नवजात बाळापासून ते अगदी मोठ्यांपर्यंत प्रत्येकासाठी दूध हे पोषक अन्न आहे. नवजात बाळ इतर अन्न खाण्यास सक्षम होईपर्यंत ते दूधावर अवलंबून असते. दुधात ७४ टक्के पाणी आणि उर्वरित भागात एक घन घटक असतात. यात प्रथिने, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, मिनरल्स, फॅटी एॅसिडसचे मुबलक प्रमाणात असते. परंतु आपण जेव्हा दूध उकळून घेतो तेव्हा त्यातील अनेक पौष्टिक मूल्यात अनेक बदल होता. अनेक लोकांचे मत आहे की, दूध उकळल्यानंतर त्यातील अनेक पोषक घटक मरतात ज्यामुळे दुधाची क्लॉलिटी खराब होते. तर कच्च्या दूधात बॅक्टेरिया वेगाने वाढतात ज्यामुळे आजारांचा धोका वाढतो. त्यामुळे आपल्या आरोग्यासाठी कच्चे दूध चांगले की उकळलेले असा प्रश्न पडतो. याच प्रश्नाचे उत्तर आपण यातून जाणून घेऊ.

कच्च्या दूधाचे फायदे

हेल्थलाईनच्या माहितीनुसार, उळकलेल्या दुधापेक्षा कच्च्या दूधात अधिक पौष्टिक घटक असतात. लॅक्टोज, अस्थमा, ऑटोइम्यून आणि एॅलर्जी, दमा, ऑटोइम्यून असलेल्या लोकांसाठी कच्चे दूध फायदेशीर असते. त्यामुळे कच्चे दूध आरोग्यासाठी फायदेशीर नसते हे असे म्हणणे पूर्णपणे चुकीचे आहे.

‘या’ महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका दुप्पट; संशोधनातून खुलासा

कच्च्या दुधाचे तोटे

कच्च्या दुधात भरपूर पोषक तत्वे आणि पाण्याचे प्रमाण जास्त असते. यामुळे ते बॅक्टेरियाच्या संपर्कात फार लवकर येऊ शकते, ज्यामुळे विविध आजारांचा धोका वाढतो. संशोधनानुसार, यामुळेच कच्चे लवकर खराब होते जे नंतर विष बनू शकते. हे दूध प्यायल्याने विविध आजार होऊ शकतात. विशेषत: गर्भवती महिला, लहान मुले, वृद्ध या बॅक्टेरियाच्या संपर्कात आल्याने आजारी पडू शकतात.

उकळलेल्या दूधाचे फायदे

जेव्हा तुम्ही दूध उकळून घेता तेव्हा त्यातील अनेक पोषक घटक बदलतात. दूध उकळल्याने त्यातील प्रोटीन आणि व्हिटामिन्स कमी होऊ लागतात. अशा प्रकारे दूध पिण्याचे फायदे आणि तोटे दोन्ही आहेत. पण जेव्हा आपण दूध उकळून घेतो तेव्हा त्यातील रायबोफ्लेविन घटक मोठ्याप्रमाणात कमी होतो. यातील प्रथिने पचण्याजोगे असतात. परंतु तुम्हाला लहान आणि मध्यम साखळीतील फॅट जास्त प्रमाणात मिळेल. ज्या लोकांना लॅक्टोज इंटॉलरेंस किंवा दुधाची एॅलर्जी आहे, , त्यांना उकळलेल्या दुधाचा त्रास होणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दूध नेमकं कशा पद्धतीने प्यायले पाहिजे?

अनेक संशोधनात असे आढळले की, दूध नेहमी उकळल्यानंतरचं पिणे चांगले. पण उकळताना एक गोष्ट लक्षात ठेवाली पाहिजे, ती म्हणजे दूध नेहमी मंद आचेवर गरम करावे आणि उकळी आल्यानंतर लगेच गॅस बंद करावा. दूध जास्त उकळल्याने त्यातील न्यूट्रिशनल वॅल्यू खूप कमी होते. त्यामुळे दूध वारंवार उकळू नका.