28 February 2021

News Flash

राशिभविष्य : दि. १९ ते २५ फेब्रुवारी २०२१

मनाचा कारक चंद्र आणि आत्मा कारक रवी यांच्या नवपंचम योगामुळे नव्या योजना अंमलात आणाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष मनाचा कारक चंद्र आणि आत्मा कारक रवी यांच्या नवपंचम योगामुळे नव्या योजना अंमलात आणाल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मनाप्रमाणे गोष्टी होईपर्यंत तुमच्या जिवाला स्वस्थता लाभणार नाही. आपल्या कामातील बारकावे सहकारी वर्गाच्या निदर्शनास आणून द्याल. जोडीदाराच्या कामाचे कौतुक होईल. त्याच्या जबाबदाऱ्या उत्तमरीत्या पार पडतील. मुलाबाळांचे प्रश्न मार्गी लागतील. कामाबरोबरच विश्रांतीचीही गरज भासेल.

वृषभ शुक्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे शुक्राच्या कलात्मक दृष्टीला मंगळाची कार्य करण्याची ऊर्जा, त्याचा उत्साह यांची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात सर्जनशीलतेकडे अधिक लक्ष द्याल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. सहकारी वर्गाकडून साहाय्य मिळेल. इतरांच्या वेगवेगळ्या मतांचा शांतपणे विचार कराल. जोडीदाराचे कष्ट सत्कारणी लागतील. त्याच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. वातविकारांचा त्रास झाल्यास औषधोपचार घ्यावा लागेल.

मिथुन चंद्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे भावना आणि मानसिकतेला नवा आकार द्याल. विचारातील लहानसा बदल महत्त्वपूर्ण कामगिरी बजावेल. नोकरी-व्यवसायात अतिदक्षता बाळगावी. अनवधानाने कोणालाही काही कबूल करू नका. सहकारी वर्गाची अरेरावी वाढल्यास त्यांच्यावर योग्य कार्यवाही करावी लागेल. जोडीदार अडचणीतून मार्ग काढत पुढे जाईल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुले आपली कर्तव्ये पार पाडतील. आपल्या कष्टाचे चीज करतील. त्वचाविकार उद्भवतील.

कर्क चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे भावना आणि व्यवहार यांच्यात समतोल राखाल. आपल्या स्मरणशक्तीचा उत्तम उपयोग होईल. नोकरी-व्यवसायातील बारकावे टिपून ठेवाल. दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा स्वत:च्या प्रगतीकडे अधिक लक्ष द्यावे. सहकारी वर्गाची विशेष मदत होईल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याच्या कामात अनेक अडचणी येतील. मुलांच्या बाबतीत प्रगतिकारक गोष्टी घडतील. गुडघे, सांधे यांचे त्रास वाढल्यास वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घ्यावा लागेल.

सिंह चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे कामाचा उरक वाढेल. आपले उत्साही व्यक्तिमत्त्व सर्वाना आकर्षित करेल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाने सर्वावर विशेष छाप पाडाल. सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडाल. जोडीदार स्वत:ची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्न करेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. कौटुंबिक कलह मर्यादेत ठेवा. चर्चा करून मार्ग काढाल. मुलांना आपल्या आधाराची गरज भासेल. मूत्रविकार बळावतील. योग्य पथ्य पाळणे आवश्यक!

कन्या चंद्र-शनीच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या नवनिर्मितीला शनीच्या मेहनतीची, चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात हाती घेतलेले काम पूर्ण करताना अनेक कसोटय़ा पार कराव्या लागतील. वरिष्ठांचा पाठिंबा सहज मिळणे कठीण. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होईल. त्याने त्या संधीचं सोनं करून दाखवावे. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मुलांच्या कामातील अडचणी  चर्चेने दूर कराल. उष्णतेमुळे गळू होऊन त्यात पू होण्याची शक्यता!

तूळ मंगळ आणि प्लुटो या दोन ऊर्जादायी ग्रहांच्या नवपंचम योगामुळे आपला उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा सल्ला मार्गदर्शक ठरेल. आर्थिक बाजू भक्कम होईल. सहकारी वर्गाला मदतीचा हात पुढे कराल. जोडीदाराच्या कामाचा व्याप वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडताना त्याची धावपळ होईल. मुलांचे प्रश्न समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण त्रस्त राहील. नातेवाईकांच्या आरोग्यासंबंधित धावपळ कराल. रक्तातील घटक कमी-अधिक होतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे मनोबलाला शारीरिक ऊर्जेची साथ मिळेल. कामातील उत्साह वाढेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर नव्या जबाबदाऱ्या सोपवतील. त्यांचा विश्वास सार्थ ठरवाल. सहकारी वर्गाला मदत कराल. त्यांची गाऱ्हाणी ऐकून घ्याल. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात पत वाढेल.  कौटुंबिक  स्वास्थ्य जपावे लागेल. नातेवाईकांच्या समस्या चर्चा करूनही सुटणार नाहीत, परंतु गुंतागुंत वाढू देऊ नका. पित्तामुळे त्वचाविकार बळावण्याची शक्यता आहे.

धनू चंद्र आणि नेपच्यून या दोन भावनाप्रधान आणि संवेदनशील ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनिक चंचलता वाढेल. एखाद्या निर्णयावर ठाम राहणे कठीण जाईल. नोकरी-व्यवसायात बोलताना शब्द जपून वापरा. गैरसमज होण्याची शक्यता आहे. सहकारी वर्ग आपणांस सांभाळून घेईल. जोडीदारासह चांगले सूर जुळतील. एकमेकांशी मोकळेपणाने केलेली चर्चा ताण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरेल. मुलांना प्रेमासह शिस्तीचा बडगाही दाखवाल. रक्तदाबाच्या समस्या आटोक्यात ठेवा.

मकर गुरू-चंद्राच्या नवपंचम योगामुळे समाजातील सन्माननीय लोकांच्या ओळखी होतील. त्यांचा सल्ला, मार्गदर्शन लाभदायक ठरेल. नोकरी-व्यवसायात आर्थिक दृष्टीने अधिक सक्षम व्हाल. आपल्या मेहनतीची दखल घेतली जाईल. सहकारी वर्गाकडून वेळेवर काम पूर्ण करून घेतल्याने पुढील निर्णयही अचूक ठरतील. जोडीदाराच्या कामकाजाचा व्याप वाढेल. कौटुंबिक कामे दोघांत वाटून घ्याल. मुलांच्या प्रगतीचा आलेख वर चढेल. वात आणि कफविकार बळावतील.

कुंभ रवी-चंद्राच्या केंद्र योगामुळे हाती घेतलेल्या कामात अधिक अडथळे येतील. मेहनत घेऊन ते दूर करावे लागतील. नोकरी-व्यवसायात सुरू असलेल्या कामावरच अधिक बारकाव्याने लक्ष केंद्रित कराल. सहकारी वर्गाला नुकसानभरपाई द्यावी लागेल. समजुतीने कामे होतील. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात विशेष ठसा उमटवेल. त्याच्या कष्टाचे चीज होईल. कुटुंब सदस्यांच्या हाताला यश येईल. आठवडय़ाच्या शेवटी सर्दी-पडशाचा त्रास संभवतो. काळजी घ्यावी.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या भावना आणि शुक्राची सर्जनशीलता यांचा सुरेख संगम होईल. नव्या क्षेत्रात पदार्पण कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. वेळ काळ पाहून आपला विरोध नोंदवाल. सहकारी वर्गाच्या अडचणींमुळे कामाचा वेग मंदावेल. छोटय़ा कामासाठीदेखील अधिक मेहनत घ्याल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. रक्ताभिसरण व मणक्याच्या तक्रारी डोकं वर काढतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 19, 2021 1:27 pm

Web Title: astrology from 19th to 25th february 2021 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. १२ ते १८ फेब्रुवारी २०२१
2 राशिभविष्य : दि. ५ ते ११ फेब्रुवारी २०२१
3 राशिभविष्य : २९ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२१
Just Now!
X