15 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जानेवारी २०२०

चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपल्या स्वतंत्र विचारांना पुष्टी मिळेल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-हर्षलच्या युतीयोगामुळे आपल्या स्वतंत्र विचारांना पुष्टी मिळेल. अनोख्या वाटेने प्रवास कराल. नव्या वर्षांचे नवे संकल्प कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. सहकारी वर्गाकडून युक्तीच्या चार गोष्टी शिकायला मिळतील. जोडीदाराचा सहवास आनंददायी ठरेल. कौटुंबिक वातावरण उत्साही ठेवण्याचा प्रयत्न कराल. चिडचिड टाळा. कोरडय़ा हवेमुळे डोळ्यांची जळजळ होईल.

वृषभ शुक्र-चंद्राच्या लाभयोगामुळे मानसिक बळ वाढेल. सौख्य उपभोगाल. दर्जेदार गोष्टींची खरेदी कराल. नोकरी-व्यवसायातील अडचणींवर व्यवहार कुशलतेने मात कराल. वरिष्ठांचे सहाय्य मिळेल. मार्ग काढत पुढे जाल. सहकारी वर्गाला योग्य मार्गदर्शन कराल. जोडीदाराचा मूड सांभाळा. कुटुंबातील सदस्यांना प्रवास योग येईल. हातापायांच्या बोटांची हाडे व सांधे आखडतील आणि दुखतील.

मिथुन रवी-चंद्राच्या केंद्रयोगामुळे प्रतिकाराला सामोरे जावे लागेल. संघर्ष करून कष्टाने लढा द्याल. नोकरी-व्यवसायात विचारपूर्वक निर्णय घ्याल. भावना व विचारांचा समतोल राखाल. सहकारी वर्गाकडून फारशा अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी स्वतच्या हिमतीवर पूर्ण कराल. जोडीदारासह असलेले मतभेद चच्रेने दूर करण्याचा प्रयत्न कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कोरडय़ा त्वचेला भेगा पडून रक्तस्राव होऊ शकतो.

कर्क चंद्र-शुक्राच्या केंद्र योगामुळे कौटुंबिक सौख्य व गृहसौख्य उपभोगाल. कलेचा आस्वाद घ्याल. नव्या वर्षांचे नव्या जोमाने स्वागत कराल. नोकरी-व्यवसायात वातावरण उत्साही असेल. सहकारी वर्ग कामाची पूर्तता वेळेत करेल. त्यांच्या समस्यांवर उपाय सुचवाल. जोडीदारासह मनसोक्त खरेदीचा आनंद लुटाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. रक्तातील साखरेचे प्रमाण ताब्यात ठेवा.

सिंह शनी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे विचार करून निर्णय घ्याल. कष्टाचे चीज होईल. नोकरी-व्यवसायात प्रगतीच्या दिशेने पुढे जाल. सहकारी वर्गाकडून कायद्याच्या संदर्भातील मार्गदर्शन मिळेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याच्या/तिच्या कार्यक्षेत्रात तो/ती भरीव योगदान देईल. नव्या वर्षांचे स्वागत शुभ समाचाराने होईल. उत्सर्जन संस्था व मणक्याचे आरोग्य जपा.

कन्या शनी-चंद्राच्या केंद्र योगामुळे मानसिक स्थिती नाजूक होईल. आत्मविश्वास ढळू देऊ नका. नोकरी-व्यवसायात सहकारी वर्ग पाठीशी खंबीरपणे उभा राहील. वरिष्ठांचे मत मान्य करावे लागेल. मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनांना खंबीरपणे सामोरे जावे लागेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कफ दाडणे, खसा खवखवणे असे त्रास संभवतील. वेळेवर औषधोपचार आवश्यक!

तूळ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे अभ्यासू वृत्तीला जोड मिळेल. विनोद बुद्धीला चालना मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांना आपली बाजू प्रभावीपणे समजावून द्याल. सहकारी वर्गावर नव्या जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदाराची एखादी गोष्ट खटकल्यास सामंजस्याने त्यावर उपाय शोधाल. आप्तेष्टांच्या भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. रक्तातील घटक कमी होतील. वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या प्रतियोगामुळे चंद्राच्या उत्साहाला मंगळाच्या धाडसाची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात आíथक प्रगती कराल. वरिष्ठांच्या मतानुसार पुढे जाऊन आपले हित साधाल. सहकारी वर्गाचा पािठबा मिळेल. जोडीदारासह वेळ आनंदात जाईल. नव्या योजनांसंबंधी एकमेकांसह विचारविनिमय कराल. कौटुंबिक जबाबदारी नेटाने पूर्ण कराल. डोकेदुखी , पित्तविकार यांचा त्रास होईल.

धनू गुरु-चंद्राच्या नवपंचम योगामुळे विद्या व्यासंग जोपासाल. अडचणींवर मात करून योग्य मार्ग निवडाल. नोकरी व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांच्या अनुभवातून काही नवीन गोष्टी शिकायला मिळतील. सहकारी वर्गाचे सहाय्य वेळोवेळी मिळेल. जोडीदाराचे सामथ्र्य वाढेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याच्या शब्दांचा मान वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घशाला इन्फेक्शन होणे, अन्ननलिकेला सूज येणे हे त्रास संभवतात.

मकर चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे साधकबाधक विचारांनी पेचप्रसंगातूनही मार्ग काढाल. त्रासदायक गोष्टींकडे दुर्लक्ष कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन पुरेसे मिळणार नाही. सहकारी वर्गाच्या मदतीने अडचणीतून बाहेर पडाल. एखादवेळेस ‘जशास तसे’ वागून आपले अस्तित्व सिद्ध कराल. जोडीदाराची व कुटुंबाची योग्य साथ मिळेल. राग डोक्यात घालून मानसिक स्वास्थ्य बिघडवू नका.

कुंभ चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे परिस्थितीशी मिळतेजुळते घेऊन आपल्या वागणुकीत योग्य ते बदल कराल. आत्मविश्वास वाढेल. नोकरी व्यवसायात नव्या गोष्टी चटकन आत्मसात कराल. सहकारी वर्गाची मदत कराल. जोडीदाराची प्रगती होईल. पत वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी व उत्साही राहील. सर्दी तापाची लक्षणे दिसल्यास त्वरित औषधोपचार सुरू करावेत.

मीन रवी-नेपच्युनच्या लाभयोगामुळे गरजू व्यक्तींना मदत कराल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेली कामे पूर्ण होण्यास विलंब होईल. सहकारी वर्गाची बाजू व्यवस्थापकांपुढे मांडाल. अन्यायाला वाचा फोडाल. जोडीदार आपल्या कामात व्यस्त असल्याने कुटुंबाची सर्व जबाबदारी आपल्याला पेलावी लागेल. व्यायाम व संतुलित आहारामुळे आरोग्य चांगले राहील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2020 1:01 am

Web Title: astrology 3rd to 9th january 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २७ डिसेंबर २०१९ ते २ जानेवारी २०२०
2 राशिभविष्य : दि. २० ते २६ डिसेंबर
3 राशिभविष्य : दि. १३ ते १९ डिसेंबर २०१९
Just Now!
X