अँकलेट्स कसे वापरू?

अँकलेट्स इन फोकस आणण्यासाठी काय करता येईल. ते पायात घातल्यावर छान दिसतात, पण इतर अॅक्सेसरीजप्रमाणे उठून दिसत नाहीत. त्यासाठी काय करता येऊ शकते?

lp5601youthअँकलेट्स इन फोकस आणण्यासाठी काय करता येईल. ते पायात घातल्यावर छान दिसतात, पण इतर अॅक्सेसरीजप्रमाणे उठून दिसत नाहीत. त्यासाठी काय करता येऊ शकते?
– प्रियांका सुर्वे, २१.

पायल, पैंजण यांचे नवीन रूप म्हणजे अँकलेट्स. या दोघांमध्ये असलेला मुख्य फरक म्हणजे पैंजण दोन्ही पायात घातलं जातं आणि अँकलेट एकाच पायात. खरं पहायचं झालं, तर पैंजणांच्या दिसण्यापेक्षा त्यांचा आवाज हा आकर्षणाचा भाग राहिला आहे. पण अँकलेट्सच्या बाबतीत बोलायचं झालं, तर त्यांना घुंगरू असतातच असे नाही. त्यात मुलींना सतत वाजणारे घुंगरू आवडतही नाहीत. त्यामुळे यांचं दिसणं हीच महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे शक्यतो अँकलेट्स घालताना एक गोष्ट लक्षात ठेव की, तुझ्या ड्रेसची लांबी कमी असेल. जेणेकरून अँकलेट फोकसमध्ये येतील . गुडघ्यापर्यंतच्या उंचीच्या वन पीस ड्रेससोबत अँकलेट्स छान दिसतात. यामुळे ड्रेसमध्ये अँकलेट अडकण्याची भीतीही नसते. सध्या एकाच पायात एकाऐवजी दोन किंवा तीन अँकलेट्स घातले जातात. पण असे करताना त्यांच्या आकार आणि साइजचा विचार करणे महत्त्वाचे आहे. एक मोठा अँकलेट आणि दोन छोटी अँकलेट्स घालू शकतेस. किंवा एकाच आकाराची वेगवेगळी अँकलेट्स घालता येतील. सध्या मोठय़ा अँकलेट्सचा ट्रेंड आहे. ‘जय मल्हार’ मालिकेतील म्हाळसा आणि बानूच्या पायात असे मोठे अँकलेट्स आहेत. साडीवर तुला असे अँकलेट्स घालता येतील. डेनिमवरसुद्धा मोठे ऑक्सिडाइज अँकलेट्स चांगले दिसतात.

lp58टिकली आतापर्यंत आऊट ऑफ फॅशन वाटायची. पण ‘पिकू’ चित्रपटामुळे ती परत पाहायला मिळतेय. ट्रेडिशनल लूकवर टिकली शोभून दिसते, पण रोज कॉलेजला जाताना मी कशी टिकली वापरू?
– शुभदा सामंत, १९.

‘आऊट ऑफ फॅशन’ ते ‘इन फॅशन’ झालेल्या काही जुन्या गोष्टींपैकी एक म्हणजे टिकली. ‘पिकू’मध्ये दीपिकाने लावलेल्या टिकलीमुळे ही छोटीशी टिकली पुन्हा ट्रेंडमध्ये आली आहे. त्यामुळे शुभदा तूसुद्धा कॉलेजमध्ये टिकली लावून छान मिरवू शकते. सध्या मोठय़ा टिकल्यांचा ट्रेंड आहे. त्यातही मस्त फ्लोरोसंट रंग आले आहेत. त्यामुळे डेनिमवर छान सफेद किंवा लाइट शेडचे टय़ुनिक्स घातल्यास त्यावर टिकली लावता येईल. कुर्तीवरसुद्धा टिकली छान दिसते. त्यात काळा, नेव्ही अशा डार्क रंगाच्या टिकली वापरून बोल्ड स्टेटमेंट देता येतील. एकाच वेळी छोटय़ा आकाराच्या दोन टिकल्या लावल्यास पण छान दिसतात. फक्त त्यांचे रंग कॉन्ट्रास्ट असतील याची काळजी घे. त्यात खरी गंमत असते. छोटय़ा चमक्या, गोल्डन मणी असलेल्या टिकल्या सध्या फॅशनमध्ये नाहीत. त्यामुळे त्या लग्न किंवा इतर सणांच्या वेळी लावायला राखून ठेव.

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत – response.lokprabha@expressindia.com

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Anklets and bindi

ताज्या बातम्या