गट हेल्थ म्हणजे आतड्यांचे आरोग्य हे आपल्या शरीराच्या एकूण कार्यप्रणालीशी जोडलेले असते. पचनक्रिया, रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी), मूड, त्वचा आणि मेंदूचे आरोग्य हे सगळं गटच्या संतुलनावर अवलंबून असतं. आतड्याचे आरोग्य चांगली राहिले तर अन्न सहज पचते, पोषक तत्वांचे शोषण योग्य होते आणि पोट हलकं व आरामदायी वाटते. शरीरातील सुमारे ७० % इम्युन पेशी आंतड्यांमध्ये असतात, त्यामुळे आतड्याचे कोणत्याही संसर्ग आणि आजारांपासून संरक्षण करते.

आतड्याला “दुसरा मेंदू” (Second Brain) असंही म्हणतात, कारण ते सेरोटोनिनसारख्या ‘आनंदी हार्मोन्स’चं उत्पादन करते. जर आतड्याचे आरोग्य असंतुलित झाले, तर ताण, चिंताग्रस्तता (Anxiety) आणि नैराश्य (Depression) वाढू शकते. आतड्याचे आरोग्य चांगले असेल तर शरीरातील विषद्रव्ये (Toxins) सहज बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा तेजस्वी आणि केस मजबूत राहतात. आतड्याचे आरोग्य बिघडल्यावर शरीरात दिसणारी काही लक्षणे

  • बद्धकोष्ठता (Constipation) किंवा पोट फुगणे (Bloating)
  • पचनात बिघाड, वायूची समस्या
  • थकवा, कमकूवतपणा आणि उर्जेचा अभाव
  • वारंवार सर्दी-खोकला किंवा संसर्ग
  • त्वचेवर पुरळ किंवा मुरुम
  • मूड स्विंग्स, झोपेचे विकार

“पोटाच्या सगळ्या तक्रारींवर उपाय – ‘स्मार्ट स्नॅकिंग’ची ही सोपी युक्ती!

हार्वर्ड आणि स्टॅनफर्ड प्रशिक्षित गॅस्ट्रोएन्टरॉलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, “आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. अनेक संशोधनांमध्ये हे स्पष्ट झालं आहे की, आतड्याचे आरोग्यावर सर्वाधिक प्रभाव टाकणारा घटक म्हणजे ‘आहार’. फायबर आणि पोषक तत्वांनी भरलेला आहार केवळ आतड्यातील सूक्ष्मजीवांना मदत करतो आणि एकूण आरोग्य सुधारतो.

आतड्याचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वात सोपा आणि प्रभावी मार्ग म्हणजे योग्य स्नॅक्सची निवड करणे. स्नॅकिंगला नेहमी अनहेल्दी सवय समजलं जातं, पण योग्य वेळ आणि योग्य स्नॅक्स निवडल्यास ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

फक्त हे स्नॅक्स खा आणि पचनाच्या सगळ्या समस्या विसरा!”

१. ओट्स खा (oats)

ओट्स फायबरने समृद्ध आहेत. सकाळच्या नाश्त्यात ओट्स खाल्ल्याने दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने होते आणि पचनसंस्था मजबूत राहते. संशोधनानुसार, ओट्समधील फायबर मल मऊ ठेवतो आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतो.

२. टोमॅटो आणि ऑलिव्ह ऑईलचं सॅलड खा (Tomato and Olive oil Salad)

टोमॅटो फायबरचा उत्तम स्रोत आहे, जो आतड्याचे आरोग्य सुधारतो. ऑलिव्ह ऑईलमधील पॉलीफेनॉल्स आणि हेल्दी फॅट्स पचनाशी संबंधित सूज आणि दाह (Inflammation) कमी करतात.

३. बदाम खा पण मर्यादेत (Almonds)

बदामात हेल्दी फॅटी ऍसिड्स आणि पॉलीफेनॉल्स असतात जे गटची सूज कमी करून आतड्यातील सुक्ष्मजीवांचे संतुलित ठेवतात. परंतु त्यात कॅलरीज जास्त असल्याने एक मूठ बादामाचे सेवन पुरेसे आहे.

४. दह्याचा एक वाडगा खा (Yogurt)

दही हे आतड्याचे आरोग्यसाठी सर्वाधिक उपयुक्त फूड मानलं जातं. यात प्रोबायोटिक्स असतात जे चांगल्या बॅक्टेरियांची संख्या वाढवतात. फळे आणि नट्ससह खाल्ल्यास फायबरचे प्रमाण अधिक वाढते.

५. केळं खा – आतड्यासाठी निरोगी स्नॅक (Banana)

केळ्यामध्ये फायबर आणि प्रीबायोटिक्स दोन्ही असतात, जे आतड्याचे आरोग्य सुधारतात. यातलं पोटॅशियम पचनक्रिया सुधारण्यात मदत करतं.

६. पपईचा समावेश करा (Papaya)

पपईमध्ये ‘पपेन’ नावाचं एन्झाइम असतं जे प्रथिनांचे विघटन करून पचनक्रिया सुधारतं. पपईतील फायबर मल मऊ ठेवतो आणि पचनसंस्था शांत ठेवतो.

योग्य स्नॅकिंग सवयीने आतड्याचे आरोग्य, पचनक्रिया आणि एकूण आरोग्य सुधारू शकते. आता स्नॅकिंग करा ‘स्मार्ट’ पद्धतीने — कारण आरोग्यदायी आतडे म्हणजेच आनंदी मन आणि निरोगी शरीर.

Live Updates