08 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ३ ते ९ जुलै २०२०

चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे ज्येष्ठांच्या अनुभवातून धडे शिकाल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष चंद्र-गुरूच्या युतीयोगामुळे ज्येष्ठांच्या अनुभवातून धडे शिकाल. नोकरी-व्यवसायात अभ्यासात्मक अहवाल सादर कराल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारी वर्गाबाबत गरसमज टाळा. जोडीदाराला त्याच्या कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल. कुटुंब सदस्यांच्या समस्या जाणून घ्याल. शांत डोक्याने निर्णय घ्यावा. शेजारीपाजारी मदतीला धावून येतील. नव्या क्षेत्रात सध्या तरी पदार्पण करू नका. डोळ्यांची जळजळ होईल. कोरडेपणा जाणवेल.

वृषभ चंद्र आणि नेपच्यून या संवेदनशील ग्रहांच्या केंद्रयोगामुळे भावनेच्या भरात एखादा निर्णय घ्याल. नोकरी-व्यवसायात आपली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडाल. वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्ग कुरघोडी करण्याचा प्रयत्न करेल. फारसे लक्ष न देता आपले काम चालू ठेवा. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात अधिकाराचा वापर करेल.  दोघे एकमेकांना समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण ताणतणावयुक्त राहील. अतिविचारांमुळे डोकेदुखीचा त्रास संभवतो.

मिथुन गुरू-प्लुटोच्या युतीयोगामुळे आíथकदृष्टय़ा महत्त्वाच्या हालचाली होतील. ओळखीमुळे कामाला गती येईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मान्य करावे लागेल. तरीदेखील आपले मत निर्भीडपणे मांडाल. सहकारीवर्गाची मदत घ्यावी लागेल. जोडीदार त्याच्या कामातील अडचणींवर समर्थपणे मात करेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. शांतता राखणे गरजेचे आहे. शब्द जपून वापरा. पायाला जखम होऊन त्यात पू किंवा पाणी होण्याची शक्यता!

कर्क चंद्र-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे भावनांवर नियंत्रण ठेवाल. त्यांचा सकारात्मक उपयोग करून घ्याल. नोकरी-व्यवसायात लाभदायक घटना घडतील. कामाच्या संदर्भात नवे लेखन, वाचन कराल. सहकारीवर्गाला त्यांच्या अडचणीतून बाहेर काढाल. जोडीदाराला निराशेकडून आशेकडे जाण्याचा मार्ग दाखवाल. कौटुंबिक खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! कुटुंब सदस्यांकडून चांगली बातमी समजेल. आतडय़ाचे विकार बळावतील. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

सिंह बुध-मंगळाच्या केंद्रयोगामुळे बुद्धी आणि शक्ती दोन्हीचा योग्य उपयोग कराल. नोकरी-व्यवसायात धाडस दाखवाल. आपला मुद्दा वरिष्ठांना पटवून द्याल. सप्ताहाच्या अखेरीस वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सहकारीवर्गाच्या बुद्धिचातुर्याने काही कामांना गती मिळेल. जोडीदार आपल्या कामात व्यग्र असेल. नव्या आव्हानांना तोंड देईल.  कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य जपा. त्यांना मानसिक तणाव जाणवेल. कफ दाटणे, सर्दीमुळे डोके जड होणे संभवते.

कन्या चंद्र-मंगळाचा केंद्रयोग हा उत्साह आणि उमेद वाढवणारा योग आहे. आरोग्याच्या किरकोळ तक्रारींवर मात कराल. नोकरी-व्यवसायात कायद्याच्या चाकोरीत राहून आपले काम मार्गी लावाल. ज्येष्ठ-वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल. सहकारीवर्ग अपेक्षित काम वेळेत पूर्ण करेल. जोडीदाराच्या रागाला आटोक्यात ठेवा. प्रेमाने समजून घ्याल. कौटुंबिक वातावरण शांत ठेवणे हे मोठे कसब असेल. परिस्थितीशी मिळतेजुळते घेताना खूप समायोजन करावे लागेल.

तूळ चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे आíथक ठोकताळे खरे ठरतील. त्यानुसार आगामी योजना आखाल. नोकरी-व्यवसायात प्रगल्भ बुद्धिमत्तेची चुणूक दाखवाल. वरिष्ठांची वाहवा मिळवाल. सहकारीवर्ग उल्लेखनीय कामगिरी करेल. समयसूचकतेची दाद द्याल. जोडीदाराच्या विचारांशी सहमत नसल्याने वादविवाद होतील.  दोघांनी एकमेकांच्या म्हणण्यावर शांतपणे विचार करा. कौटुंबिक वातावरण बिघडवू नका. ज्येष्ठ मंडळींचा आधार मिळेल. पित्ताचा त्रास होईल.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या लाभयोगामुळे नव्या उत्साहाने नवी सुरुवात कराल. नोकरी-व्यवसायात कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. अपेक्षित गती न मिळाल्याने वरिष्ठ नाराजी व्यक्त करतील. सहकारीवर्ग मदत करेल. जोडीदाराची चांगली साथ मिळेल. कौटुंबिक वातावरण उत्साहाचे राहील. नातेवाईकांशी संबंध सुधारतील. आíथक नियोजन योग्य प्रकारे कराल. डोकेदुखीचा त्रास वाढेल. पित्तप्रकोप होण्याची शक्यता आहे. पथ्य पाळावे लागेल. काळजी घ्यावी.

धनू चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे नावीन्याची ओढ लागेल. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा तगादा पाठ सोडणार नाही. सहकारीवर्ग मेहनतीने काम करेल. त्याचे कौतुक कराल. जोडीदाराची चिडचिड वाढू न देता त्याच्या कलेने घ्याल. त्याचा स्पष्टवक्तेपणा काही गोष्टींसाठी हिताचा ठरेल. कुटुंबातील नात्यांमध्ये थोडी नरमाई येणे आवश्यक! ओळखीच्यांसाठी मदतीला धावून जाल. घसा आणि अन्ननलिकेचे आरोग्य जपा.

मकर चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कामाची आखणी नेटकेपणाने आणि विचारपूर्वक कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची भिस्त आपल्यावरच असेल. महत्त्वाचे निर्णय विचारांती घ्याल. संस्थेच्या हितासाठी मोलाच्या कामगिरीत सहभागी व्हाल. आíथक गणित नव्याने मांडताना जोडीदाराची भक्कम साथ मिळेल. त्याच्या कार्यक्षेत्रात त्याची धिम्या गतीने प्रगती होईल. कुटुंबातील सदस्यांना कामासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. डोळ्याचे आरोग्य सांभाळा.

कुंभ चंद्र आणि शुक्र या एकमेकांना पूरक असणाऱ्या स्त्री ग्रहांच्या केंद्रयोगामुळे भावनांचा समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात  वरिष्ठांचा विश्वास जिंकाल. आíथक बाजू सावराल. सहकारीवर्गाचा गरसमज दूर कराल. त्यांची साथ मिळेल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याला न पटणाऱ्या गोष्टींमुळे त्याच्या मनाची चलबिचल होत राहील. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. काही कामे एकत्रितपणे करून नाती दृढ कराल. अतिविचार टाळा. आरोग्य चांगले राहील.

मीन चंद्र-बुधाच्या युतीयोगामुळे नव्या संकल्पना राबवाल. भावना आणि व्यवहार यांचा समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा विश्वास सार्थकी लावाल. सहकारीवर्गाची मेहनत आणि चिकाटी प्रशंसनीय असेल. जोडीदाराच्या कोर्टकचेऱ्यांच्या कामाला चालना मिळेल. त्याच्या डोक्याचे ताप वाढतील. कौटुंबिक वातावरणातील ताण कमी करावा. डोळ्यांचा त्रास वाढेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 3, 2020 3:14 am

Web Title: astrology from 3rd to 9th july 2020 rashibhavishya dd70
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २६ जून ते २ जुलै २०२०
2 राशिभविष्य : दि. १९ ते २५ जून २०२०
3 राशिभविष्य : दि. १२ ते १८ जून २०२०
Just Now!
X