‍सल्टिंगच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक आणि गोदरेज फूड्स ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ च्‍या क्‍यूरेटिंग संपादक रूशिना मनशॉ घिडियाल म्‍हणाल्‍या, ”मागील ५ वर्षांपासून गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्टने वर्षानुवर्षे आपली सखोलता, उपस्थिती व दर्जा वाढवला आहे. महामारीमुळे जागतिक आहार उद्योगामध्‍ये मोठा बदल घडून आला. पण ही महामारी राष्‍ट्रीय व जागतिक पातळीवर भारतीय पाककलांसाठी उत्‍साहवर्धक भविष्‍य म्‍हणून उत्‍प्रेरक देखील ठरली. जगभरात भारतीय पाककलांबाबत असलेल्‍या समजामधील बदल त्‍यामधील जटिलता समोर आणत आहे, जे अहवालाच्‍या नवीन जाग‍तिक पुनरावलोकन विभागामध्‍ये दिसून आले.”

(हे ही वाचा: आंबा खाण्याआधी पाण्यात का भिजवावा? जाणून घ्या कारण)

त्‍या पुढे म्‍हणाल्‍या, ”२०२२ हे संपन्‍न पाककला वारसा ओळखण्‍याचे आणि आपल्‍या पाककलांबाबत अभिमान वाढवण्‍याचे वर्ष असेल. आमच्‍या निदर्शनास येत आहे की, पाककला संशोधनाला मोठ्या प्रमाणात प्राधान्‍य दिले जाईल आणि फूड स्‍टडीजवरील नवीन विभागाचा याबाबत माहिती करून घेत अहवाल तयार करण्‍याचा मनसुबा आहे. पण गोदरेज फूड ट्रेण्‍ड्स रिपोर्ट २०२२ च्‍या या कलेक्‍टर्स एडिशनला अत्‍यंत खास बनवणारी बाब म्‍हणजे तुम्‍हाला प्रत्‍येक विभागामध्‍ये दिसण्‍यात येणारी कलिनरी डीप-डाइव्‍ह्सची सिरीज. व्हिज्‍युअल्‍स व माहितीने संपन्‍न या सिरीजमध्‍ये तुम्‍हाला अनेक विषय पाहायला मिळतील, ज्‍यांच्‍याबाबत मागील ५ वर्षांमध्‍ये मोठ्या प्रमाणात चर्चा करण्‍यात आली आहे आणि हे विषय आहेत- राइज ऑफ देसी व्‍हेजीटेबल्‍स, चिकन कंझप्‍शन, इंडियन कॉफी, मिठाई, ट्रेडिशनल किचनवेअर, प्‍लाण्‍ट फॉरवर्ड फूड्स आणि इंडियन फर्मेण्‍ट्स.”