जगातील सर्वाधिक लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉटसअ‍ॅपचे भारतात २० कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. WhatsApp वर अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. यातच व्हॉट्सअॅपनं आपलं एक फिचर अपडेट केलं आहे. या फिचर्समुळे एखादं चॅट कायमचं म्यूट करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. हे फिचर चॅट सेटिंगमध्ये देण्यात आलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हॉट्सअॅप बीटा वर्जनमध्ये या फिचरचं टेस्टिंग करत होतं. आता याला सर्वांसाठी खुलं करण्यात आलं आहे. याची माहिती कंपनीनं ट्विट करत दिली आहे. या फिचरद्वारे एखाद्या चॅटला किंवा चॅट ग्रुपला कायमचं म्यूट करु शकतो. व्हॉट्सअॅपने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, आता व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांना एखादं चॅट कायमचं म्यूट करता येईल. म्यूट चॅट सेटिंग्समध्ये आता तुम्हाला ८ तास, १ आठवडा आणि ऑलवेज असे पर्याय दिसतील. ऑलवेज पर्यायानं ‘1 ईयर’ पर्यायाला रिप्लेस केलं आहे.

एखाद्या चॅटला कायमचं म्यूट करायचं असल्यास तुम्हाला टॉप राइटमधून मेन्यू ऑप्शननमध्ये टॅप करावं लागेल. त्यानंतर म्यूट नोटिफिकेशन्सवर क्लीक करावं लाहेल. इथं तुम्हाला तीन पर्याय दिसतील. यामधून ऑलवेज’ या पर्यायला निवडा. सोबतच अलर्टशिवाय नोटिफिकेशन्स पाहायचे असतील तर शो नोटिफिकेशन्स हा पर्याय निवडा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp officially rolls out always mute option for chats check details nck
First published on: 24-10-2020 at 08:09 IST