Bad Habits That Can Invite a Heart Attack: आजच्या धावपळीच्या जीवनात हृदयरोग झपाट्याने वाढत आहेत. हृदयविकाराचे झटके आता केवळ वृद्धांपुरते मर्यादित राहिलेले नाहीत तर तरुणांनाही याचा त्रास होत आहे. आपली जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी हृदयरोगाचे सर्वात मोठे कारण बनत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर या वाईट सवयी वेळीच सोडून देणे खूप महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊया हृदयावर भार टाकणार्या आणि हृदय विकाराचा धोका वाढवणाऱ्या १० सवयी
जास्त मीठ खाणे (Eating Too Much Salt)
जास्त प्रमाणात सोडियम सेवन केल्याने रक्तदाब वाढतो. जेव्हा रक्तदाब सतत जास्त राहतो तेव्हा हृदयावर अतिरिक्त ताण येतो. प्रक्रिया केलेले आणि पॅकेज केलेले अन्न, विशेषतः जास्त मीठ असलेले पदार्थ, टाळावेत.
व्यायाम न करणे (Lack of Exercise)
तासन् तास एकाजागी बसून राहणे, शारिरीक हालचाल न करण्यामुळे लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉलची समस्या वाढते. या समस्यांमुळे तीन हृदय विकाराचा धोका वाढतो. रोज कमीत कमी ३० मिनिटे चालल्याने किंवा सौम्य तीव्रतेचा व्यायाम केला पाहिजे.
नाश्ता न करणे (Skipping Breakfast)
सकाळचा नाश्ता हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे जेवण आहे. नाश्त न केल्याने रक्तातील सारखेची पातळी असंतुलित होते ज्यामुळे हृदयावर दबाव येतो आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
अति मद्यपान करणे (Excessive Alcohol Consumption)
जास्त प्रमाणात दारू प्यायल्याने हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात आणि रक्तदाब असंतुलित होऊ शकतो. दीर्घकाळ दारू पिणे हृदयविकाराचे एक प्रमुख कारण बनू शकते.
सतत ताण घेणे (Constant Stress)
सतत ताण घेतल्यास हार्मोनल असंतुलन होते, यामुळे रक्तदाब आणि हृदय गती वाढते, ज्यामुळे दीर्घकाळात हृदयाच्या स्नायू कमकुवत होतात.
कमी झोपणे (Not Getting Enough Sleep)
झोपेचा अभाव किंवा वारंवार झोपेचा व्यत्यय शरीराच्या पुनर्प्राप्ती प्रक्रियेवर परिणाम करतो. झोपेचा अभाव रक्तदाब आणि रक्तातील साखरेची पातळी असंतुलित करतो, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो.
तळलेले अन्न (Eating Fried and Junk Food)
फास्ट फूड, जंक फूड आणि तळलेले पदार्थांमध्ये असलेले ट्रान्स फॅट्स आणि उच्च कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्या ब्लॉक करू शकतात. यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका अनेक वेळा वाढतो.
सिगारेट ओढणे (Smoking Cigarettes)
धूम्रपान हृदयाच्या धमन्या अरुंद करते, ज्यामुळे रक्तप्रवाहात अडथळा येतो. रक्तदाब वाढण्याबरोबरच हृदयरोगाचे हे सर्वात मोठे कारण आहे. धूम्रपान करणार्यांमध्ये हृदयविकाराचा धोका अनेक पटींनी जास्त असतो.
खूप जास्त साखर खाणे (Consuming Too Much Sugar)
साखरेच्या जास्त सेवनामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह होतो. मधुमेह आणि उच्च रक्तातील साखरेचा थेट संबंध हृदयरोगाशी आहे.