आपण आज कलिंगडविषयी जाणून घेऊया, आणि त्याचे आगळेवेगळे पदार्थही करून पाहुया.

उन्हाळ्यातील आकर्षक व आवश्यक फळ कलिंगड आपल्या शरीरामधील पाण्याची कमतरता पूर्ण करतं. ह्यत एंटी ऑक्सिडेंट आहे आणि किलगड पोटाचा कॅन्सर, हृदय रोग व मधुमेहपासून वाचवतं, असं एक संशोधन सांगतं.

कलिंगडमध्ये ९२% पाणी व ६%साखर असते, यात विटामिन ए, सी आणि बी६ खूप जास्त प्रमाणात असते.

कलिंगडने होणारे फायदे

१.     कलिंगडमध्ये लाइकोपिन असते. लाइकोपिनने आपली त्वचा तरुण राहते.
२.     अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते.
३.     कलिंगडच्या फोडींवर काळी मिरी पावडर, सैंधव भुरभुरून खाल्याने आंबट ढेकर येणे थांबते.
४.     कलिंगडचा पल्प ‘ब्लकहेड्स’ने प्रभावित झालेल्या जागेवर चोळा आणि एक मिनिटांनी  चेहरा कोमट पाण्याने धुवून घ्या.
५.     कलिंगड खाताना एक गोष्ट लक्षात ठेवा- कलिंगड खाऊन झाल्यावर एक तासभर पाणी पिऊ नका. नाही तर लाभ होण्याऐवजी शरीराला नुकसान होऊ शकते.

56-lp-watermelon-recipeकलिंगड डिलाइट

साहित्य : १ कलिंगड, १ टेस्पून साखर, मिरी पूड किंवा दालचिनी पूड.

कृती :
कलिंगडचे थोडे तुकडे करून बाजूला ठेवणे आणि थोडे लहान स्कूप करून बाजूला ठेवणे.  मिक्सरमधून कलिंगडचे तुकडे टाकून व साखर टाकून ब्लेंड करणे. नंतर ग्लासमध्ये काढून त्यावर मीर पूड किंवा दालचिनी पूड टाकून सव्‍‌र्ह करणे.

59-lp-watermelon-recipeकलिंगडचे पोप्सिकॅल्स

साहित्य : २-३ कप कलिंगडचे तुकडे, ६ टेस्पून साखर, १-२ टेस्पून िलबाचा रस, १ टेस्पून लाईट कॉर्न सिरप.

कृती :सर्व एकत्र करून मिक्सरमध्ये एकजीव करावे. त्याची स्मूथ पेस्ट तयार होईल. वाटल्यास गाळून घेणे. पोप्सिकॅल्स मोल्डमध्ये ओतून ८-९ तासासाठी फ्रीज करणे. खाताना बर्फाची करकर अजिबात लागत नाही.. मंडळी नक्की करून पहा.

टीप : पोप्सिकॅल्स मोल्ड सर्व ठिकाणी उपलब्ध आहे.

57-lp-watermelon-recipeटोमेटो, कलिंगड आणि फेटा स्कीवर्स (लांब सळ्या) विथ मिंट आणि लाइम

साहित्य : टोमेटोचे बिया काढून १ इंच तुकडे करणे, कपभर तुकडे, ३ कप कलिंगडाचे १ इंचाचे चौकोनी तुकडे, २०० ग्राम फेटा चीझचे तुकडे १ इंच, ३ टेस्पून िलबाचा रस, २ टेस्पून ताजा पुदिना बारीक कापणे, १ टेस्पून ऑलिव्ह तेल, १ टीस्पून मीठ, १/२ टीस्पून मिरी पूड आणि थोडय़ा टूथ पीक.

कृती :
सर्व बोलमध्ये एकत्र करणे व झाकण लावून फ्रीजमध्ये १ ते २ तास ठेवणे.  टूथपिकमध्ये लावून वर थोडे िलबाचा रस व ऑलिव्ह तेल जे उरले आहे, ते परत टाकावे आणि लगेच थंडगार सव्‍‌र्ह करावे.

58-lp-watermelon-recipeग्रिल कलिंगड विथ चीझ / पनीर

साहित्य : ३-४ (१/२ इंच जाड) त्रिकोणी कलिंगडचे तुकडे, १-२ टेस्पून ऑलिव्ह तेल, मीठ व मीर पूड, १०० ग्राम चीज किंवा कुस्करलेले पनीर, इतालिअन मसाला (मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो), तुळशीची ताजी पाने आणि ऑलिव्हचे तुकडे.

कृती :
कलिंगडच्या तुकडय़ांवर दोन्ही बाजूला तेल लावून ग्रील करणे. कलिंगडवर ग्रीलचे माìकग आले पाहिजे. त्यानंतर त्यावर मीठ, मीर पूड आणि चीज किवा पनीर कुस्करून पसरावे. नंतर त्यावर इटालियन  मसाला टाकावा, तुळशीची पाने बारीक चिरून आणि ऑलिव्ह टाकून खावे.. फार वेगळे आणि चविष्ट लागते.
सीमा नाईक – response.lokprabha@expressindia.com