सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : चंद्र मंगळाच्या नवपंचम योगामुळे चंद्राच्या कुतूहलाला मंगळाच्या ऊर्जेची आणि उत्साहाची जोड मिळेल. संशोधक वृत्तीला पोषक वातावरण मिळेल. आक्रमकतेला आळा घालावा. नोकरी-व्यवसायात विचारांती निर्णय जाहीर करावेत जोडीदाराच्या कलाने घेतल्यास दोघांच्या हिताचे ठरेल. मुलांच्या समस्या समजून घेतल्याने त्यावर उपाय निघेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. तळपायाची आग होईल. वैद्यकीय सल्ला घ्यावा. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

वृषभ : चंद्र मंगळाच्या प्रतियोगामुळे सद्य:स्थितीतही उत्साहाने काम कराल. सामाजिक कार्यात हिरीरीने सहभागी व्हाल. आपले मत उत्स्फूर्तपणे आणि ठामपणे मांडाल. नोकरी-व्यवसायात बौद्धिक पातळीवर अधिक मेहनत घ्यावी लागेल.  जोडीदाराच्या कामातील अडचणींमुळे त्याची चिडचिड होईल. मुलांची कामे मार्गी लागतील. आर्थिक गणिते नव्याने मांडाल. मूत्रविकाराचा जोर वाढेल. संसर्ग होण्याची संभावना आहे. आवश्यकतेनुसार पाणी प्यावे.

मिथुन : शुक्र मंगळाच्या लाभ योगामुळे शुक्राच्या सौंदर्यदृष्टीला, कल्पकतेला मंगळाच्या उत्साहाची जोड मिळेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेत कामाला नव्या जोमाने सुरुवात कराल.  नोकरी-व्यवसायात नातेसंबंध जपाल. वरिष्ठ आपल्या कामाची कदर करतील. सहकारी वर्गाला न्याय मिळवून द्याल. जोडीदाराचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्या. मुलांचे शिक्षण वा कामाच्या बाबतीतील निर्णय योग्य ठरतील. उष्णतेचे विकार बळावतील. औषधोपचार घ्यावेत.

कर्क : भावनांचा कारक  चंद्र आणि व्यवहार सांभाळणारा बुध यांच्या लाभ योगामुळे प्रापंचिक समतोल राखाल. नात्यांची किंमत ओळखून वागाल. नोकरी-व्यवसायात लाभकारक घटना घडतील. रेंगाळलेल्या कामांना गती मिळेल. सहकारी वर्गाचे विशेष साहाय्य लाभेल. जोडीदाराला त्याच्या कामात यश मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साही राहील. मुलांचे प्रश्न जास्त ताणू नका. रक्ताभिसरणासंबंधित तक्रारी डोकं वर काढतील.

सिंह : चंद्र नेपच्यूनच्या लाभ योगामुळे वागण्या-बोलण्यात उत्स्फूर्तता येईल. आपल्या बोलण्याचा प्रभाव पडेल. नोकरी-व्यवसायात आपले मुद्दे इतरांना समजावून सांगाल. उच्च पद भूषवाल. अन्यायाविरुद्ध लढा द्याल. सद्य परिस्थितीत आप्तजनांच्या मागे खंबीरपणे उभे राहाल. जोडीदाराच्या कामाला योग्य दिशा मिळेल. मुलांची प्रगती होईल. पोटऱ्यांच्या शिरा ताठर होतील. वैद्यकीय सल्ला आणि औषधोपचार घेणे आवश्यक ठरेल.

कन्या : रवी चंद्राच्या लाभ योगामुळे अपेक्षित यश मिळेल. मेहनतीचे सार्थक होईल. कामातील सातत्य कायम ठेवा. नोकरी-व्यवसायात काही मुद्दय़ांवर पुनर्विचार कराल. वरिष्ठांच्या मताचा मान राखाल. सहकारी वर्गाकडून कामाच्या गतीवर परिणाम होईल. कामाचा अतिरिक्त बोजा पडेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. मानसिक ताण दूर करण्यासाठी काही काळ राखून ठेवाल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. अपचनाच्या तक्रारी वाढतील.

तूळ : चंद्र शनीच्या युती योगामुळे सद्य:स्थिती म्हणजे परीक्षेचा काळ असेल. आपल्या संपर्कातील व्यक्तींची नव्याने ओळख होईल. नोकरी व्यवसायात जवळची माणसं मदतीला धावून येतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेलच असे गृहीत धरू नका. सहकारीवर्गाच्या समस्या समजून घ्याल. जोडीदाराच्या हेकेखोर स्वभावाला वेळीच आवर घालावा लागेल. दोघांनी समजुतीने घ्यावे. मुलांचा उत्कर्ष सुखकारक वाटेल. डोळे आणि पावले यांच्यासंबंधित त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

वृश्चिक : रवी चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश आणि मानसन्मान मिळेल. इतरांचे साहाय्य लाभेल.  नोकरी- व्यवसायात वरिष्ठांकडून मार्गदर्शन मिळेल. व्यावसायिक डावपेच कामी येतील. सहकारीवर्गाच्या मदतीने मोठे आव्हान पेलाल. जोडीदाराच्या कामाची कदर केली जाईल. मुलांना आपली मते मांडण्याची संधी द्याल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. घसा आणि डोळे यांची विशेष काळजी घ्यावी. वेळप्रसंगी वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

धनू : चंद्र शुक्राच्या केंद्र योगामुळे आपल्यातील कलागुणांचा विकास कराल. आपल्या कमतरतांवर मात करून नव्याने काहीतरी शिकाल. आपला मुद्दा मांडण्यापूर्वी त्यासंबंधीची अधिक माहिती जमवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या मताला दुजोरा द्यावा लागेल. सहकारीवर्गावर करडी नजर ठेवाल. जोडीदाराला त्याच्या मित्रमंडळींकडून मदतीचा हात मिळेल. मुलांना प्रेमासह शिस्तीचा बडगाही दाखवावा लागेल. घसा खवखवणे आणि जळजळ होणे असा त्रास संभवतो.

मकर : गुरू चंद्राच्या लाभ योगामुळे वडीलधाऱ्या मंडळींचे मार्गदर्शन लाभेल. सामाजिक बांधीलकीचे भान ठेवाल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त प्रवास योग येईल. सद्यस्थितीचा विचार करूनच पावले उचलावीत. परदेशासंबंधीत कामे मार्गी लागतील. सकारात्मक दृष्टिकोनामुळे समस्यांवर उपाय शोधाल. कौटुंबिक वातावरण सलोख्याचे राहील. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. खांदे, दंड यातील स्नायू आखडणे असा त्रास उद्भवण्याची शक्यता आहे.

कुंभ : चंद्र नेपच्यून या दोन भावनाप्रधान ग्रहांच्या केंद्र योगामुळे भावनिक गुंता वाढेल. कृती आणि विचारांमध्ये तफावत निर्माण होण्याची संभावना दिसते. नोकरी-व्यवसायात मात्र जबाबदारीने कामे पार पाडाल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. जोडीदाराचा त्याच्या कार्यक्षेत्रात ठसा उमटेल. मुलांकडून चांगली बातमी समजेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कामाच्या व्यापात डोळ्यांवरील ताण वाढेल. त्यांचे आरोग्य जपा. वैद्यकीय सल्ला घ्या.

मीन : चंद्र आणि  शुक्र या स्त्री ग्रहांच्या नवपंचम योगामुळे  चोखंदळपणे खरेदी कराल. सतर्क बुद्धीचा उपयोग होईल. नोकरी व्यवसायात नाती जपाल. सद्य स्थितीतून मार्ग काढत पुढे जाल.  वरिष्ठांना दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराची मेहनत फळास येईल. काही गोष्टींचा अट्टहास सोडलेला बरा! कोणाचे मन दुखवू नका. कौटुंबिक वातावरणात गैरसमज निर्माण होऊ शकतो. अति विचारांनी डोकं शिणेल. वैचारिक विश्रांती आवश्यक.