भटकण्याची आवड अनेकांना असते. काहींना नवनवीन ठिकाणांचा शोध घेत तिथलं नावीन्य अनुभवायला आवडतं तर काहींना नेहमीच्या ठिकाणी सायकल सफारी करायला जायला आवडतं. भटकंतीचेही अनेक प्रकार असतात. जो-तो त्याच्या आवडीप्रमाणे भटकंतीचा आस्वाद घेत असतो. पण, भटकंतीदरम्यान अनेक घटक प्रवासात येत असतात. त्या छोटय़ा-छोटय़ा गोष्टींचाही आस्वाद आपण घ्यायला हवा. डॉ. प्रल्हाद कुलकर्णी त्यांच्या ‘गाज’ या पुस्तकात हेच सांगतात. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील त्यांच्या भटकंतीत त्यांनी गाज ऐकली, साठवली आणि पुस्तकातून आपल्यापर्यंत पोहचवली. पाऊस, इंद्रधनुष्य, थंडी, ढग, आकाश, धबधबा, ऊन, घाट, समुद्राच्या लाटा, जंगल, डोंगर, पक्षी, प्राणी, झाडं, फुलं, पानं असे निसर्गाचे असंख्य घटक अनुभवता येतात. त्याचा आनंद घेण्यातही मजा असते हे या पुस्तकातून मांडलं आहे. अशा घटकांवर वेगवेगळे लेख पुस्तकात आहेत. ‘पावसातील मन’, ‘आभाळाचे गाणे’, ‘जंगलस्वर’, ‘साहित्यातील समुद्र’ अशी आकर्षक शीर्षक यामधल्या लेखांना दिलेली आहेत. भटकंती करताना एखादा किल्ला सर करताना वाटेत येणारं जंगल, पावसाची सर, पक्ष्यांचा किलबिलाट, इंद्रधनुष्याची रंगबेरंगी छटा, समुद्राच्या लाटांचा आवाज या सगळ्याचा आनंद घ्यावा. अतिशय सुंदर लालित्यपूर्ण शब्दात डॉ. कुलकर्णी यांनी या पुस्तकात हे सारं उलगडून दाखवलं आहे.
गाज, डॉ. प्रल्हाद कुलकर्णी, प्रकाशक : स्नेहवर्धन, मूल्य : रु. १००/-, पृष्ठसंख्या : १००

प्रतिनिधी – response.lokprabha@expressindia.com

lucky number by date of birth
पैसा, पद, प्रतिष्ठा तुम्हाला कधी मिळणार? भाग्यांकावरून पाहा तुमचे लकी वर्ष
May 2024 These Five Zodiac Signs Will Earn Money
लक्ष्मी येती घरा! १ मे पासून पाच राशींना प्रचंड धनलाभ, ‘ही’ असतील फायद्याची रूपं; तुमची रास आहे का नशीबवान?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे | Loksatta chaturang Different types of fear infatuation the fear
‘भय’भूती: साहिब हम को डर लागे