सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष रवी-हर्षलच्या समसप्तम योगामुळे आपल्या अधिकाराचा गैरवापर केला जाणार नाही याकडे लक्ष द्यावे. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते पटली नाहीत तरी त्यांच्या पदाचा मान ठेवावा लागेल. धीर सोडू नका. सहकारी वर्ग आपली स्थिती समजून घेईल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची प्रगती होईल. प्रगतीचा वेग धिमा असला तरी आशा सोडू नये. कौटुंबिक वातावरणातील तणाव कमी करावा. उत्सर्जन संस्थेची काळजी घ्यावी.

supreme court
नुकसानभरपाईच्या पुनरावलोकनाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; हवाई दल अधिकाऱ्याला एचआयव्ही संसर्ग
Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
“नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची अखेरची धडपड
india current account deficit narrows to 1 2 percent of gdp in quarter 3
चालू खात्यावरील तुटीवर नियंत्रण; ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत १०.५ अब्ज डॉलरवर

वृषभ नव्या संकल्पनांचा कारक चंद्र आणि कर्माचा कारक शनी यांच्या नवपंचम योगामुळे चिकाटी आणि मेहनतीने नव्या वाटा चोखाळाल. कर्तृत्वाला नवा आयाम मिळेल. नोकरी-व्यवसायातील अडचणींवर  मात कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदाराची रखडलेली कामे मार्गी लागतील. कुटुंब सदस्यांच्या तब्येतीच्या तक्रारींकडे लक्ष देताना धावपळ होईल. आपली जबाबदारी चोख पार पाडाल. पोटदुखीवर घरगुती उपाय करावेत. व्यायाम आवश्यक!

मिथुन रवी-चंद्राच्या समसप्तम योगामुळे मेहनतीला यश येईल. नव्या संधी उपलब्ध होतील. नोकरी-व्यवसायात अधिकाराच्या जागा भूषवाल. आपल्या वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाचा हेका सहन न करता त्यांना वेळीच समज द्याल. जोडीदाराच्या इच्छा पूर्ण कराल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची पत वाढेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. मुलांच्या समस्या समजून घ्याल. ताप आणि खोकला बळावल्यास वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक!

कर्क चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे उत्साह आणि उमेद वाढेल. ज्या गोष्टीची आतुरतेने वाट पाहत आहात ती मिळण्याच्या शक्यता अधिक आहेत. प्रयत्न सोडू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मते स्वीकारून त्यानुसार पावले उचलाल. सहकारी वर्ग अडचणीतून मार्ग काढेल. जोडीदाराचे बुद्धिचातुर्य आणि मेहनत यांचे चीज होईल.  मुलांच्या वागण्याने दुखावले जाल. व्यावहारिक दृष्टिकोन ठेवा. रक्तातील काही घटकांचे प्रमाण कमीअधिक होईल.

सिंह गुरु-चंद्राच्या नवपंचम योगामुळे गुरूच्या ज्ञानाला चंद्राच्या कुतूहलाची जोड मिळेल. सभोवतालचे वातावरण उत्साहवर्धक असेल. आपल्या छंदातून गरजवंतांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात अधिकारी वर्गाची हुकूमशाही सहन होणार नाही. डोकं शांत ठेवून आपले मत मुद्देसूदपणे मांडणे आवश्यक! सहकारी वर्ग आपल्या बाजूने उभा राहील. जोडीदाराच्या मेहनतीची जरूर दाद द्यावी. पोटरीत पेटके येतील.

कन्या कलात्मकतेला पोषक आणि पूरक अशा चंद्र व शुक्र या ग्रहांच्या नवपंचम योगामुळे सकारात्मक दृष्टिकोनातून सद्य परिस्थितीकडे पाहाल. संकटातही संधी शोधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. सहकारी वर्गासह झालेल्या चर्चेतून विचारांना नवी दिशा मिळेल. आपली कर्तव्ये पार पाडाल. जोडीदारासह मिळतेजुळते घेतल्यास वाद टळतील. मोकळेपणाने आपले मुद्दे घरच्यांपुढे मांडावेत. मनोबल चांगले राहील.

तूळ चंद्र-बुधाच्या समसप्तम योगामुळे नव्या गोष्टींचे प्रशिक्षण घ्याल. स्मरणशक्तीचा योग्य उपयोग कराल. बुद्धिवादात जिंकाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास खरा ठरवाल. सहकारी वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल. प्रकल्प पूर्ण व्हायला विलंब झाला तरी त्यातील बारकावे शोधून काढाल. जोडीदाराचा संताप कमी करण्याचा प्रयत्न यशस्वी ठरेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. तळपाय आणि डोळे चुरचुरणे, जळजळ होणे असे त्रास होतील.

वृश्चिक चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे चंचल चंद्राला नावीन्याची ओढ लागेल. दिनक्रमातील तोचतोपणा कंटाळवाणा वाटेल. भावनांवर विचारांचा लगाम बसवावा. नोकरी-व्यवसायानिमित्त प्रवास कराल. लहान-मोठय़ा गोष्टींमध्ये समयसूचकता बाळगाल. सहकारी वर्गाची चांगली साथ मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिक गुंतून जाईल. कुटुंबासाठी दोघांनी वेळ काढणे आवश्यक! तणाव कमी होईल. रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. वैद्यकीय सल्ला घ्या.

धनू चंद्र-नेपच्यूनच्या लाभ योगामुळे उत्साहवर्धक घटना घडतील. इतरांच्या भावनांचा अचूक वेध घ्याल. स्वत:च्या भावनांवर ताबा ठेवावा लागेल. नोकरी-व्यवसायात उत्स्फूर्त सादरीकरण कराल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. सहकारी वर्गाच्या समयसूचकतेचा चांगला लाभ होईल. जोडीदारासह सूर जुळतील. एकमेकांच्या संमतीने नव्या योजना हाती घ्याल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात प्रगती करेल. कोरडय़ा त्वचेचे त्रास उद्भवतील. उष्माघातावर मात करा.

मकर बुध-शनीच्या केंद्र योगामुळे व्यवहार आणि व्यवस्थापन व्यवस्थित सांभाळाल. बुद्धिमत्तेला कृतिशीलतेची आणि चिकाटीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात प्रगतिकारक घटना घडतील. वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. सहकारी वर्ग काही ना काही खुसपटे काढतील. मार्गातील अडथळे हुशारीने दूर कराल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जोडीदाराचे पाठबळ मिळाल्याने उमेद वाढेल. उत्सर्जन संस्थेसंबंधित त्रास बळावतील. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे!

कुंभ रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. प्रसिद्धी आणि प्रगती यांमुळे हा आठवडा आनंदात जाईल. नोकरी व्यवसायात वैचारिक मुद्दे मांडाल. वरिष्ठांचा आपल्यावरील विश्वास खरा ठरेल. सहकारी वर्गाची उल्लेखनीय साथ मिळेल. जोडीदाराची पावले प्रगतीच्या दिशेने पडतील. त्याचे ‘कामात व्यस्त असणे‘ कुटुंबाने समजून घ्यावे. अचानक पाठीत वा कमरेत लचक भरेल. घरगुती उपायांनी आराम मिळेल. परंतु दुर्लक्ष करू नका.

मीन गुरू-चंद्राच्या केंद्र योगामुळे आजवर रखडलेली कामे गतिमान होतील. ज्येष्ठांच्या ओळखीतून कामे होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मन जिंकाल. नव्या संकल्पना मांडाल. सहकारी वर्गाच्या समस्या सोडवाल. जोडीदाराला नावीन्यपूर्ण गोष्टींनी खूश कराल. प्रेमाने एकोपा वाढेल. कुटुंब सदस्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्याल. श्वसन संस्था आणि मणका सांभाळावा.