अलका फडणीस – response.lokprabha@expressindia.com

चाटसाठी आवश्यक चटण्या

ram navami 2024 date tithi and shubh muhurat know significance of the birth anniversary of lord shri ram
Ram Navami 2024 : रामनवमीच्या दिवशी पूजेसाठी २तास ३३ मिनिटांचा शुभ मुहूर्त; जाणून घ्या तिथी, मुहूर्त वेळ व पूजा विधी
Recipes of raw mango mango sauce recipe in marathi
वाळवण विशेष! घरगुती मसाल्यासह बनवा कैरीचा वर्षभर टिकणारा सॉस; लहान मुलंही खातील आवडीनं
gudi padwa 2024 gudi padwa wishes date shubh muhurat rituals puja vidhi and more
Gudi Padwa 2024 : जाणून घ्या गुढी उभारण्यासाठी शुभ मुहूर्त, तिथी आणि महत्व
summer special cucumber chaat recipe
Recipe : उन्हाळ्यासाठी बनून पहा ‘थंडगार’ काकडी चाट! पाहा ही गरेगार सोपी रेसिपी

गोडधोड फराळ खाऊन कंटाळा आला की चटपटीत खावंसं वाटू लागतं. मग आठवते शेवपुरी-भेळपुरी. पुढे दिलेले चाटचे विविध प्रकार करायचे असतील तर काही मूलभूत साहित्य हाताशी असणं आवश्यक आहे. या साहित्याविषयी..

पुदिना चटणी

साहित्य :

पुदिना अर्धी जुडी साफ करून (चिरलेला)

कांदा १ मोठा (चिरलेला)

हिरवी मिरची २-३

कोिथबीर अर्धी जुडी साफ करून (चिरलेली)

हिरव्या मिरच्या २-३

आलं १ इंच

चाट मसाला अर्धा चमचा

िलबाचा रस अर्धा िलबू

मीठ चवीनुसार

कृती :

सर्व एकत्र करून थोडेसे पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

गोड चटणी

साहित्य :

चिंच एक वाटी (गरम पाण्यात भिजवून कोळ काढून घेणे)

गूळ एक ते दीड वाटी किंवा जास्त (बारीक चिरलेला)  गुळाचं प्रमाण चिंचेच्या आंबटपणावर ठरवावे

साखर पाव वाटी

मीठ दोन चमचे किंवा चवीप्रमाणे

तिखट एक चमचा

चाट मसाला एक चमचा

कृती :

सर्व एकत्र करून चांगली उकळी आणा. थंड झाल्यावर काचेच्या बाटलीत भरून ठेवा.

रगडा

साहित्य :

पांढरे वाटाणे २ कप (रात्री सोडा घालून भिजवून ठेवा. सकाळी कुकरमध्ये शिजवून घ्या.)

कांदा १ बारीक चिरलेला

टोमॅटो १ बारीक चिरलेला

धणे पावडर १ चमचा                जिरा पावडर १ चमचा

मीठ चवीनुसार         साखर अर्धा चमचा

तेल २ टेबल स्पून      हग अर्धा चमचा

हळद अर्धा चमचा

तिखट अर्धा चमचा

कृती :

गरम तेलामध्ये िहग घाला, त्यावर कांदा घालून परता. कांदा गुलाबी झाल्यावर त्यावर टोमॅटो घालून परता. धणे पावडर, जिरा पावडर, हळद, तिखट, मीठ आणि साखर घालून परता. त्यावर शिजवलेले पांढरे वाटाणे घालून एकत्र करा आणि चांगली उकळी आणा.

गोड दही

साहित्य :

हंग कर्ड    (किंवा घट्ट दही) २-३ वाटय़ा

साखर अर्धी वाटी

मीठ चवीनुसार

कृती :

सर्व एकत्र करून फ्रिजमध्ये ठेवावे.

जिरा पूड

जिरे तव्यावर गरम करून मिक्सरमध्ये नीट पूड करून घ्यावी

छोले

साहित्य :

काबुली चणे २ वाटय़ा

कांदे २ मोठे (बारीक चिरलेले)

लसूण ५-६ पाकळ्या

आलं १ इंच

हिरवी मिरची २-३

धणे १ चमचा

जिरे अर्धा चमचा

लवंग ४-५

दालचिनी २ इंच

मोठी वेलची ३-४

काळी मिरी ७-८

शहाजिरे अर्धा चमचा

तमालपत्र २

हळद १ चमचा

तिखट १ चमचा

अनार दाणा १ चमचा (क्रश केलेला) किंवा आमचूर पावडर अर्धा चमचा किंवा अर्धा िलबाचा रस.

टोमॅटो २ लाल (बारीक चिरलेले)

साखर अर्धा चमचा

सोडा १ चिमूट

साजूक तूप १ टेबल स्पून

मीठ चवीनुसार

कोिथबीर

कृती :

१. काबुली चणे स्वच्छ धुऊन रात्री पाण्यात सोडा घालून भिजत ठेवा. सकाळी त्याच पाण्यात एक तमालपत्र, २ मोठी वेलची आणि ३-४  मिरीचे दाणे घालून कुकरमध्ये शिजवा.

२. आलं, मिरची आणि लसूण वाटून घ्या.

३. लवंग, दालचिनी, शहाजिरे, धणे आणि जिरे यांची पूड करा.

४. तेल गरम करून त्यात मोठी वेलची, मिरी आणि तमालपत्र घाला. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाला. कांदा गुलाबी झाल्यावर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. तेल सुटेपर्यंत परता. त्यात हळद, मिरची पूड/ तिखट, मसाल्याची पूड आणि वाटलेला अनारदाणा घालून परता. नंतर शिजवलेले काबुली चणे, मीठ, साखर घाला आणि परता. शिजवलेल्या चण्याचे पाणी आणि अर्धी वाटी पाणी घाला. चांगली उकळी आणा. गॅस बंद करून कोिथबीर घाला. हे छोले भटुऱ्याबरोबर किंवा समोसाबरोबर छान लागतात.

रगडा भाकरी चाट

साहित्य :

तयार रगडा २-३ वाटय़ा

भाकरी २

गोड दही १ वाटी

कांदा १ बारीक चिरलेला

पुदिना चटणी चवीनुसार

गोड चटणी चवीनुसार

तिखट डाळ अर्धी वाटी

बारीक शेव अर्धी वाटी

चाट मसाला अर्धा चमचा

कोिथबीर गाíनशसाठी

टोमॅटो १ बारीक चिरलेला

कृती :

मोठी प्लेट घेऊन त्यात भाकरी कुस्करून घ्या. वर रगडा आणि कांदा घाला. त्यावर दही घाला. नंतर गोड चटणी, पुदिना चटणी घालून मग टोमॅटो घाला. शेवटी बारीक शेव आणि चाट मसाला घाला. वर कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

टीप : खाताना वरून खाली भाकरीपर्यंत सर्व नीट एकत्र करून खा.

फ्रुट चाट

साहित्य :

सफरचंद २ (सोलून बारीक तुकडे केलेली)

केळी २ (गोल कापलेली)

टरबूज १ (कापून तुकडे केलेले)

काकडी १ (तुकडे केलेली)

टोमॅटो २ (लाल आणि घट्ट, बिया काढून तुकडे केलेले)

बटाटे २ (उकडून, साल काढून तुकडे केलेले)

अननस १ कप (तुकडे केलेले)

संत्रे १ कप (सोलून काप काढलेले)

काळी मिरी पावडर एक ते दीड चमचा

चाट मसाला एक ते दीड चमचा

संधव अर्धा चमचा

िलबाचा रस एक ते दीड टेबल स्पून

कृती :

सफरचंद, केळी, टरबूज, अननस, संत्रे, टॉमॅटो, काकडी, बटाटा मोठय़ा बाऊलमध्ये एकत्र करा. त्यामध्ये मिरपूड, चाट मसाला, संधव घालून सर्व नीट एकत्र करा. वरून िलबाचा रस घालून वर-खाली नीट हलवा.

सव्‍‌र्ह करताना वर टूथ पिक किंवा फ्रुट फोर्क लावून द्या.

टीप :

आवडत असल्यास वरून थोडंसं गोड दही घाला.

दिल्ली चाट

साहित्य :

उडीद डाळ १ कप (७-८ तास भिजवून नंतर चाळणीवर काढा)

आलं १ इंच

हिरवी मिरची १

सर्व एकत्र करून वाटा आणि त्याचे वडे तळा. वडे गरम पाण्यात भिजवून पिळून घ्या.

उकडलेल्या बटाटय़ाचे तुकडे करून चाट मसाला लावा.

गोड दही १ वाटी

चाट मसाला १ चमचा

जिरा पावडर  अर्धा चमचा

पुदिना चटणी चवीनुसार

गोड चटणी चवीनुसार

लाल मिरची पावडर अर्धा चमचा

लांब केळा वेफर्स २-३

कडक पुरी ३-४

काबुली चणे पाव कप उकडून चाट मसाला लावलेले.

शेव

कोिथबीर

कृती :

एका खोलगट बशीमध्ये वडा आणि बटाटे ठेवा. त्यावर काबुली चणे ठेवा. नंतर त्यावर भरपूर दही घाला. त्यावर कडक पुरीचे तुकडे घाला. वर पुदिना चटणी आणि गोड चटणी घाला. त्यावर मिरची पावडर, चाट मसाला आणि जिरा पावडर भुरभुरा. वरून शेव घाला. केळ्याचे लांब वेफर्स लावून सव्‍‌र्ह करा.

टीप : बटाटय़ाऐवजी आलु टिक्की घातली तरीही खूप छान लागते.

इडली चाट

साहित्य :

इडलीचे पीठ अर्धा किलो, रगडा २-३ वाटय़ा

पुदिन्याची चटणी अर्धी वाटी, गोड चटणी अर्धी वाटी

कोिथबीर बारीक चिरलेली, कांदा १ बारीक चिरलेला

कृती :

इडली पात्रात पाणी घालून गरम करत ठेवा.

इडली साच्यामध्ये अर्धी पळी इडलीचे पीठ घाला. प्रत्येक इडलीच्या पिठावर मधोमध रगडा घाला. नंतर इडली पात्रामध्ये ठेवून १५-२० मिनिटे वाफवून घ्या. थंड झाल्यावर इडल्या काढून घ्या.

प्लेटमध्ये इडली ठेवून त्यावर परत थोडासा रगडा पसरवा. त्यावर थोडासा कांदा, पुदिना चटणी आणि गोड चटणी घाला. वर थोडी शेव आणि कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

चकली चाट

साहित्य :

तयार चकल्या ६, कांदा १ बारीक चिरलेला

शेव अर्धी वाटी, गोड चटणी १ वाटी

पुदिना चटणी १ वाटी

कोिथबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली

टोमॅटो १ बिया काढून बारीक चिरलेला

कृती :

चकलीचे मोठे तुकडे करून एका प्लेटमध्ये ठेवा. त्यावर कांदा, टोमॅटो, गोड आणि पुदिना चटणी घाला. वरून शेव घाला. कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

टीप :

चकली चाट बनवल्यावर लगेच सव्‍‌र्ह करून खावे. नाहीतर चकली मऊ पडेल.

दही रगडा पुरी

साहित्य :

पाणी पुरीच्या पुऱ्या ८-१०

रगडा १ वाटी, दही १ वाटी

कांदा १ बारीक चिरलेला

पुदिना चटणी अर्धी वाटी

गोड चटणी अर्धी वाटी

तिखट डाळ अर्धी वाटी, शेव, कोिथबीर

कृती :

पुऱ्यांमध्य रगडा घाला. त्यावर दही घाला. नंतर कांदा, पुदिना चटणी, गोड चटणी, थोडासा चाट मसाला घाला. शेवटी शेव आणि तिखट डाळ घालून वर कोिथबीर पसरून सव्‍‌र्ह करा.

कोलंबी टिक्की चाट

साहित्य :

कोलंबी १ वाटी मध्यम आकाराची

बटाटे ३ (उकडलेले), पुदिना चटणी पाव वाटी

कांदा १ िरग कापलेला, आलं-मिरची क्रश १ चमचा

हळद पाव चमचा, मीठ चवीप्रमाणे

ब्रेड क्र म्ब्स १ वाटी

कोिथबीर बारीक चिरलेली

तेल १ टेबल स्पून, अंडं १

वाटण :

आलं १ इंच, लसूण पाकळ्या ७-८

हिरव्या मिरच्या २, कोिथबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली

वाटणाचे सर्व जिन्नस एकत्र करून वाटून घ्या

कृती :

कोलंबी स्वच्छ धुऊन घ्या. कोलंबीला हळद, मीठ आणि वाटण लावून १०-१५ मिनिटे ठेवून द्या. नंतर कोलंबी तेलावर परतून घ्या.

उकडलेले बटाटे कुस्करून घ्या. त्यामध्ये आलं-मिरची क्रश, कोिथबीर आणि मीठ घाला. सर्व नीट एकत्र क रा. त्यामध्ये कोलंबी घालून एकत्र करा.  त्याचे कटलेट करा. अंडं फेटून मीठ घाला. त्यामध्ये कटलेट बुडवून नंतर ब्रेड क्र म्ब्समध्ये घोळवून श्ॉलो फ्राय करा. प्लेटमध्ये दोन कटलेट ठेवा. त्यावर पुदिना चटणी घाला. वर कांद्याची िरग ठेवा. थोडासा चाट मसाला भुरभुरवा. िलबाची फोड ठेवा आणि सव्‍‌र्ह करा.

पोहे टिक्की कडधान्य चाट

साहित्य :

टिक्की :

जाडे पोहे १ वाटी पाण्यात भिजवून १० मिनिटे ठेवा.

बटाटे २ उकडलेले

आलं : मिरची क्रश (१ इंच आलं आणि ३ हिरव्या मिरच्या)

कोिथबीर १ टेबलस्पून

मीठ चवीनुसार

ब्रेड क्रम्ब्स १ वाटी

तेल : श्ॉलो फ्रायपुरते

कॉर्नफ्लोर २ चमचे

पोहे, उकडलेला बटाटा, आले-मिरची क्रश, मीठ आणि कोिथबीर एकत्र करा. त्याची टिक्की बनवा. ब्रेड क्रम्ब्समधे घोळवून श्ॉलो फ्राय करा.

मूग, मटकी, मसूर आणि हरभरे प्रत्येकी पाव वाटी घेऊन ७-८ तास पाण्यात भिजवून ठेवा. चाळणीवर काढून कपडय़ात बांधून ठेवून मोड आणा.

तेल : १ टेबल स्पून

चाट मसाला : अर्धा चमचा

मीठ : चवीनुसार

कांदा : १ बारीक चिरलेला

पुदिना चटणी -: अर्धी वाटी

गोड चटणी : अर्धी वाटी

शेव : अर्धी वाटी

कोिथबीर : बारीक चिरलेली

टोमॅटो : १ बिया काढून बारीक चिरलेला

गोड दही

कृती :

तेलावर मोड आलेली सगळी कडधान्यं परतून घ्या. पाण्याचा हबका मारून वाफ आणा. मीठ, चाट मसाला घाला.

सìव्हग : प्लेटमध्ये पोहा-आलू टिक्की ठेवा. त्यावर कडधान्यं घाला. वर कांदा, गोड दही,  गोड चटणी, पुदिना चटणी आणि टोमॅटो  घाला. वर शेव घालून सव्‍‌र्ह करा.

टीप :

हरभरे कुकरमध्ये शिजवून घ्या.

पाणी पुरी

साहित्य :

पाणी पुरीच्या पुऱ्या

मोड आलेले मूग (पाण्यात हळद आणि मीठ घालून उकडून घ्या)

खारी बुंदी १ वाटी, चिंचेची गोड चटणी

पाणी : (१ लिटर), वाटण :

पुदिना १ वाटी, कोिथबीर १ वाटी

आलं १ इंच, मिरची २ किंवा आवडीप्रमाणे

काळी मिरी ४-५ दाणे, जिरे १ चमचा

वरील जिन्नस एकत्र वाटून पेस्ट करून घ्या.

पाणी १ लिटर, सैंधव १ चमचा

चाट मसाला १ चमचा, जिरे पावडर १ चमचा

िलबू रस १ चमचा, मीठ १ चमचा

साखर १ चमचा

कृती :

वाटण १ लिटर पाण्यात घालून गाळून घाला. नंतर त्यामध्ये संधव, चाट मसाला, जिरे पावडर, िलबाचा रस, मीठ आणि साखर घालून चांगले एकत्र  करा. या पाण्यात अर्धी वाटी गोड चटणी घाला आणि पाणी थंड करा.

सवर्ि्हग : एका प्लेटमधे पुऱ्या ठेवा. निरनिराळ्या बोलमध्ये मूग, गोड चटणी, पाणी त्यामध्ये बुंदी घालून ठेवा. पुरी एका बाजूला मध्ये फोडून त्यामध्ये सर्व पदार्थ घाला किंवा पाणी पुरीवाल्याप्रमाणे सव्‍‌र्ह करा.

टीप : आवडत असल्यास उकडलेला बटाटा जाडसर कुस्करून आणि बारीक चिरलेला कांदा वर चाट मसाला घालून बाजूला ठेवा.

दही वडा

साहित्य :

उडीद डाळ १ पेला (डाळ स्वच्छ धुऊन  तास ७-८ भिजवून ठेवा. नंतर चाळणीतून गाळून घ्या)

मूग डाळ पाव पेला  (डाळ स्वच्छ धुऊन ७-८ तास भिजवून ठेवा. नंतर चाळणीतून गाळून घ्या)

हिरवी मिरची १, आलं १ इंच, मीठ चवीनुसार

वडय़ाची कृती :

मिक्सरमधे आलं आणि मिरची क्रश करून घ्या. त्यामध्ये नंतर वरील डाळी घालून कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या. वाटलेली डाळ एका बोलमध्ये काढून ठेवा. त्यामध्ये वाटलेली मिरची आणि आलं नीट एकत्र करून चांगलं घोटून घ्या. साधारण १५ मिनिटं कढईमध्ये तेल गरम करा आणि मध्यम आकाराचे वडे सोनेरी रंगावर तळून घ्या.

एका मोठय़ा पातेल्यात पाणी चांगले गरम करून त्यामध्ये तळलेले वडे घाला. वडे पाण्यात खाली बुडल्यावर बाहेर काढून हातांनी दाबून पाणी नीट काढून टाका. एका डब्यामध्ये झाकून ठेवा.

सवर्ि्हगसाठी : साहित्य :

गोड दही अर्धा किलो (थंड), गोड चटणी १ वाटी

पुदिना चटणी अर्धी वाटी (आवडत असल्यास)

भाजलेल्या जिऱ्याची पावडर १ चमचा

चाट मसाला १ चमचा, मिरची पावडर १ चमचा

बारीक शेव १ वाटी, कोिथबीर बारीक चिरलेली

कृती :

एका प्लेटमध्ये किंवा बोलमध्ये वडे ठेवा. त्यावर दही, गोड चटणी, पुदिना चटणी, जिरा पावडर, चाट मसाला आणि मिरची पावडर घाला. वरून शेव आणि कोिथबीर घालून सव्‍‌र्ह करा.

टीप : आवडत असल्यास पुदिना चटणी घाला.

छोले समोसा चाट

साहित्य :

पंजाबी समोसे २

छोले १ वाटी

कांदा १ बारीक चिरलेला

पुदिना चटणी अर्धी वाटी

गोड चटणी अर्धी वाटी

चाट मसाला अर्धा चमचा

कृती :

मोठय़ा प्लेटमध्ये समोसाचे दोन भाग करून ठेवा. त्यावर छोले घाला. वर पुदिना चटणी, गोडी चटणी आणि बारीक चिरलेला कांदा घाला. त्यावर थोडासा चाट मसाला भुरभुरा. वर कांद्याच्या िरग ठेवून सव्‍‌र्ह करा.

मूगडाळ कचोरी चाट

सारण साहित्य :

मूग डाळ १ वाटी- २ तास पाण्यात भिजवून पाणी काढून जाडसर वाटा, धणे पावडर १ चमचा

कोिथबीर अर्धी वाटी बारीक चिरलेली

हिरवी मिरची २-३ क्रश केलेल्या

बडीशेप पावडर १ चमचा, तिखट अर्धा चमचा

आलं १ इंच बारीक किसलेलं, गरम मसाला अर्धा चमचा

जिरे अर्धा चमचा, िहग १ चिमूट, मीठ  चवीनुसार, तेल पाव वाटी

सारण कृती :

कढईत तेल गरम करा. त्यात जिरे िहग घाला. त्यावर मिरची क्रश आणि आलं घाला. लगेच त्यावर  धणे पावडर व बडिशेप पावडर घालून परता (सतत परतत राहा). त्यावर हळद घाला त्यावर जाडसर वाटलेली डाळ घालून परता. त्यावर मीठ,  गरम मसाला,  हळद,  तिखट आणि आमचूर पावडर घालून परतत राहा. डाळ सुकी होऊन खरपूस होईपर्यंत परता. एका प्लेटमधे काढून थंड करा. वरून बारीक चिरलेली कोिथबीर घालून नीट एकत्र करा. सारणाचे सारखे भाग करा.

आवरण साहित्य :

मदा २ कप, तेल पाव कप, मीठ अर्धा चमचा, तेल तळण्यासाठी

आवरण कृती :

सर्व साहित्य एका मोठय़ा बोलमध्ये नीट मिसळून घ्या. लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून हलकेच मळून घ्या. जास्त मळू नका. हा मळलेला गोळा एका ओल्या रुमालाखाली झाकून ठेवा.

वापरते वेळी मळलेल्या मद्याचे सारखे भाग करा. मद्याचा प्रत्येक भाग गोल करून लाटून त्याची वाटी बनवा. त्यामध्ये मूग डाळीचे सारण भरून वाटी हळू हळू बंद करा. सर्व कचोरी अशा प्रकारे बनवून ठेवा. कचोरी दोन्ही हाताने हलके दाबा. कढईमध्ये तेल गरम करा. कचोरी तळण्यासाठी तेल मध्यम गरम ठेवा. कढईत २-३ कचोरी घाला. तेलात कचोरी वरती आल्यावर ती उलटवा. सोनेरी  रंगावर तळून घ्या. कचोरी पेपर नॅपकीनवर काढून घ्या.

सवर्ि्हग : साहित्य :

पुदिना चटणी जरुरीप्रमाणे, गोड चटणी जरुरीप्रमाणे

बारीक शेव जरुरीप्रमाणे

कृती :

कचोरी प्लेटमध्ये ठेवून मध्ये फोडा आणि पुदिना चटणी व गोड चटणी आणि शेव घालून सव्‍‌र्ह करा.

टीप :

आवडत असल्यास गोड दही घाला.