11 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ४ ते ९ एप्रिल २०२०

लाभ स्थानातील बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मनातील भावना यांचा समतोल राखाल.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष लाभ स्थानातील बुध-नेपच्यूनच्या युती योगामुळे बुद्धिमत्ता, व्यवहारज्ञान आणि मनातील भावना यांचा समतोल राखाल. नोकरी व्यवसायात वरिष्ठांचे म्हणणे मनाविरुद्ध असले तरी समजून घ्याल.सहकारी वर्गाचे कामातील सातत्य व काटेकोरपणा वाखाणण्यासारखा असेल. त्यांना त्याची पोचपावती द्याल. जोडीदाराच्या कामाचा ताण वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या  नव्याने स्वीकाराल. कफ, सर्दीचा त्रास वाढेल. फुप्फुसांचे आरोग्य जपा.

वृषभ शनी आणि शुक्राच्या नवपंचम योगामुळे मनमौजी शुक्राला संयमी शनीचा लगाम बसेल. आचार आणि विचार यांच्यात समतोल साधाल. नोकरी-व्यवसायात नाविन्यपूर्ण कल्पना मांडाल. वरिष्ठांची मर्जी राखाल. सहकारी वर्गातील हितशत्रूंचा सामंजस्याने बंदोबस्त कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रातील जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पार पाडेल. त्याची यश, कीर्ती वाढेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. डोळे, घसा यांचे आरोग्य सांभाळावे. दुर्लक्ष नको.

मिथुन चंद्र आणि नेपच्यून या भावनाप्रधान ग्रहांच्या समसप्तम योगामुळे इतरांच्या भावनांची कदर कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळवाल. आपल्या गुणांना वाव मिळेल. व्यावहारिक वृत्तीने करार मान्य कराल. सहकारी वर्ग अनपेक्षितपणे कामे पूर्ण करून देईल. जोडीदाराच्या कामकाजात अडचणी येतील. त्याची मनस्थिती समजून घ्याल. सर्व धावपळीत पचन आणि उत्सर्जन संस्थेचे आरोग्य सांभाळावे लागेल. मूळव्याधीचा त्रास उद्भवू शकतो.

कर्क अग्नितत्वाचा ग्रह रवी आणि जलतत्वाचा ग्रह चंद्र यांच्या नवपंचम योगामुळे आपल्या गुणांची कदर केली जाईल. हाती घेतलेल्या कार्यात यश मिळेल. वरिष्ठांचा मान राखाल. संस्थेच्या हिताचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गाकडून शुभ वार्ता समजतील. जोडीदाराचा मानमरातब वाढेल. त्याच्या शिस्तीचे आणि सातत्याने कौतुक होईल. जुन्या नातेवाईकांच्या भेटी होतील. ठरवलेले एखादे काम रद्द करावे लागेल. उष्णतेचे आजार बळावतील. आहारात बदल आवश्यक!

सिंह चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे मन वाऱ्याच्या वेगाने धावेल. चंचलतेला आळा घाला. ध्येय गाठण्यासाठी लागणारी शारीरिक व मानसिक ऊर्जा सत्कारणी लावणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. सभेत उत्तम सादरीकरण कराल. सहकारी वर्गावर नव्या जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदाराच्या बुद्धिमत्तेचे कौतुक होईल. नाविन्यपूर्ण विचारांना वाव मिळेल. कुटुंबातील सदस्यांची सेवाशुश्रूषा कराल. पाठीचा मणका, सांधे यांचे आरोग्य सांभाळा.

कन्या बुद्धीचा कारक बुध आणि विद्य्ोचा कारक गुरू यांच्या लाभ योगामुळे पुस्तकी ज्ञान व व्यावहारीक ज्ञान यांची यथायोग्य सांगड घालाल. नोकरी व्यवसायात आपले वर्चस्व कायम राहील. सभेपुढे आपले मुद्दे प्रभावीपणे मांडाल. जोडीदारासह झालेली पेल्यातली वादळे पेल्यातच मिटतील. जास्त ताणून धरू नका. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवाल. अतिविचारांमुळे डोकेदुखीचा त्रास होईल.

तूळ चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे आकलन शक्ती आणि धर्य यांचा छान मिलाप होईल. नोकरी-व्यवसायात नवी आíथक उलाढाल कराल. संस्थेच्या हिताचे निर्णय घ्याल. सहकारी वर्गाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी प्रयत्न कराल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. कुटुंब सदस्यांना त्यांच्या जबाबदारीची जाण करून द्याल. शिरेवर शीर चढणे, पाठीचा खालचा भाग दुखणे असे त्रास उद्भवतील.

वृश्चिक चंद्र बुधाच्या समसप्तम योगामुळे दोन्ही ग्रहांच्या सकारात्मक गुणांचा लाभ होईल. नोकरी व्यवसायात महत्वाच्या चच्रेतील विशिष्ट मुद्दे स्मरणात ठेवाल. सहकारी वर्गाकडून कामाची फारशी अपेक्षा ठेवू नका. कामे विनाकारण लांबणीवर पडतील. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबातील बच्चे मंडळी आणि ज्येष्ठ यांची दोघे मिळून काळजी घ्याल. कौटुंबिक जबाबदारया वाटून घ्याल. दंड, खांदे दुखणे, आखडणे, सुजणे असे त्रास अंगावर काढू नका.

धनू  चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे अद्ययावत तंत्रज्ञान मिळवाल. संशोधन कार्यात प्रगती कराल. झटपट निर्णय घेऊन मोकळे व्हाल. नोकरी-व्यवसायात एखाद्या गोष्टीचा साकल्याने विचार करून मगच निर्णय पक्का करावा. अन्यथा पश्चातापाची वेळ येईल. सहकारी वर्गाचे म्हणणे जाणून घ्याल. त्यांच्या सूचनांचा विचार कराल. जोडीदारासह लहान मोठे प्रवास कराल. आनंद मिळेल. कुटुंब सदस्य शुभ वार्ता देतील. मित्रमंडळी भेटतील. ओळखीतून कामे होण्याची शक्यता!

मकर बुद्धीचा कारक बुध आणि समूहाचा कारक ग्रह प्लुटो यांच्या लाभ योगामुळे अद्ययावत तंत्रज्ञान ग्रहण करून संघाचे नेतृत्व कराल. नोकरी-व्यवसायात प्रशिक्षणाच्या क्षेत्रात नाव चमकेल. सहकारी वर्गा तील गुणांचा योग्य ठिकाणी उपयोग करून घ्याल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. त्याच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर तो हिमतीने मात करेल. त्याला भावनिक आधार द्याल. वायुप्रदूषणाचा त्रास वाढेल. फुप्पूसांची काळजी घ्या. प्राणायाम करावा.

कुंभ बौद्धिक राशीतील बुध-नेपच्यूनच्या युतीयोगामुळे नव्या कल्पना स्फूरतील. लेखन, वाचन, काव्य यासारख्या कार्यात मन रमेल. प्रगती कराल. नवे करार उपयोगी ठरतील. सहकारी वर्गाचे काम उल्लेखनीय असेल. वरिष्ठांकडून वाहवा मिळवाल. जोडीदाराच्या साथीने आíथक समस्येवर मात कराल. अर्थार्जनाचे नवे मार्ग चोखाळाल. कष्टाचे चीज होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी ठेवाल. सांधे, पाठीचा मणका आणि पित्त यांची विशेष काळजी घ्यावी लागेल.

मीन चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे केलेल्या कष्टाचे चीज होईल. आíथक उन्नती होईल. गुंतवणूक विचारपूर्वक कराल. नोकरी व्यवसायात लाभकारक घटना घडतील. आपले विचार निर्भीडपणे सभेपुढे मांडाल. सहकारी वर्ग आपल्या सुचनेचे पालन काटेकोरपणे करतील. जोडीदारासह वैचारिक मतभेद होतील. मुद्दा फार ताणू नका. डोळ्यांवरचा ताण वाढेल. उन्हापासून जपावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2020 12:14 pm

Web Title: astrology from 4th to 9th april 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २७ मार्च ते ३ एप्रिल २०२०
2 राशिभविष्य : दि. २० ते २६ मार्च २०२०
3 राशिभविष्य : दि. १३ ते १९ मार्च २०२०
Just Now!
X