रंग माझा कोणता?

दरवेळी कपडय़ांच्या खरेदीला जाताना रंगांबद्दल माझा खूप गोंधळ उडतो. माझा रंग सावळा आहे. त्यामुळे वेगवेगळे रंग मला साजेसे दिसतील की नाही याबद्दल मला भीती असते.

दरवेळी कपडय़ांच्या खरेदीला जाताना रंगांबद्दल माझा खूप गोंधळ उडतो. माझा रंग सावळा आहे. त्यामुळे वेगवेगळे रंग मला साजेसे दिसतील की नाही याबद्दल मला भीती असते. माझ्या वर्णानुसार मला कोणते रंग साजेसे दिसतील?
– पूजा वाघमारे, १९.

आपल्याकडे साधारणपणे अशी धारणा आहे की, गोऱ्या वर्णावर सर्व रंग खुलून दिसतात. पण प्रत्यक्षात सावळा वर्णाच्या व्यक्तींकडे कपडय़ांच्या रंगाबाबत खूप पर्याय उपलब्ध असतात. त्यामुळे पूजा तुझा वर्ण सावळा असेल, तर तुला कपडय़ांच्या रंगांची फिकीर करायची गरजच नाही. अर्थात रंग कुठलाही निवडलास तरी तो कॅरी करण्यासाठी आत्मविश्वास हवा. तरच तू बाजी जिंकशील. सुरुवात म्हणून तू हिरवा, निळा, मोरपिशी असे शीतल वर्गातील रंग निवडू शकतेस. हे रंग डोळ्यांत भरत नाहीत, त्यामुळे तुझ्यातील रंगांबद्दलची संकोच वृत्ती काढायला मदत होईल. नंतर हळूहळू लाल, पिवळा, नारंगी या रंगांकडे वळ. गुलाबी, क्रीम, आकाशी असे फिकट रंग वापरून पाहा, तुला नक्कीच साजेसे दिसतील. प्रिंट्स रंगाबद्दलचा न्यूनगंड काढायला खूप मदत करतात. त्यामुळे फ्लोरल, छोटय़ा आकारातील प्रिंट्स वापरायला सुरुवात कर. अतिभडक किंवा फ्लोरोसंट रंग मात्र टाळ.

आमचं कॉलेज नुकतंच सुरू झालंय. मी टी-शर्ट आणि डेनिम घालणं पसंत करतो. वॉडरोबमध्ये टी-शर्टस कितीही असले, तरी ते कमीच वाटतात. अशा वेळी लुकमध्ये वेगळेपणा कसा आणता येईल?
– गौरव देशमुख, २०.

कॉलेजमध्ये मित्र-मैत्रिणींमध्ये मिरवण्यासाठी आपल्याकडे छान छान कपडे असणं हे मस्ट असतंच. पण कितीही कपडे असले, तरी काही दिवसांनी ते आपल्याला कमी वाटायला लागतात. त्यामुळे गौरव तुझी चिंता अगदी बरोबर आहे. पण या समस्येवर उपाय नाही, असे अजिबात नाही. त्यासाठी तुला थोडीशी तुझी कल्पनाशक्ती वापरावी लागेल. तू सांगितल्याप्रमाणे टी-शर्ट्स घालण्याकडे तुझा कल जास्त आहे. या टी-शर्ट्सभोवती तुला वेगवेगळे प्रयोग करता येतील. सर्वप्रथम एकच टी-शर्ट्स नेहमीच्या निळ्या डेनिम्सऐवजी कलर्ड डेनिम्ससोबत घातल्यास त्याचा लुक पार बदलून जातो. विशेषत: सफेद किंवा काळे टी-शर्ट्स कलर्ड डेनिम्ससोबत उत्तम जमून येतात. त्यामुळे या डेनिम्स नक्की ट्राय कर. टी-शर्ट्सवर चेक्स शर्ट घालण्याची स्टाइल जुनी असली तरी क्लासिक आहे. आपल्याकडे दमट वातावरण असल्याने जॅकेट घालता येत नाहीत. कॉलेजला तर अजिबातच नाही. त्याऐवजी शर्ट्सचा पर्याय तू वापरलाच पाहिजेस. डेनिम शर्टसुद्धा वापरता येईल. तू टी-शर्ट्ससोबत स्कार्फ किंवा पेंडेट्स घालून पाहिलेस का? सुंदर दिसतं. पुरुषांसाठी वेगळे स्काफ्र्स बाजारात पाहायला मिळतात. ते तुझ्या वॉडरोबमध्ये असलेच पाहिजेत. पण या सगळ्यासाठी कपडय़ांची खरेदी करताना नीट आखणी करणे गरजेचे आहे. ती केलीस की कॉलेजमध्ये मिरवायला तू रेडी..

आवाहन
फॅशनच्या संदर्भात तुमचे काही प्रश्न, शंका असल्यास जरूर पाठवा किंवा ‘लोकप्रभा’ला ई-मेल पाठवा. पाकिटावर किंवा ई-मेलच्या विषय रकान्यात ‘फॅशन पॅशन’ असा उल्लेख करावा.
मृणाल भगत

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fashion

ताज्या बातम्या