सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com 

मेष चंद्र आणि नेपच्यून या दोन जलतत्त्वाच्या ग्रहांच्या लाभ योगामुळे भावनेच्या भरात एखादा चुकीचा निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात कामाचा वेग मंदावेल. वरिष्ठांचे वर्चस्व वाढेल. सहकारी वर्गाच्या साहाय्याने हाती घेतलेली कामे पूर्ण करण्यासाठी झपाटय़ाने प्रयत्न कराल. जोडीदाराच्या तब्येतीच्या तक्रारींकडे लक्ष द्यावे लागेल.  रागावर नियंत्रण ठेवा. त्याशिवाय सद्य:परिस्थितीचा सामना करणे कठीण! सांधेदुखी तसेच स्नायू आखडणे याचा त्रास होईल.

वृषभ चंद्र-बुधाच्या केंद्र योगामुळे भावना आणि व्यवहार योग्य प्रकारे सांभाळाल. स्वाभिमान जपाल, पण नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचेच मत मान्य करावे लागेल. परिस्थितीला धीराने तोंड द्याल. सहकारी वर्गाकडून आवश्यक ती मदत मिळेल. मित्रपरिवारासह विचारविनिमय करून नवे मार्ग शोधाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या समस्या उद्भवतील. त्याला भावनिक आधाराची गरज भासेल. वादविवाद टाळा. कफ आणि पित्ताचा त्रास झाल्यास औषधोपचार घ्यावेत.

मिथुन बौद्धिक राशीतील चंद्र आणि मंगळाच्या युतियोगामुळे माहिती आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात नव्याने प्रगती कराल. उत्साह वाढेल, पण उतावीळपणा नको. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. अनपेक्षित बदलांना सामोरे जावे लागेल. आर्थिकदृष्टय़ा बळकटी मिळवण्याचा प्रयत्न कराल. जोडीदाराच्या मतांशी सहमत नसलात तरी आपले मत मांडण्याचा अट्टहास नको. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. ज्येष्ठ मंडळींची काळजी घ्यावी लागेल.

कर्क चंद्र-शनीच्या लाभ योगामुळे गतिमान चंद्राला मंदगती शनीची साथ मिळेल. ग्रहणशक्ती वाढेल. नोकरी-व्यवसायात संशोधन कार्यात प्रगती कराल. सहकारी वर्गाकडून उल्लेखनीय कामगिरी पार पडेल.  मित्रांकडून आशादायी बातमी समजेल. समाजोपयोगी कार्यात स्वत:ला झोकून द्याल. जोडीदारासह झालेले समज-गरसमज दूर करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण आनंदी आणि उत्साही ठेवणे आपले कर्तव्य आहे. सांधेदुखी डोके वर काढेल.

सिंह गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे अडचणीच्या काळात मोठय़ा लोकांची मदत मिळेल. जुन्या ओळखी कामी येतील. नोकरी-व्यवसायात  आपल्या जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडाल. सहकारी वर्गाच्या अडचणी समजून घ्याल. कठोर निर्णय घ्यावे लागतील. सरकारी कामे लांबणीवर जातील. जोडीदाराच्या गुणांना वाव न मिळाल्याने त्याची चिडचिड वाढेल. त्याच्या रागावर नियंत्रण ठेवा. प्रसंगाचे गांभीर्य राखाल. रक्ताभिसरणाच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका.

कन्या चंद्र-बुधाच्या लाभ योगामुळे बुद्धीला, विचारांना कृतीची जोड मिळेल. लाभदायक निर्णय अमलात आणाल. नोकरी-व्यवसायात आशेचे किरण दिसतील. कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकारी वर्गाकडून कामे करवून घ्यावी लागतील. जोडीदाराच्या समंजसपणामुळे बरीच कामे सुकर होतील. नवा दृष्टिकोन मिळेल. मुलांच्या समस्या भेडसावतील. कुटुंबातील ताणतणाव प्रयत्नपूर्वक कमी करावा लागेल. मानसिक स्वास्थ्य जपा.

तूळ  चंद्र-नेपच्यूनच्या युती योगामुळे भावनाविवश व्हाल. यातूनच काव्य, लेखन, कलाकृती जन्माला येईल. नोकरी-व्यवसायात कलेच्या क्षेत्रात भरीव योगदान कराल. नव्या संकल्पना मांडाल. सहकारी वर्गाची मदत कराल. जोडीदाराच्या धडाडीच्या कार्याचे कौतुक कराल. समाजकार्यात सहभागी व्हाल. हिमतीने पुढे जाल. मित्रपरिवाराला आपल्या साहाय्याची गरज भासेल. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. जखमेमध्ये पू होऊ देऊ नका. योग्य काळजी घ्या.

वृश्चिक गुरू-चंद्राच्या लाभ योगामुळे कायदेशास्त्रात लाभकारक घटना घडतील. अडचणीतून बाहेर पडाल. ज्येष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. नोकरी-व्यवसायात माहिती व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती कराल.  जोडीदाराच्या व्यावहारिक वृत्तीमुळे अनेक गोष्टी सुलभ साध्य होतील. त्याच्या कलागुणांना वाव मिळेल. व्यवसायात जम बसायला वेळ लागेल. कुटुंबातील वाद शांततेने मिटवावेत. मानसिक ताण वाढल्यामुळे डोकेदुखीला सामोरे जावे लागेल.

धनू  चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढेल. आरोग्यदायी आणि उत्साही वातावरणात आपल्या कामांना गती मिळेल. नव्या दिशेने वाटचाल कराल. पर्यायी व्यवस्था तयार ठेवाल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना राबवाल. सहकारी वर्गाचे थोडेफार साहाय्य मिळेल. जोडीदाराचा कणखरपणा अडचणीच्या वेळी उपयोगी ठरेल. भावनांवर विचारांचा ताबा मिळवणे आवश्यक! खचून न जाता कुटुंबीयांना पािठबा द्याल. खर्चावर नियंत्रण ठेवाल.

मकर रवी-गुरूच्या नवपंचम योगामुळे आशेचे किरण दिसतील. वडीलधाऱ्यांकडून पाठबळ मिळेल. नोकरी-व्यवसायात ओळखीतून कामे मार्गी लागतील. सहकारी वर्गाच्या समस्या समजून घ्याल. मित्रांच्या मदतीची परतफेड कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या योजना आखेल. कुटुंबातील वादाचे मुद्दे बाजूला ठेवून कुटुंब सदस्यांना मदतीचा हात पुढे कराल. पचनासंबंधित विकार बळावतील. औषधापेक्षाही पथ्य व व्यायाम उपयोगी पडेल.

कुंभ चंद्र-हर्षलच्या लाभ योगामुळे अडचणीतून बाहेर पडण्याचा अचानक काही तरी मार्ग सुचेल. नोकरी-व्यवसायात जास्तीत जास्त लोकांच्या फायद्याचा ठरेल असा निर्णय घ्याल. सहकारी वर्गासाठी उल्लेखनीय कामगिरी कराल. जोडीदाराची मन:स्थिती समजून घ्याल. आर्थिक बाजू चांगली सांभाळाल. कुटुंबातील सदस्यांना कठीण परिस्थितीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न कराल. अतिविचारांमुळे डोके दुखणे, महत्त्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होणे असे योग आहेत. प्राणायाम आवश्यक!

मीन रवी-चंद्राच्या लाभ योगामुळे आई-वडिलांच्या कामात मदत कराल. हाती घेतलेल्या कामात यश येईल. नोकरी-व्यवसायात नव्याने विचार मांडून निर्णय घ्याल. सहकारी वर्गाला त्यांचे हक्क मिळवून द्याल. जोडीदाराचा उत्साह आपल्यालाही स्फूर्तिदायक ठरेल. भावंडांना मदतीचा हात द्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. खांदेदुखी किंवा शिर दाबल्यामुळे दुखण्यासह चिडचिडही वाढेल.