13 August 2020

News Flash

राशिभविष्य : दि. ५ ते ११ जून २०२०

बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष प्रगती कराल.

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष : बुध-हर्षलच्या नवपंचम योगामुळे बौद्धिक क्षेत्रात विशेष प्रगती कराल. संशोधनाच्या कार्यात भरीव योगदान संभवते. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल. हाती घेतलेली जबाबदारी सचोटीने पार पाडाल. सहकारी वर्गाबरोबर थोडे नरमाईने वागा. जोडीदार आपला हेका सोडणार नाही. सध्या तरी शब्दाने शब्द वाढवू नका. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवणे आपले कर्तव्य आहे. श्वसन व पचन संस्थेसंबंधीत विकार बळावतील. पथ्य पाळा.

वृषभ : गुरू-चंद्राच्या युती योगामुळे अडचणींवर मेहनतीने आणि सातत्याने मात कराल. नव्या समस्यांचा सामंजस्याने विचार करून मार्ग शोधाल. नोकरी-व्यवसायात काही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात कामाला गती मिळेल. जास्तीच्या जबाबदाऱ्या स्वीकाराव्या लागतील. घरातील ज्येष्ठ मंडळींचे अनुभव उपयोगी पडतील. गरजूंना मदत कराल. उष्णता व उत्सर्जन संस्थेचे विकार बळावल्यास योग्य पथ्य पाळावे.

मिथुन : चंद्र-मंगळाच्या लाभ योगामुळे चंद्राची नावीन्याची ओढ आणि मंगळाची धडपडी वृत्ती एकमेकांना पोषक ठरेल. नोकरी-व्यवसायात अनेक अडचणींना सामोरे जाल. बुद्धीचातुर्याने नवे मार्ग सापडतील. वरिष्ठ आणि सहकारीवर्गासह वाद घालू नका. आपले म्हणणे त्यांना आत्ता पटणार नाही. धीर धरा. जोडीदाराची त्याच्या कार्यक्षेत्रात कोंडी होईल. अशा वेळी आपला आधार त्याला मोलाचा वाटेल. उत्सर्जन संस्था संभाळा. पोटऱ्यात पेटके येतील.

कर्क : चंद्र-शुक्राच्या समसप्तम योगामुळे विचारांना व भावनांना कृतीची जोड मिळेल. नोकरी-व्यवसायात संकटातूनही मार्ग शोधाल. वरिष्ठांच्या मदतीने महत्त्वाची जबाबदारी स्वीकाराल. संस्थेची आर्थिक बाजू सावरून धराल. सहकारीवर्गाच्या हिताचा निर्णय जाहीर कराल. जोडीदाराच्या कामात अनेक अडचणी उद्भवतील. त्यातून बाहेर पडताना त्याची पुरेपूर दमछाक होईल. आरोप-प्रत्यारोपांना सामोरे जावे लागेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे ठेवाल.

सिंह : चंद्र-मंगळाच्या केंद्र योगामुळे धाडसाला नावीन्याची जोड मिळेल. आरोग्य चांगले राहील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे पाठबळ मिळेल. नव्या संधीचे चीज कराल. सहकारीवर्गाला आवश्यक ती मदत कराल. शब्दांवर ताबा ठेवा. सरकारी कामे व कायदेविषयक कामांमध्ये अडथळे येतील. पर्यायी व्यवस्थेचा विचार कराल. जोडीदार आपले अधिकार चोखपणे बजावेल. कुटुंब सदस्यांचा वैचारिक गोंधळ दूर कराल. आहारावर नियंत्रण ठेवा.

कन्या : रवी-चंद्राच्या नवपंचम योगामुळे आपले हक्क व अधिकार योग्य ठिकाणी गाजवाल. नोकरी-व्यवसायात जुन्या ओळखींचा उपयोग होईल. कायदेविषयक कामे धिम्या गतीने पुढे सरकतील. इतर कामांना वेग येईल. जोडीदाराच्या कामात नवे अडथळे उद्भवतील. त्याची चिडचिड समजून घ्यावी. अर्थाचा अनर्थ करू नये. कौटुंबिक वातावरणातील ताणतणावामुळे अस्थर्य वाढेल. उष्णतेचे विकार बळावतील. पथ्य पाळणे अत्यावश्यक आहे!

तूळ : चंद्र-हर्षलच्या नवपंचम योगामुळे ज्ञान आणि विज्ञानाच्या जोरावर नव्या दिशेने वाटचाल सुरू कराल. नोकरी-व्यवसायातील अनिश्चिततेचा अंदाज घेऊन पुढील गणिते मांडाल. सहकारी वर्गाला सतर्कतेचा इशारा द्याल. जोडीदाराला त्याच्या कार्यात यश मिळेल. सामाजिक कार्यातही तो हिरिरीने सहभागी होईल. कौटुंबिक वातावरणातील ताणतणाव कमी करा. तळपाय, पायाची खोट दुखणे यांमुळे त्रस्त व्हाल. व्यायाम व हलका मसाज करावा.

वृश्चिक : रवी आणि मंगळ या दोन अग्नितत्त्वाच्या ग्रहांच्या केंद्र योगामुळे अधिकार आणि धाडस यांना पोषक असे वातावरण मिळेल. नवी आव्हाने पेलण्याची िहमत दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचा पािठबा मिळेल. व्यावसायिक संबंध वाढवाल. ओळखींचा योग्य ठिकाणी उपयोग होईल. सहकारी वर्गातील गरजूंना मदत कराल. जोडीदाराचे सहकार्य चांगले लाभेल. त्याच्या कार्यक्षेत्रात तो मोलाची कामगिरी बजावेल. कुटुंब सदस्य भावनिक विचारात गुंतून पडतील.

धनू : बुध-चंद्राच्या समसप्तम योगामुळे भावनांना आळा घालाल. योग्य विचारविमर्श करून मगच अंतिम निर्णयाप्रत पोहोचाल. नोकरी-व्यवसायात सावधगिरी बाळगाल. लिखित मजकूर पुन्हा तपासून बघा. सहकारी वर्गांच्या अडचणी समजून मार्गदर्शन कराल. जोडीदाराच्या समयसूचकतेमुळे अडचणीवर मात करण्याची तयारी ठेवाल. कुटुंब सदस्यांची परिस्थितीशी जुळवून घेताना तारांबळ उडेल. त्यांना आपण दिलासा द्याल. मूत्रविकार सतावतील.

मकर : रवी-नेपच्यूनच्या केंद्र योगामुळे अनाकलनीय गोष्टींचा उलगडा होईल. ज्येष्ठ मंडळींकडून स्नेह व आपुलकी मिळेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना अमलात आणाल. वरिष्ठांचे पाठबळ लाभेल. जोडीदाराचा प्रगल्भ दृष्टिकोन व भविष्याचा विचार, तरतूद करण्याची हातोटी कौतुकास्पद ठरेल. कुटुंब सदस्यांना आपला आधार वाटेल. त्यांच्या भावनांचा आदर करा. सर्वाना धीराने वागता येईल असे नाही. खांद्याचे दुखणे सांभाळा.

कुंभ : चंद्र व नेपच्यून या भावनाप्रधान ग्रहांच्या नवपंचम योगामुळे इतरांच्या मनाचा विचार कराल. नोकरी-व्यवसायात योजलेली कामे वेळेत पूर्ण कराल. अडचणींवर मात करत पुढे जाल. सहकारी वर्गाच्या समस्या वरिष्ठांपुढे मांडाल. त्यांच्या बाजूने उभे राहाल. जोडीदार कुटुंब सदस्यांना धीर देईल. आर्थिक बाजू सावरून धरेल. कौटुंबिक वातावरण खेळीमेळीचे राहील. शेजारधर्म पाळाल. संशोधन कार्यात प्रगतिकारक पावले उचलाल. पाठ व मणका सांभाळा.

मीन : चंद्र-शुक्राच्या नवपंचम योगामुळे कला, साहित्य, वाचन, लेखन यात मन रमवाल. नव्या संकल्पना जनसामान्यांपुढे आणाल. नोकरी-व्यवसायात सर्वाच्या हिताचे निर्णय घ्याल. वेळप्रसंगी कमीपणा स्वीकाराल. सहकारीवर्गाला आपली कामे वेळेत पूर्ण करण्याचा आग्रह कराल. जोडीदाराच्या हट्टापुढे नमते घ्याल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. घसा, छाती व खांदे जपा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 5, 2020 1:23 am

Web Title: astrology from 5th june to 11th june 2020
Next Stories
1 राशिभविष्य : दि. २९ मे ते ४ जून २०२०
2 राशिभविष्य : दि. २२ ते २८ मे २०२०
3 राशिभविष्य : दि. १५ ते २१ मे २०२०
Just Now!
X