आपला देश भविष्यात आर्थिक महासत्ता बनणार असं जे भाकित वर्तवलं जातं, त्याचा आधार आहे, ती इथली तरूण पिढी. या पिढीच्या जोरावरच देशाचे भवितव्य घडणार आहे. म्हणून तरुण पिढीने जबाबदारीने वागायला हवे.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी म्हणजेच २६ जानेवारी रोजी आपण सर्व युवा एकत्र येऊ सामूहिक राष्ट्रगीत गायन करू, स्वातंत्र्याचे गुण गाऊ; पण दुसऱ्या दिवशी नेहमीसारखी धावपळ, सर्व आपआपल्या कामात व्यस्त मग नंतर सर्वाना एकत्र भेटण्याची वेळ येईल, थेट १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्यदिनाला. त्याच दिवशी आपणांस स्वातंत्र असणार नंतर पुन्हा बंदिस्त का? या राज्यात शिवाजी महाराज जन्माला आले, महाराजांसाठी त्यांचे मावळे पुढे सरसायचे. कारण सगळ्यांना स्वराज्य हवं होतं, पण आताचे मावळे कुठे आहेत? अत्याचार होतात या देशात तरी पण आपण गप्प असतो.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
500 Years Later Surya Grahan Collides With Rarest Chaturgrahi Yog
५०० वर्षांनी सूर्य ग्रहणाला अद्भुत दुर्मिळ योग; ८ एप्रिलपासून ‘या’ राशींच्या नशिबात अमाप श्रीमंती, नशीब चमकणार
solapur lok sabha marathi news, ram satpute latest news in marathi
सोलापूरमध्ये धर्मगुरू, मठाधीशांच्या आशीर्वादासाठी उमेदवारांचा आटापिटा
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

शिवरायांच्या मावळ्यांमध्ये सर्व जाती धर्माचे लोक होते हे सर्वाना माहीत आहे. उदा. या सर्वानी आजच्यासारखे मी मराठा, मी कुणबी, मी आगरी, मी ब्राम्हण, मी महार असं केलं असतं तर ते मावळे तरी म्हणवले गेले असते का? आणि शिवरायांना स्वराज्य तरी स्थापन करता आले असते का? तसेच देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी संपूर्ण देशातून विविध जातीचे लोक एकत्र येऊन इंग्रजांविरुद्ध लढले तेव्हा कुठे स्वातंत्र मिळाले. त्यांनीसुद्धा मी मराठा, मी कुणबी, मी आगरी, ब्राम्हण, महार, मी अमका, मी तमका असं म्हटलं असतं तर आज आपण या देशात स्वतंत्रपणे श्वास घेऊ शकलो असतो का? आज आपण सगळे एक असे मानतो का? तसे आहोत का आपण ? मग एक का होत नाही आपण? का शिवरायांचा आदर्श ठेवत नाही समोर? ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून सुटका व्हावी यासाठी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांसारख्या क्रांतिकारकांनी देशासाठी आपले बलिदान दिले. त्यांचे वय अवघे २३ वर्ष. काय गरज होती त्यांना लढायची ? ते कुठे आणि आजचे २३ वय वर्षे असणारे तरुण कुठे?

लोकमान्य टिळकांनी शिवजयंती आणि गणेशोत्सव सुरू केले कशासाठी तर शिवरायांचे विचार घरोघरी पोचावे म्हणून. पण आपण काय करतो, तर महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करतो. मोठमोठय़ा मिरवणुका काढतो, पण मिरवणूक काढून काय फायदा? जोरजोरात डीजे लावून दारू पिऊन नाचतात. अरे, महापुरुषांच्या जयंत्या आहेत ना मग त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवा. उगाच त्यांच्या नावावर नंगानाच कशाला करता? राजकारणी लोकांनी नुकसान करून ठेवले आहे या राज्याचे आणि या देशाचे. महाराजांचे नाव घेऊन हे राजकारण करतात. हे आजच्या युवाने समजून घ्यायला हवे.

खरं तर युवा या शब्दाचा अर्थच तीक्ष्ण धारेची तलवारच जणू. युवा म्हणजे एक असं हत्यार जे अतिशय तीक्ष्ण आणि धारदार आहे. ज्या हत्याराची धार कधीही बोथट होत नाही आणि त्याच्या तीक्ष्ण धारेच्या जोरावर कुठली लढाई जिंकता येईल. असं एक हत्यार, या हत्याराचा ज्या देशाला उपयोग झाला त्या देशाने प्रगतीच्या दिशेने जोरात झेप घेतलेली आहे त्यामुळे युवा या शब्दाला अनन्य साधारण महत्त्व दिले पाहिजे.

आजकाल कुठेही गेलं तरी नेहमी कानावर एकच विषय ऐकायला मिळतो आपला देश पुढच्या काळात आर्थिक महासत्ता होणार आहे. टीव्हीवर, वृत्तपत्रांमध्ये तज्ज्ञ मंडळीही हेच सांगत असतात. आपले माजी राष्ट्रपती दिवंगत ए पी जे अब्दुल कलाम सुद्धा हेच बोलले आहेत की येणाऱ्या काळात भारत एक महासत्ता होणार. त्यांनी असं का म्हटलं असेल बरं? याचं कारण असं की  सध्या जगात सर्वात जास्त युवा भारताकडे आहेत आणि हे युवा पुढील काळात आय. टी, इंजिनीयर, संशोधन अशा विषयांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करतील आणि भारताकडे पुढच्या पिढीत सर्वात जास्त इंजिनीयर, डॉक्टर, संशोधक असतील जे या भारताला महासत्ता बनवतील. म्हणजेच थोडक्यात सांगायचं झालं तर आजची युवा शक्तीच भारताला महाशक्ती बनवणार आहे!!! पण या अगोदर एका शास्त्रज्ञाने लिहून ठेवले आहे, तेही एकदा वाचूया मग पुढे बोलुया हा तर त्या शास्त्रज्ञाने असं म्हटलं आहे की, जर एखाद्या देशाला युद्धात हरवायचा असेल तर मोठमोठय़ा शस्त्रांनी त्यांचा पराभव करता येऊ शकतो, पण उद्या तो देश पुन्हा तुमच्यापेक्षा जास्त क्षमतेची शस्त्रास्त्रे बनवून तुमचाच सफाया करेल, परंतु जर त्या देशाला पूर्णत: नेस्तनाबूत करायचे असेल तर तेही कुठल्याही शस्त्राचा वापर न करता तर फक्त त्या देशातील युवा पिढीला वाईट व्यसन लावा, त्या देशातील लोकांना गुमराह करा, व्यसनी बनवा, त्यांना वाईट मार्गाला लावा मग बघा त्या देशाची काय अवस्था होते; तर त्या देशाची प्रगती तिथेच खुंटते आणि तो देश भिकेला लागतो मग काय तो तुम्हाला हरवेल पुढे? तेव्हा कोणतीही व्यसनं करताना या गोष्टीचा विचार करायला हवा.

आजची आपली युवा पिढी ही अतिशय हुशार पिढी आहे, असं मी मानतो. कारण आजचा युवा तंत्रज्ञानाशी जोडला गेल्यामुळे तो एक पाऊल पुढेच राहणार. त्याला इंटरनेटमुळे जगाचा अभ्यास घरी बसल्या करता येतो. मोबाइलच्या दुनियेमुळे तो सगळ्या जगाशी जोडला गेला आहे. टेलिव्हिजनमुळे आज सर्व गोष्टींचे ज्ञान त्याला मिळते, अशा कित्येक गोष्टीमुळे आजचा युवा नक्कीच खूप पुढे आहे, पण या सगळया साधनांचा वापर आजचा युवा नक्कीच कशासाठी करते ? म्हणजे देशासाठी करते की समाजासाठी करते की आपल्या गावासाठी करते की फक्त आपल्यासाठी करते हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण आजवर माझा जेवढय़ा युवकांशी संपर्क आला ते हेच बोलत असतात, मला शिकून मोठं व्हायचंय. सरकारी नोकरीला लागायचंय. पैसे कमवायचेत. पण एकही जण असं म्हणताना आढळला नाही की मला देशासाठी शिक्षण घ्यायचंय आणि देशासाठी काहीतरी करायचंय. मोठय़ा पगाराची नोकरी, बँक बॅलन्स आणि गाडी-बंगला ही युवांची स्वप्ने असायला हवीत. कोणीही गरीब राहा किंवा पैसे नका कमवू असं नाही पण देशासाठी काय? देशासाठी काय करणार हा प्रश्न येताना मग देशासाठी आम्ही काय करायचं? त्याच्याने आमचं काय भलं होणार? आणि आम्ही एकटय़ानेच ठेका घेतलाय का देश सुधारण्याचा, बाकीचे का नाही करत? मग आम्ही पण का करू? असे हे प्रश्न आजच्या युवांपुढे आहे.

राजकारण म्हणजे डोक्याला ताप त्यापेक्षा त्यात डोकच नको घालायला बुवा हे आजच्या युवांना वाटतं. काहींना तर वाटतं की राजकारण हे म्हाताऱ्या माणसांचं काम. आमच्या तरुण माणसांचं काम नाही ते. त्यांनी मॉडर्न लाइफ जगायची तर म्हणे काय, केस वाढवायचे, चित्र विचित्र कपडे घालायचे आणि पार्टी, पब्स, ड्रिंक आणि नको ते चाळे करण्यात स्वत:ला मॉडर्न म्हणून घ्यायचं. मला सांगा फक्त डोक्यावरचे केस वाढवून त्यांना विशिष्ट आकार दिल्याने कोण मॉडर्न होतो का? नेमके हेच कळत नाही ना की मॉडर्न शब्दाचा संबंध तरी कशाशी जोडावा? वेशभूषेशी की बुद्धिमतेशी? म्हणजे ज्यांची वेशभूषा चांगली तो मॉडर्न की ज्यांची बुद्धिमता चांगली तो मॉडर्न ? आता ते तुम्हीच ठरवा बुवा. पण इथे एक मला सुविचार आठवला की, ‘केस वाढवून देवानंद होण्यापेक्षा, विचार वाढवून विवेकानंद व्हा’ इथे एकच सांगायचं की सर्वच युवा इथे वाया गेलेले नाहीत, पण चांगल्या आणि देशातील जागरूक अशा युवकांचे प्रमाणपण तेवढं म्हणावं असं नाही आहे. ते कमीच आहे का? मी एवढय़ासाठीच म्हणतोय कारण जितके युवक या देशात आहे तितक्या पूर्ण युवकांनी एक सच्चा देशभक्त असण्यात काय गैर आहे. या सर्वानीच जर विचार केला तर काय चुकेल सांगा ना ? मग या देशातला युवक का नाही एका स्वरात देशाचा देशभक्तीचा स्वर लावत? का थोडीशी जागरूकता आणि आपल्या देशाबद्दलची बांधिलकी दाखवतो? का प्रत्येक जण आपापल्या स्वार्थाच्या कार्यात मग्न आहे? मग या देशाची प्रगती कशी होणार? देशाची प्रगती झाली म्हणजे आपली नाही का होणार? आपण युवाच जर लक्ष नाही देणार या देशाकडे तर मग नुसतं राजकारण्यांना दोष देण्यात काय अर्थ! मग या सगळ्यांना जबाबदार कोण? युवा की हे राजकारणी. नाही, हे दोघेही नाहीत, मग उरतो कोण दोषी ठरवायला? आहे ना, दोषी आहेत पालक.. हो!  पालक म्हणजे या देशातले आई-वडील! असं का? पालक का दोषी? सांगतो. कारण जसं मी अगोदरच म्हटलं होतं की युवा एक नवीनच तयार झालेल्या धारदार हत्यारासारखा आहे, मग तेच उदाहरण घेऊ या, हत्यार बनवताना कुठल्याही धातूला वितळवून किंवा गरम करूनच आकार दिला जाऊ शकतो हे तर सर्वाना माहीतच आहे. मग त्या धातूला वितळवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी प्रचंड अशी ऊर्जा लागते अशा तप्त अग्नीत तो धातू टाकला जातो आणि मगच त्याला हवा तसा आकार दिला जातो. तलवारीप्रमाणे पण जर ही गरम करताना किंवा वितळवताना जर ऊर्जा कमी पडली तर तो हत्यार बनेल का? त्या धातूला आकार मिळेल का? त्याला धार देता येईल का? नाही ना? मग जी तळपती धारदार तलवार बनणार होती पण अग्नी ऊर्जा कमी पडल्यामुळे वितळलीच नाही आणि तिचं हत्यारच बनलं नाही बस, त्याचप्रमाणे हा युवा एक सुरुवातीच्या बालपणी कच्चा धातू असतो त्याला धारदार हत्यारासारखं तीक्ष्ण आणि सच्चा देशभक्त बनवण्यासाठी त्याला, ज्याप्रमाणे धातू भट्टीमध्ये टाकतो त्या प्रमाणे ज्ञानरूपी भट्टीत टाकायचं असतं आणि ती ऊर्जा, ती अग्नी हत्यार बनेपर्यंत कमी पडू द्यायची नसते मग बघा कसा आमचा युवा भरकटतो, वाईट व्यसनाला लागतो आणि कसा देशभक्त होत नाही; पण मुळात पाया कच्चा असेल तर घर कधीच मजबूत होणार नाही म्हणून सांगतो, युवा ही तर पुढची पायरी आहे, पण युवा होण्याअगोदर जे बालपण काढून तो युवापणात पदार्पण करतो त्या बालपणात त्याचं नीट संगोपन झालं तर तो नक्कीच उद्याचे शिवाजी महाराज, विवेकानंद, भगतसिंग झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून पालकांनी अगोदर जागरूक व्हायला हवे. कारण  त्यांच्याच मुलांच्या खांद्यावर या देशाची दारोमदार आहे आणि उद्याचे ते पालक आहेत म्हणून सर्वानी एकजूट व्हा कारण आपला देश हा युवाशक्तीच्या बळावर जगात महाशक्ती बनणार आहे.
शैलेश पाटील –