भिल्लांची बोली ‘देहवाली बोली’ म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रातील आदिवासीबहुल भागांत ते वास्तव्य करतात. पण या बोलीचे मराठीपेक्षा गुजराती आणि हिंदीशी अधिक साधम्र्य दिसते. या दोन्हींचा ‘देहवाली’वर प्रभाव आहे. या बोलीत मौखिक साहित्य- लोकगीतं, लोककथांचं समृद्ध भांडार आहे. ते काही साहित्यिक व अभ्यासकांनी शब्दबद्धही करून ठेवलं आहे. या बोलीविषयी..

महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार हे आदिवासीबहुल जिल्हे आहेत. या जिल्ह्य़ांत वळवी, वसावे, पाडवी, गावीत, नाईक अशा आडनावांचा एक मोठा समाजसमूह वास्तव्य करतो. तो भिल्ल समाज म्हणून परिचित आहे. हा समाज प्रामुख्याने भारतातील राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्र व मणिपूर इ. राज्यांत वसलेला आहे. प्रत्येक राज्यातील या जमातीचे राहणीमान, चालीरीती, सामाजिक व सांस्कृतिक जीवन काहीसे भिन्न असले तरी मानववंशशास्त्रीयदृष्टय़ा हा समाज ‘भिल्ल’ म्हणूनच ओळखला जातो. या भिल्ल जमातीच्या ढोली, डुंगरी, गारसिया, तडवी, धानका, बरडा, कटारा, महिडा, निनामा, मथवाडी, देहवाली, इ. उपजाती आहेत. गुजरातच्या सुरत, भडोच जिल्ह्यांतील निझर, उच्छल, महाल, सागबारा, मांगरोल, डेडियापाडा व महाराष्ट्राच्या नंदुरबार आणि धुळे जिल्ह्य़ातील नवापूर, तळोदा, अक्कलकुवा, अक्राणी, शहादा, शिरपूर तालुक्यांत देहवाली भिल्लांची वस्ती आहे. हे लोक जी भाषा बोलतात तिला ‘देहवाली बोली’ म्हटले जाते. प्रसिद्ध ब्रिटिश भाषासंशोधक जॉर्ज अब्राहम ग्रिअरसन यांनी आपल्या छ्रल्लॠ४्र२३्रू २४१५ी८ ऋ कल्ल्िरं श्’.क, स्र्ं१३ ककक  या ग्रंथात देहवालीची नोंद घेतलेली असून तिचे दोन भाषिक नमुने व तिची भाषिक वैशिष्टय़ांचा सविस्तर उल्लेख केला आहे. 

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
chhattisgarh s Elephant Family, Settles in Maharashtra, female elephant, give birth to calf, gadchiroli district , gadchiroli elephant born, elephant news, gadchiroli news, marathi news, animal news,
VIDEO: छत्तीसगडच्या मादीने महाराष्ट्रात दिला पिल्लाला जन्म, ‘प्ररप्रांतीय’ हत्तींचा कुटुंबकबिला विस्तारला…
eknath khadse
”…म्हणून मी भाजपात प्रवेश करणार आहे”, एकनाथ खडसेंचं वक्तव्य चर्चेत
Competition with sakhar gathi coming from Gujarat in sakhar gathi business for gudhi padwa 2024
पाडव्यासाठीच्या साखर गाठी व्यवसायात गुजरातशी ‘गाठ’

या बोलीचे खोलची किंवा खळवाड आणि मेवासी किंवा राजवाडी असे दोन पोटप्रकार आहेत. खोलची किंवा खळवाड ही तापी नदीच्या दक्षिणेकडील भिल्ल जमातीची बोली असून ती थोडी रांगडी आहे, तर मेवासी किंवा राजवाडी ही तापी नदीच्या उत्तर भागात राहणाऱ्या भिल्लांची बोली आहे. मेवासी देहवाली त्या भागातील पूर्वीच्या मेवासी राजांची भाषा असल्याने ती आदरार्थी, बहुवचनयुक्त व िहदीप्रमाणे ‘जी’ इ. आदरार्थी संबोधने असलेली मृदू व शिष्टाचारयुक्त सुसंस्कृत बोली आहे. प्रादेशिक वैशिष्टय़ानुसार या भूभागाच्या उत्तर व पश्चिमेला गुजरातचे गुजरातीभाषिक भडोच, बडोदा, सुरत हे जिल्हे, नर्मदेपलीकडे मध्य प्रदेशचा िहदीभाषिक झाबुवा जिल्हा, पूर्वेला महाराष्ट्राचे मराठी व अहिराणी भाषाबहुल धुळे आणि जळगाव जिल्हे असल्याने देहवाली बोलीवर या भाषांचा प्रभाव दिसून येतो. यापैकी गुजराती भाषेचा प्रभाव सर्वात जास्त असल्याने ती गुजराती भाषेचीच एक अपभ्रंश झालेली पोटभाषा आहे की काय असा समज होतो. गुजराती भाषेतील अनेक शब्द जसेच्या तसे किंवा थोडय़ाफार फरकाने देहवालीत वापरले जातात. पुढील शब्दांवरून ते लक्षात येईल.-

 गुजरातीतीततल्या ‘उंडो’ हा शब्द देहवालीत त्याच अर्थाने व उच्चाराने बोलला जातो. मराठीमध्ये मात्र त्यासाठी ‘खोल’ हा शब्द वापरला जातो.  गुजरातीतला ‘एकठा’ हा शब्द देहवालीत त्याच अर्थाने व उच्चाराने बोलला जातो, तर मराठीत ‘एकत्र’ हा शब्द वापरला जातो. असेच ‘फोज, फोज, फौज किंवा नाठा, नाठा, पळाले वा लागवग, लागवोडा, वशिला’ हे शब्द आहेत.

शब्दांबरोबरच या बोलीची गुजरातीशी वाक्यरचनाही मिळतीजुळती आहे.  गुजरातीतील ‘आफत आवी पडी’ हे वाक्य देहवालीत ‘आफत आवी पोडी’ असे बोलले जाते. (मराठी अर्थ- ‘संकट कोसळले.’) गुजरातीत ‘बिमारी वधती गई’ हे वाक्य देहवालीत ‘बिमारी वादती गियी’ असे बोलले जाते. (मराठी अर्थ- ‘आजार वाढत गेला.’)

या भाषेत काही वेळा वाक्यरचना हिंदीसारखी केली जाते. देहवालीत म्हणतात- ‘सीता जाय रियी ही.’ (िहदीत- सीता जा रही है.) देहवालीत ‘तू काय की रियो हो?’ (िहदीत- तू क्या कर रहा हैं?)

या भाषेवर राजस्थानी, विशेषत: जोधपुरी बोलीचाही प्रभाव दिसून येतो. जसे राजस्थानीतील ‘म्हाने नींद लागे है’ हे वाक्य देहवालीत ‘मान नींद लागे हे’ किंवा राजस्थानी ‘म्हाने मारवाड जावणो है’ हे वाक्य देहवालीत ‘मान मारवाड जावनू हाय’ असे बोलले जाते.  मात्र, देहवाली बोलीवर तुलनेने मराठीचा प्रभाव नगण्य वाटतो. मराठी व देहवाली बोलीत फारसा ताळमेळ नसल्याने नंदुरबार, धुळे जिल्ह्य़ांतील देहवाली बोली बोलणाऱ्यांना मराठी भाषा बोलणे व समजणे कठीण जाते.

 भाषाशास्त्रीय व व्याकरणदृष्टय़ा विचार केल्यास देहवाली बोली ही अनुनासिक भाषा आहे. तिच्या मूळ स्वरात ‘ळ’, ‘क्ष’ आणि ‘ज्ञ’ ही व्यंजने नाहीत, तर ‘छ’, ‘श’ आणि ‘ष’ यांच्याऐवजी ‘स’ हे एकच व्यंजन वापरले जाते. व्याकरणाचे सर्व घटक या बोलीत असून तिच्यात म्हणी, वाक्प्रचार व उखाणेदेखील आहेत. लोकगीतं आणि लोककथांचं समृद्ध भांडार या भाषेत आहे. भिल्ल जमातीची होळीगीतं, भक्तिगीतं, रोडाली गीतं यांचा खूप मोठा खजिना देहवालीत उपलब्ध आहे. असंच खांबूल्या देवाचं एक गीत पुढीलप्रमाणे आहे-

पागे पोडीने आर टाकारे आर टाका 

खांबूल्या देवूले आर टाकारे आर टाका

(पाया पडुनी माळा अर्पावी हो माळा अर्पावी,

खांब देवाला माळा अर्पावी हो माळा अर्पावी)

तसाच होळीगीताचा (लोल) एक नमुना असा-

साग बहरला, माहु फुलला

हिरवा चढाव चढे गरैया हिरवा चढाव चढे 

किंवा-

मारगो मे मेंडूल्या आल्या ते ता धुलडो उडावत्या जायरे

(रस्त्यावरून चालली मेंढरं उडवीत धुळवड)

या बोलीभाषेत पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांचीही काही नावे मराठीसारखी (उदा. आंबा, साग, मेथी, इ.), तर काही मराठीपेक्षा वेगळी (उदा. वडदा- वड, वाग- वाघ, टुडो- घुबड, कोलो- कोल्हा, काग- कावळा, इ.) आहेत.

या भाषेचे अभ्यासक आणि देहवालीतील प्रसिद्ध साहित्यिक चामुलाल राठवा यांनी बरंच मौखिक साहित्य शब्दबद्ध करून ठेवलं आहे. बाबूलाल आर्य यांनी देहवाली बोलीभाषेत अनेक समाजप्रबोधनपर गीतरचना केल्या आहेत. तत्पूर्वी या भागात शिक्षण विभागात नोकरीला असलेल्या सानप आणि इंगळे या अधिकाऱ्यांनी देहवालीतील अनेक लोककथांचं संकलन करून त्या त्याच भाषेत लिहून काढण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडे चामुलाल राठवा, विश्राम वळवी, देवेंद्र सावे, बळवंत वळवी, सोबजी गावीत यांनी देहवाली भाषेतून साहित्यनिर्मिती करायला सुरुवात केली आहे. साहित्य अकादमीने १९९६ मध्ये गणेशदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भाषासाहित्य प्रकल्पाची स्थापना केल्यानंतर आदिवासी साहित्य परंपरेतील मिझो, गोंडी, संथाली, गारो, राठवा इत्यादी बोलीभाषेतील साहित्याची संकलनं प्रसिद्ध केली आहेत. देहवाली भाषेतील साहित्याचे संकलन आणि मराठी अनुवाद चामुलाल राठवा यांच्याकडून करून घेऊन अकादमीने तो २००१ मध्ये प्रकाशित केला आहे.