07 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०२०

गुणग्राहक चंद्र आणि सात्त्विक गुरूच्या युतीयोगामुळे थोरामोठय़ांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळेल.

संग्रहित छायाचित्र

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष गुणग्राहक चंद्र आणि सात्त्विक गुरूच्या युतीयोगामुळे थोरामोठय़ांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळेल. योग्य वेळेला योग्य निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी थोडे जुळवून घ्यावे लागेल. मनाविरुद्ध गोष्टी दुर्लक्षित कराल. सहकारीवर्गाला मदतीचा हात द्याल. जोडीदाराच्या कामाची गती हळूहळू मूळ पदावर येईल. आíथक बाजू सावरून धराल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. नातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवाल. कफासंबंधी विकारांची काळजी घ्या.

वृषभ आत्माकारक रवी आणि मनाचा कारक चंद्र यांच्या समसप्तम योगामुळे उत्साह वाढेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. वरिष्ठांचा विश्वास संपादन कराल. नव्या सूचनांचा नव्या दृष्टिकोनातून विचार होणे आवश्यक ठरेल. मित्रमंडळींकडून उत्साहवर्धक बातमी समजेल. जोडीदाराच्या समंजसपणाचा निर्णय कुटुंबाच्या दृष्टीने उपयोगी ठरेल. शेजाऱ्यांच्या मदतीने अडचणीवर मात कराल. घशाला इन्फेक्शन झाल्यास त्वरित औषधोपचार सुरू करावेत.

मिथुन गुरू-मंगळाच्या केंद्रयोगामुळे गुरूचे ज्ञान आणि मंगळाचे तंत्रज्ञान यांचा उत्तम मिलाफ दिसून येईल. अधिकाराचे पद भूषवाल. जबाबदाऱ्या पूर्ण करताना शांत डोक्याने निर्णय घेणे आवश्यक! सहकारीवर्गातील सदस्य संस्थेचे हित साधेल. जोडीदाराच्या कार्यातील अडचणी वाढल्याने तो तणावग्रस्त असेल. कौटुंबिक जबाबदारी नेटाने पार पाडाल. वडीलधाऱ्यांचा आधार मिळेल. उत्सर्जन संस्थेच्या तक्रारी डोके वर काढतील. हलका व पथ्याचा आहार घ्यावा.

कर्क बुध व शनीच्या समसप्तम योगामुळे बुधाची बुद्धी आणि शनीची मेहनत यांचा संगम झालेला दिसेल. नोकरी-व्यवसायात नियोजन आणि व्यवस्थापन उत्तम कराल. अद्ययावत तंत्रज्ञानाचा उपयोग यशस्वी ठरेल. सहकारीवर्गाची चांगली साथ मिळेल. मनातल्या कल्पना प्रत्यक्षात उतरवाल. जोडीदाराच्या मेहनतीचे आणि सातत्याचे फळ त्याला मिळेल. समाजोपयोगी कार्यात सहभागी व्हाल. यकृताचे कार्य मंदावल्यास वैद्यकीय उपचार घ्यावे लागतील. चालढकल नको.

सिंह चंद्र व हर्षलच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पनांना पािठबा द्याल. सध्याच्या परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलाल. नोकरी-व्यवसायात नव्या अनुभवांतून नव्या गोष्टी शिकायला मिळतील. संघर्ष करून आपले ईप्सित साध्य करावे लागेल. सहकारीवर्गामध्ये  आपली बाजू परखडपणे मांडाल. जोडीदाराच्या कामातील नावीन्यपूर्ण प्रकल्पांमुळे तो खूप व्यस्त असेल. नातेवाईकांसह वाद वाढवू नका. गुडघे, सांधे यांची हालचाल, व्यायाम आवश्यक!

कन्या भावनाप्रधान चंद्र आणि व्यवहारचतुर बुध यांच्या समसप्तम योगामुळे नात्यांमधील बंध आणि व्यवहार योग्य पद्धतीने जपाल. नोकरी-व्यवसायात शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ठरेल. वरिष्ठांचे म्हणणे नीट ऐकून व समजून घ्या. सहकारीवर्गावर संपूर्णपणे अवलंबून राहिल्यास कामात दिरंगाई होईल. अंतिम सूत्रे आपल्याच हाती ठेवा. आरोग्याच्या तक्रारी नाहीत. जोडीदाराला नित्यनव्या अडचणींना सामोरे जावे लागेल. त्याचा हुरूप वाढवावा.

तूळ रवी-हर्षलच्या केंद्रयोगामुळे वडीलधाऱ्यांची मते पटणार नाहीत.  नोकरी-व्यवसायात वरिष्ठ आपल्यावर अरेरावी करतील. तूर्तास फक्त आपला विरोध नोंदवाल. सहकारीवर्गाची साथ चांगली मिळेल. त्यांच्या मदतीमुळे कामाचा बोजा हलका होईल. अतिरिक्त जबाबदाऱ्या अंगावर ओढून घेऊ नका. पश्चात्तापाची वेळ येईल. जोडीदाराची मानसिक स्थिती जपावी लागेल. अस्वस्थतेमुळे त्याला आजारपण येईल. त्याच्यामागे खंबीरपणे उभे राहाल.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे काही गोष्टी नव्या जोमाने पुन्हा सुरू कराल. सकारात्मक विचारांनी परिस्थितीतून मार्ग काढाल. नोकरी-व्यवसायात संकटांवर मात कराल. वरिष्ठांना आपली मते समजावून द्याल. सहकारीवर्ग काम वेळेत पूर्ण करेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. एकत्रितपणे भविष्यातील योजनांचा आराखडा मांडाल. आपापल्या छंदांतून आनंद मिळवाल. समाजोपयोगी कामात हिरिरीने भाग घ्याल. भावंडांशी लहानमोठय़ा गोष्टींवरून वाद होतील.

धनू चंद्र-मंगळाच्या केंद्रयोगामुळे नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी यांना मदत कराल. नोकरी-व्यवसायात कामाच्या बदलत्या स्वरूपामुळे ताण वाढेल. वरिष्ठ कामातील उणिवा शोधतील. सावध राहा. सहकारीवर्ग समयसूचकतेचा वापर करून आपली ढाल बनून उभा राहील. जोडीदार त्याच्या समस्यांमधून अत्यंत हुशारीने मार्ग काढेल. दोघे मिळून कौटुंबिक वातावरण समाधानकारक ठेवाल. घसा आणि छाती यांचे सर्द हवेपासून संरक्षण करा.

मकर चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे आपल्या सुप्त गुणांना वाव द्याल. छंद जोपासाल. नोकरी-व्यवसायात केलेल्या मेहनतीचे फळ मिळेल. सहकारीवर्गाला आपले मुद्दे पटतील. खूप दिवसांपासून चच्रेत असलेल्या मुद्दय़ावर अंतिम निर्णय घ्याल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होतील. त्याचा सल्ला कुटुंबाच्या हिताचा ठरेल. कुटुंब सदस्यांकडून चांगली बातमी ऐकायला मिळेल. योग्य विश्रांती घेणे आवश्यक! गुेंद्रियांचे आरोग्य सांभाळा.

कुंभ बुध-प्लुटोच्या समसप्तम योगामुळे समाजोपयोगी योजना राबवाल. लोकांसाठी काम करताना समाधान वाटेल. नोकरी-व्यवसायात गरजूंना मदत कराल. ज्येष्ठ वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्गाला योग्य मार्गदर्शन द्याल. आíथक घडी नीट बसवाल. मित्रमंडळींसाठी थोडी धावपळ करावी लागेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील विरोधक कुरघोडय़ा करतील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. घरातील ज्येष्ठ मंडळींना खूश ठेवाल. थंड हवामानामुळे पचनक्रिया मंदावेल.

मीन चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे भावनात्मक संघर्षांला सामोरे जावे लागेल. द्विधा मन:स्थिती होईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे ऐकून घ्यावे लागेल. आपले मुद्दे चतुराईने सर्वापुढे मांडावे लागतील. सहकारीवर्गाकडून कामे करवून घेण्यात अतिरिक्त शक्ती खर्च कराल.  जोडीदाराची कामे मार्गी लागतील. लहानसहान गोष्टींच्या चच्रेमुळे कौटुंबिक वातावरण बिघडेल. छातीत जळजळ होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2020 2:03 am

Web Title: astrology from 31st july to 6th august 2020 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २४ ते ३० जुलै २०२०
2 राशिभविष्य : दि. १७ ते २३ जुलै २०२०
3 राशिभविष्य : दि. १० ते १६ जुलै २०२०
Just Now!
X