सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष शुक्र-शनीच्या प्रतियोगामुळे नव्या कामाची सुरुवात शिस्तबद्ध पद्धतीने कराल. परंतु या शिस्तीचे सातत्य राखणे आवश्यक! नोकरी-व्यवसायात वरिष्ठ काही मुद्दय़ांवर प्रश्न उपस्थित करतील. संपूर्ण अभ्यास करूनच या प्रश्नांना सामोरे जावे. सहकारी वर्ग वेळेअभावी अपेक्षित साथ देऊ शकणार नाही. जोडीदाराला कामानिमित्त प्रवास योग संभवतो. कुटुंब सदस्यांसह शब्दाने शब्द वाढवू नका. रक्तदाबावर नियंत्रण ठेवा. राग डोक्यात घालू नका.

वृषभ गुरू-चंद्राच्या युती योगामुळे सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. दुसऱ्याला मदत करण्याची तयारी दाखवाल. नोकरी-व्यवसायात ज्येष्ठ वरिष्ठांचे मार्गदर्शन आपल्याला प्रगतीच्या वाटेने पुढे नेईल. सहकारी वर्ग मदत करेल. तसेच त्यांच्या समस्या आपल्यापुढे मांडेल. मित्रमंडळी, नातेवाईक यांच्यात मानाचे स्थान मिळेल. जोडीदारासह सूर चांगले जुळतील. कुटुंबासाठी भरीव योगदान कराल. डोळ्यांचे विकार किंवा त्रास दुर्लक्षित करू नका.

मिथुन गुरू-शुक्राच्या षडाष्टक योगामुळे मानापमानाच्या कल्पना कुरवाळत बसाल. परंतु त्यापेक्षा कामाचा वेग वाढवून अपेक्षित ध्येय साधा. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची मर्जी संपादन कराल. सहकारी वर्गाच्या लहरी स्वभावाची प्रचीती येईल. त्यांचे वागणे, बोलणे फारसे मनावर घेऊ नका. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. एकमेकांना समजून घेणे आवश्यक! कौटुंबिक वातावरण थोडे त्रस्त असेल. शांतता राखण्यासाठी विशेष प्रयत्न करा.

कर्क चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवाल. योग्य ठिकाणी योग्य शब्दांचा वापर कराल. लोकांवर आपली बौद्धिक छाप पाडाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांशी जुळवून घ्यावे लागेल. सहकारी वर्ग मनात असूनही हवे तसे सहकार्य करू शकणार नाही. जोडीदाराच्या समस्यांवर उपाय शोधाल. त्याची स्थिती समजून घ्याल. कुटुंबासाठी खर्च करावा लागेल. आíथक बाजू भक्कम ठेवा. साथीच्या आजारांपासून सावध राहा.

सिंह रवी-प्लुटोच्या प्रतियोगामुळे वडीलधाऱ्या व्यक्तींना मानसिक त्रास होईल. नातेवाईकांमध्ये पुढाकार घेऊन कामे पूर्ण कराल. नोकरी-व्यवसायात अनेक अडचणींवर मात करून यशाचा मार्ग मोकळा कराल. जिद्दीने व हिमतीने सहकारी वर्गाला मदत कराल. समूहाचे नेतृत्व कराल. जोडीदारासह मोकळेपणाने बोलणे आवश्यक! मनातील प्रेम, आदर, कौतुक शब्दांत व्यक्त करून पाहा. दोघांना भावनिक आधार मिळेल. मणक्याचे आरोग्य जपा.

कन्या चंद्र-बुधाच्या नवपंचम योगामुळे चौकस बुद्धीला विनोदाची जोड मिळेल. समयसुचकतेची झलक दाखवाल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मुद्दे पुन्हा पडताळून पहाल. सहकारी वर्गाची तात्पुरती साथ मिळेल. जोडीदारासह चांगले जुळेल. भावंडांसाठी लाभदायक योजना आखाल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. जुन्या आठवणींनी डोक्याला ताण देऊ नका.

तूळ शुक्र-नेपच्यूनच्या नवपंचम योगामुळे नव्या संकल्पना अमलात आणाल. कलात्मक दृष्टीला पुष्टी मिळेल. नोकरी-व्यवसायानिमित्त लहान-मोठे प्रवास कराल. वरिष्ठांच्या मताप्रमाणे कामे वेळेत पूर्ण कराल. सहकारी वर्गाची चांगली साथ लाभेल. जोडीदाराचे म्हणणे समजून घ्याल. त्याच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे द्याल. कुटुंब सदस्यांना कर्तव्य व भावना यांच्यामध्ये समतोल राखण्याचे धडे द्याल. पचनाच्या तक्रारी उद्भवतील.

वृश्चिक चंद्र-मंगळाच्या नवपंचम योगामुळे आपल्या उत्साही व जोशपूर्ण स्वभावात निश्चयाची भर पडेल. नवे साहस करण्यासाठी आरोग्य चांगली साथ देईल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांची बोलणी ऐकून घ्यावी लागतील. सहकारी वर्ग मदतीस धावून येईल. जोडीदारासह मोकळेपणाने बोलून मनावरील भार हलका कराल. मित्रमंडळींच्या भेटीगाठी लाभदायक ठरतील. कौटुंबिक वाद टाळा. रक्तदाब, रक्ताभिसरणसंबंधी काळजी घ्यावी.

धनू शनी-चंद्राच्या युतीयोगामुळे हाती घेतलेले काम लांबणीवर पडेल. चिकाटी व सातत्य टिकवण्याची तयारी ठेवा. धीर सोडू नका. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांच्या आदेशानुसार हालचाली कराव्या लागतील. तरीही तात्काळ यशाची ग्वाही देता येणार नाही. सहकारी वर्गाचे थोडे फार साहाय्य मिळेल. जोडीदार त्याच्या कार्यक्षेत्रात विचारमग्न असेल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. हवामानानुसार त्वचेला अ‍ॅलर्जीचा त्रास होईल.

मकर रवी-चंद्राच्या षडाष्टक योगामुळे मेहनतीच्या मानाने कमी प्रमाणात लाभ होतील. कार्यसिद्धीसाठी संघर्ष करावा लागेल. मनातून प्रेमळ व बाहेरून शिस्तप्रिय वर्तन असेल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांकडून पाठबळ मिळेल. सहकारी वर्ग देखील तत्परतेने साहाय्य करेल. जोडीदारासह झालेली पेल्यातील वादळे पेल्यातच शमतील. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. मोकळ्या चच्रेने परस्परांतील गरसमज दूर कराल. मानसिक समतोल साधा.

कुंभ चंद्र-नेपच्यूनच्या केंद्रयोगामुळे मनोबल वाढेल. इतरांच्या भावनांचा विचार कराल. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांपुढे आपल्या समस्या निर्भीडपणे मांडाल. सहकारी वर्गालाही याचा लाभ होईल. जोडीदारासह जुळवून घ्यावे लागेल. त्याच्या कार्यक्षेत्रातील समस्यांवर उपाय सुचवाल. कौटुंबिक वातावरण चांगले राहील. नातेसंबंध टिकून राहण्यासाठी दुवा साधाल. खर्चाचे प्रमाण वाढेल. बरगडय़ा व मणका यासंबंधित दुखणे अंगावर काढू नका.

मीन गुरू-चंद्राच्या लाभयोगामुळे धार्मिक स्थळाला भेट द्याल. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती कराल. विद्या व्यासंग वाढवाल. नोकरी-व्यवसायात अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात कराल. आíथक उन्नती होईल. सहकारी वर्गाकडून विशेष लाभ होतील. जोडीदारासह आवडत्या गोष्टींमध्ये रमून जाल. निसर्ग सान्निध्यात मन ताजेतवाने होईल. आरोग्य चांगले राहील.