Dubai Flood : संयुक्त अरब अमीरात आणि त्याच्या आसपासच्या वाळंवटात मंगळवारी तुफान पाऊस झाल्याने भीषण पूर आल्याचा प्रकार समोर आला आहे.मुसळधार पावसामुळे दुबईच्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून विमानतळ, रस्ते याठिकाणी पाणीच पाणी झालं आहे. जगातील सर्वात अधुनिक शहरांपैकी एक असलेल्या दुबईमध्ये रत्यावर पाणी वाहू लागल्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे दुबई इंटरनॅशनल एअरपोर्ट देखील बंद करावा लागला. अनेक वाहने रस्त्यांवर अडकून पडले, शॉपिंग मॉल पासून ते मेट्रो स्टेशनपर्यंत सगळीकडे पाणी शिरलं. दरम्यान अशा महापुरातही टेस्ला गाडीने आपली कमाल दाखवली आहे. पुराच्या प्रचंड पाण्यातही या गाडीने आपल्या मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्ण सिस्टिममुळे प्रवास सुरूच ठेवला आहे. याचा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल..
दुबईतील पुराच्या परिस्थितीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातीलच एक टेस्ला कारचा व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, अख्ख शहर पुराच्या पाण्याखाली गेलं आहे. यावेळी मॉल, दुकानं, घरं रस्त्यावरील गाड्याही या पुराखाली गेल्या आहेत. दरम्यान या महापुरातही टेस्ला गाडीनं आपली कमाल दाखवली आहे. पुराच्या पाण्यातही कार रस्त्यावर धावते तशी सुसाट धावत आहे. पुराच्या प्रचंड पाण्यातही या गाडीने आपल्या मजबूत आणि वैशिष्ट्यपूर्ण सिस्टिममुळे प्रवास सुरूच ठेवला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> घाटातील २५ सेकंदाचा ‘हा’ VIDEO व्हायरल; यातील ५ सेकंदाचं दृश्य आहे भयंकर, पाहताना जरा जपूनच
वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम
दुबईत अचानक आलेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण होऊन वाहतुकीवर सर्वाधिक परिणाम झाला आहे. रस्ते वाहतूक आणि हवाई वाहतूकही विस्कळीत झाली आहे. दुबई विमानतळाच्या रनवेवर पाणी भरलं आहे. त्यामुळे अनेक विमान उड्डाणेही रद्द करावी लागली आहेत. दुबईला येणारी विमान उड्डाणे वळवण्यात आली आहे. याआधी सोमवारी दुबई पोलिसांनी खराब हवामानाबद्दल लोकांना सावध करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केली होती.