lp06 lp01अमोल पवार या तरुण चित्रकाराने जलरंगामध्ये चितारलेले हे निसर्गदृश्य आहे. पावसाळ्यात अनेकदा ढगाआडून सूर्यकिरणे डोकावतात त्यावेळेस ती अशीच मोहक दिसतात. एक काहीसे गूढरंजक असे वातावरण तयार होते. आणि आपण विरुद्ध बाजूस असलो तर अगेन्स्ट द लाईट चित्रण मोहक ठरते. तेच आपल्याला अमोलच्या या चित्रामध्ये नेमक्या पद्धतीने पाहायला मिळते. यातील वातावरण निर्मितीही उत्तम उतरली आहे,अमोलने जेजेमधून आर्ट मास्टर पूर्ण केल्यानंतर पनवेलच्या ऋषिकेश आर्ट कॉलेजमधून आर्ट टीचर्स डिप्लोमा केला. नाशिक, श्रीवर्धन येथे तसेच इतरत्रही झालेल्या अनेक स्पर्धामधून त्याने प्रथम क्रमांक पटकावला आहे. महत्त्वाचे म्हणजे बॉम्बे आर्ट सोसायटी (दोनदा) व आर्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या वार्षिक प्रदर्शनातही त्याने सर्वोत्कृष्ट जलरंग चित्रकाराचा पुरस्कार मिळवला आहे.

lp02तिबेटमधील गार्झे प्रांतामध्ये असलेल्या सेडा लारुंग वूमिंग या बौद्ध मठ प्रशालेचे हे छायाचित्र टिपले आहे, जिंग वेई यांनी. हे छायाचित्र त्यांनी नॅशनल जिओग्राफिकच्या युवर शॉटमध्ये शेअर केले आहे. ही बौद्ध जगतातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्थाच असून यातील घरसदृश वास्तूचा वापर येथे येणारे विद्यार्थी धर्मशाळेप्रमाणे करतात. चित्रचौकटीपासून ते रंगयोजनेपर्यंत सर्वच पातळ्यांवर हे छायाचित्र उत्तम ठरते.

कलाजाणीव
lp04तुम्ही चांगले चित्रकार आहात? चांगले फोटोग्राफर आहात?  मग तुम्ही काढलेलं चित्र, फोटो ‘लोकप्रभा’त प्रसिद्ध व्हायला हवा. कारण समकालीन चित्रकार, फोटोग्राफर्ससाठी ‘लोकप्रभा’ने ‘कलाजाणीव’ हे नवं व्यासपीठ सुरू केलं आहे. पाठवा तर मग तुमच्या कलाकृती तुमच्या माहितीसह..

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

lp05आपण छान दिसावं, परफेक्ट फॅशन करावी, कपडे, शूज, अ‍ॅक्सेसरीज बाबतीत एकदम इन’ असावं असं तुम्हालाही वाटतं ना? पण कधी कधी तुम्हाला काही शंका येतात, प्रश्न पडतात.. त्याबद्दल कुणाला विचारायचं हा प्रश्न असतो. त्यासाठीच आहे, फॅशन-पॅशन