भारतीय रेल्वे हे जगातील चौथ्या क्रमांकाचे मोठे रेल्वे नेटवर्क आहे. भारतातील बहुतेक लोक रेल्वेने प्रवास करतात. ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला अशा काही गोष्टी पाहायला मिळतात, ज्या आपल्याला माहित नसतात. या गोष्टींमधून आपल्याला रेल्वे स्टेशनपासून ट्रेनपर्यंत बरीच महत्त्वाची माहिती मिळते. अनेकदा आपल्याला या गोष्टी लगेच कळत नाहीत किंवा या गोष्टींसोबत आपल्याला जुळवून घेता येत नसलं तरीही त्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत, जी तुम्ही नक्कीच पाहिली असेल, पण ती तुम्हाला समजली नसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जेव्हाही आपण फिरायला किंवा लांबच्या प्रवासाला ट्रेनने जातो तेव्हा रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर वेगवेगळ्या ठिकाणी असलेले चिन्ह किंवा इतर काही लिहलेले तुम्ही पाहिले असेलच. स्थानकावर असलेल्या मोठ्या पिवळ्या फलकावर ठिकाणाचे नाव लिहिलेले असते. परंतु केवळ स्थानकाचे नावच नाही तर त्याखाली समुद्रसपाटीपासूनची ४०० मीटर, ३१० मीटर, १५० मीटर अशी उंचीही बोर्डवर लिहिलेली तुम्ही पाहिली असेल. पण तुम्ही कधी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का की या फलकावर रेल्वे स्टेशनच्या नावाखाली समुद्रसपाटीपासूनची उंची का लिहिली जाते? याचा अर्थ काय? हे प्रवाशांच्या माहितीसाठी लिहिले आहे की त्यामागे आणखी काही कारण आहे?

Optical Illusion: ‘या’ फोटोमध्ये लपला आहे वाघ; तुम्हाला सापडला का?

रेल्वे स्थानकाच्या नावाच्या फलकाच्या खालच्या भागावर त्या स्थानकापासून समुद्रसपाटीच्या उंचीचा उल्लेख असतो, उदा. MSL 214-42 Mts. वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर ही संख्या वेगळी आहे. तुम्हाला या MSL चा अर्थ माहित आहे का? आज आपण यामागची रंजक कारणे जाणून घेणार आहोत.

देशातील जवळपास सर्वच रेल्वे स्थानकांच्या फलकावर समुद्रसपाटीपासूनची उंची लिहिलेली असते. असे तर सामान्य प्रवाशाला याच्याशी काही देणेघेणे नसते, परंतु कोणत्याही रेल्वे चालक आणि गार्डसाठी हे चिन्ह अत्यंत महत्त्वाचे असते. कारण हे त्या स्थानकावरून जाणाऱ्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित आहे. रेल्वे चालकांना त्यांचे काम चांगले माहीत असले तरी काही प्रोटोकॉल असे असतात की ते अगदी सुरुवातीपासून पाळले जात आहेत.

पाहा व्हिडीओ –

वास्तविक, कोणत्याही रेल्वे स्थानकावरील समुद्रसपाटीपासूनची उंची रेल्वेच्या चालक आणि गार्डला मदत करण्यासाठी नमूद केली जाते. जेणेकरून ट्रेनच्या ड्रायव्हरला हे कळेल की जर आपण उंचीच्या दिशेने जात आहोत तर ट्रेनचा वेग किती ठेवायला हवा. त्याचबरोबर गाडीच्या इंजिनला किती पॉवर सप्लाय द्यावा, जेणेकरून ट्रेन सहज उंचीच्या दिशेने जाऊ शकेल. त्याचप्रमाणे रेल्वे जर समुद्रसपाटीच्या खाली जात असेल तर गाडी किती वेगाने पुढे न्यायची, हे सर्व जाणून घेण्यासाठी समुद्रसपाटीची उंची (MSL) लिहिली असते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is sea level altitude shown on railway station name board know the scientific reason behind this pvp
First published on: 19-07-2022 at 13:13 IST