Benefits Of Eating With Hands: हाताने जेवणे आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. जेवण्याची ही अगदी सोपी पद्धत आहे. आयुर्वेदानुसार देखील हाताने जेवणे फायदेशीर मानले जाते. जेव्हा आपण पाच बोटांचा वापर करत हाताने जेवतो तेव्हा जल, अग्नि, वायु, आकाश आणि पृथ्वी ही पंचतत्त्व जागृत होतात. यामुळे जेवणाची चव, सुगंध, टेक्सचर अधिक चांगल्या पद्धतीने समजते. यामुळे मन तृप्त होण्यास मदत मिळते. पण आजकाल चमचा, फोर्क याने जेवण केले जाते, ते अधिक सोपे मानले जाते. पण हाताने जेवण्याचे अनेक फायदे असतात हे बऱ्याच जणांना माहित नसते. कोणते आहेत ते फायदे जाणून घ्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हाताने जेवण्याचे फायदे

आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

रक्ताभिसरण वाढते
हाताने जेवल्याने शरीरातील रक्ताभिसरण योग्य राहण्यास मदत मिळते, यासाठी हा उत्तम व्यायाम मानला जातो. हाताने घास खाताना बोटांचा, सांध्यांचा व्यायाम होतो.

पचन व्यवस्थित होते
आपल्या हातांवर अनेक प्रकारचे बॅक्टेरिया असतात, जे पचनक्रियेसाठी फायदेशीर ठरतात. जेव्हा आपण हाताने जेवतो तेव्हा हे बॅक्टेरिया शरीरात जातात, हे बॅक्टेरिया आपल्याला रोगांपासून दुर ठेवण्यास आणिहानिकारक बॅक्टेरिया पासून पाचन तंत्राचे संरक्षण करण्यासाठी फायदेशीर ठरते.

ओवरइटिंग टाळता येते
हाताने जेवताना आपण हळु हळु जेवतो, त्यामुळे आपल्याला पोट भरल्याचे लगेच जाणवते. यामुळे ओवरइटिंग टाळता येते.

आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा

टाईप २ डायबेटीज टाळता येते
आपण हाताने जेवताना हळु हळु जेवतो तर चमचा किंवा इतर पदार्थाचा वापर केल्यास घाईत जेवण केले जाते. घाईत जेवल्याने अन्नपचन नीट होत नाही, ज्यामुळे रक्तातील साखर अनियंत्रित होण्याची शक्यता असते. असे झाल्यास टाईप २ डायबेटीज होण्याचा धोका वाढतो. म्हणून हे टाळण्यासाठी हाताने जेवण्याचा सल्ला दिला जातो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is it advisable to eat with hands know its amazing benefits for health pns
First published on: 11-01-2023 at 15:03 IST