Xiaomi RedMi ची आणखी तीन मॉडेल भारतात दाखल

फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि एमआयच्या अधिकृत वेबसाईटवर हे फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. 

शाओमी कंपनी मागच्या काही काळापासून एकाहून एक अपडेटेड व्हर्जनचे फोन लाँच करुन आपल्या ग्राहकांना खुश करत आहे. काही दिवसांपूर्वीच कंपनीने आपले Poco F1 हे मॉडेल लाँच केले. त्यानंतर आता कंपनीने आपले पुढील मॉडेल्स लाँच केली आहेत. यात Redmi 6, Redmi 6A आणि Redmi 6 Pro यांचा समावेश आहे. आज या सेलचे रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. या तिन्ही मॉडेलचे स्पेसिफिकेशन वेगवेगळे असल्याचे कंपनीने सांगितले आहे. फ्लिपकार्ट, अॅमेझॉन आणि एमआयच्या अधिकृत वेबसाईटवर हे फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.

सध्या Redmi 6 ची किंमत ८४०० रुपये असून या फोनमध्ये ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी देण्यात आली आहे. तर ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरीच्या फोनची किंमत १०,५०० रुपये ठेवण्यात आली आहे. याबरोबरच Redmi 6A च्या २ जीबी रॅम आणि १६ जीबी मेमरी असलेल्या फोनची किंमत ६,३०० रुपये आहे. Redmi 6 Pro हा फोन १०,४०० रुपयांना खरेदी करता येणार आहे. यात युजरला ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी मेमरी मिळेल. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी मेमरी असलेला Redmi 6 Pro १३,६०० रुपयांना मिळेल.

जाणून घेऊया फिचर्स 

Redmi 6

सिस्टीम – अँड्रॉईड ८.१ ओरियो

स्क्रीन – ५.४५ इंचाची एचडी प्लस

प्रोसेसर – क्वाड-कोर मीडियाटेक हीलियो ए22

कॅमेरा – १२ आणि ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Redmi 6A

सिस्टीम – अँड्रॉईड ८.१ ओरियो

स्क्रीन – ५.४५ इंचाची एचडी प्लस

प्रोसेसर – २ गिगाहार्टस ऑक्टा कोअर हिलीयो पी २२

कॅमेरा – १३ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Xiaomi Redmi 6 Pro 

स्क्रीन – ५.८४ इंचाची फुल एचडी प्लस डिस्प्ले

प्रोसेसर – ऑक्टा कोअर स्नॅपड्रॅगन ६२५

कॅमेरा – १२ आणि ५ मेगापिक्सलचा रिअर कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Xiaomi redmi 6a redmi 6 redmi 6 pro india launch features and price