24 January 2021

News Flash

राशिभविष्य : ८ जानेवारी ते १४ जानेवारी २०२१

बुद्धीचा कारक बुध आणि मेहनतीचा कारक शनी यांच्या युतीयोगामुळे हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.

(संग्रहित छायाचित्र)

सोनल चितळे – response.lokprabha@expressindia.com

मेष

बुद्धीचा कारक बुध आणि मेहनतीचा कारक शनी यांच्या युतीयोगामुळे हाती घेतलेली कामे पूर्ण होतील. कायद्याच्या कामांना गती येईल. नोकरी-व्यवसायात आपले मत मुद्देसुद मांडाल. वरिष्ठांना आपला पाठिंबा दर्शवाल. सहकारीवर्गासह संबंध सुधारावे लागतील. रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक! कुटुंब सदस्यांच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात त्याची प्रगती होईल. एखादी जखम झाल्यास त्यात पू होऊन ती चिघळण्याची शक्यता आहे.

वृषभ

मंगळ-शनीच्या केंद्रयोगामुळे मंगळाच्या उत्साहाला शनीच्या चिकाटीची साथ मिळेल. नव्या उत्साहाने मोठय़ा जबाबदाऱ्या पेलण्याचे सामथ्र्य येईल. नोकरी-व्यवसायात आपल्या कामाची वरिष्ठांकडून दखल घेतली जाईल. सहकारीवर्ग आपल्या मदतीला धावून येईल. त्यांच्या समयसूचकतेमुळे मोठा धोका टळेल. जोडीदारासह वादाचे विषय टाळावेत. कुटुंबात शिस्तीसह प्रेमाचे बोलही आवश्यक आहेत. गुेंद्रियांची जळजळ त्रासदायक ठरेल. वैद्यकीय सल्ला घ्यावा.

मिथुन

चंद्र आणि नेपच्यून या दोन भावनाशील ग्रहांच्या नवपंचमयोगामुळे इतरांच्या भावना जपाल. व्यावहारिक तोटा सहन करून लाख मोलाचे भावनिक समाधान मिळवाल. मैत्रीचे बंध दृढ होतील. नोकरी-व्यवसायात अपेक्षित फलप्राप्ती न झाल्यास नाराज न होता नव्या तंत्राचा उपयोग कराल. सहकारीवर्गाची साहाय्यता घ्यावी लागेल. जोडीदाराची कामे मार्गी लागतील. कौटुंबिक समस्या नातेवाईकांसह चर्चा करून सोडवाल. भीड बाळगू नका. सर्दी, कफ तसेच पित्ताचा त्रास वाढेल.

कर्क

चंद्र-शनीच्या लाभयोगामुळे चंद्राचे कुतूहल आणि शनीची जिद्द एकमेकांना पूरक ठरेल. नोकरी-व्यवसायात स्वत:च्या हिमतीवर नव्या योजना आखाल. वरिष्ठांची मान्यता मिळवाल. सहकारीवर्गाचे गुण योग्य प्रकारे उपयोगात आणाल. जोडीदाराच्या अडचणी चर्चेने सोडवाल. कौटुंबिक वातावरण हलकेफुलके ठेवण्याची जबाबदारी स्वीकाराल. मित्रमंडळींना हिताचा मार्ग दाखवाल. पळत्यापाठी जाऊ नका. डोळ्यांचे विकार किंवा त्रास निर्माण होतील.

सिंह

चंद्र आणि शुक्र या दोन स्त्री ग्रहांच्या युतीयोगामुळे नवा उत्साह आणि आनंद निर्माण कराल. नव्याची नवलाई टिकवून ठेवाल. नोकरी-व्यवसायात उच्च पद भूषवाल. आपली कामगिरी चोखपणे पार पाडाल. सहकारीवर्गाकडून लहानमोठय़ा चुका होण्याचा संभव आहे. आधीपासूनच जागरूक असावे. अंतिम निर्णय जाहीर करण्यापूर्वी दोन वेळा विचार करणे आवश्यक! मुलाबाळांची प्रगती होईल. रक्तदाबाच्या तक्रारी उद्भवतील.

कन्या

बुध-गुरूच्या युतीयोगामुळे बुधाच्या बुद्धिमत्तेला गुरूच्या ज्ञानाची साथ लाभेल. कायद्याची संबंधित कामे मार्गी लागतील. नवे युक्तिवाद मांडाल. नोकरी-व्यवसायात कामाचा ताण वाढेल. अशा वेळी आपले छंद जोपासा. मन विश्रामित करा. सहकारीवर्ग आपले काम चोख करेल. नव्या जबाबदाऱ्या पेलेल. जोडीदाराच्या मदतीने नातेवाईकांशी चांगले संबंध प्रस्थापित कराल. कौटुंबिक वातावरण उत्साही असेल. रसवाहिन्यांच्या कार्यात बिघाड होण्याची शक्यता आहे. पचन बिघडेल.

तूळ

रवी-चंद्राच्या लाभयोगामुळे आपल्या कार्याची कीर्ती सर्वत्र पसरेल. सामाजिकदृष्टय़ा मोठय़ा घडामोडी होतील. नोकरी-व्यवसायात वरिष्ठांचे मार्गदर्शन आस्थापनेच्या दृष्टीने लाभदायक ठरेल. सहकारीवर्गाच्या समस्या सोडवताना आपणच अडचणीत याल. सावधगिरी बाळगावी. हितशत्रूंचा त्रास संभवतो. मित्रपरिवार मदत करेल. जोडीदाराची पत वाढेल. तो अन्यायाविरुद्ध लढेल. कौटुंबिक वातावरण संमिश्र राहील. श्वसनसंस्थेचे आजार बळावतील. औषधोपचार करावा.

वृश्चिक

चंद्र-बुधाच्या लाभयोगामुळे भावनांसह वैचारिक मंथन कराल. अतिभावूक न होता सद्य:स्थितीकडे व्यावहारिक दृष्टिकोनातून बघाल. नोकरी-व्यवसायात आर्थिक उलाढाल लाभदायक ठरेल. विचारपूर्वक निर्णय जाहीर कराल. सहकारीवर्गावर नव्या जबाबदाऱ्या सोपवाल. जोडीदाराच्या शिस्तीचे, व्यवस्थितपणाचे कौतुक कराल. त्याची कामे मार्गी लागतील. कुटुंब सदस्य कामानिमित्त प्रवास करतील. पित्ताशय आणि यकृताचे आरोग्य सांभाळा. वैद्यकीय सल्ला घ्यावा लागेल.

 

धनू

रवी-नेपच्यूनच्या लाभयोगामुळे वडीलधाऱ्या मंडळींच्या अनुभवाचे मौलिक मार्गदर्शन आपणास उपयोगी ठरेल. नोकरी-व्यवसायात नव्या संकल्पना सभेत मांडाल.  जनसमुदायावर आपला प्रभाव पाडाल. सहकारीवर्गाकडून कामाची पूर्तता करणे अवघड जाईल. दिलेला शब्द पाळण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. जोडीदाराची कामाच्या व्यापामुळे  दमणूक होईल. त्वचेची काळजी घ्यावी.

मकर

चंद्र-गुरूच्या लाभयोगामुळे आपल्या ओळखीतील ज्येष्ठ व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळेल. हाती घेतलेल्या कामांना वेग येईल. नोकरी-व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल. वरिष्ठांच्या भेटीगाठी भविष्यात लाभदायक ठरतील. सहकारीवर्गावर नियंत्रण ठेवा. जोडीदाराच्या मदतीने कुटुंबातील महत्त्वाचे निर्णय घ्याल. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या भावना जपा. कोर्टकचेऱ्यांची कामे लांबणीवर पडतील. मुलांच्या प्रगतीच्या वार्ता समजतील. श्वसनासंबंधित विकार बळावतील.

कुंभ

चंद्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे कामातील उत्साह वाढेल. आपल्या कृतीतून इतरांना आनंद द्याल. नोकरी-व्यवसायात कामातील त्रुटींमुळे थोडे मागे पाडाल. नाराज होऊ नका. नव्या जोमाने कामाला लागावे. सहकारीवर्ग साहाय्य करेल. त्यांच्यातील गुणांची कदर कराल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रातील अडचणींवर मात करून तो आपली क्षमता सिद्ध करेल. मित्रमंडळींच्या अनपेक्षित भेटीगाठी होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मुलांच्या अडचणी समजून घ्याव्यात.

मीन

शुक्र-मंगळाच्या नवपंचमयोगामुळे शुक्राच्या कला-कौशल्याला मंगळाच्या तंत्रज्ञानाची जोड मिळेल. हाती घेतलेल्या कामात नवे प्रश्न उभे राहतील. जास्त विचार केल्याने डोकं जड होईल. नोकरी-व्यवसायात कामांचा प्राधान्यक्रम ठरवा. वरिष्ठांचा पाठिंबा मिळवणे कठीण जाईल. सहकारीवर्गाकडून कामे करून घेताना थोडा अधिकार गाजवाल. जोडीदाराच्या कार्यक्षेत्रात नवे नियम, नव्या अटी लागू होतील. कौटुंबिक वातावरण खेळकर राहील. कमरेत उसण भरेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 8, 2021 12:31 am

Web Title: horoscope january 8 to january 14 2021 abn 97
Next Stories
1 राशिभविष्य : १ जानेवारी ते ७ जानेवारी २०२१
2 राशिभविष्य : दि. २५ ते ३१ डिसेंबर २०२०
3 राशिभविष्य : दि. १८ ते २४ डिसेंबर २०२०
Just Now!
X