डॉ. संजय ओक – sanjayoak1959@gmail.com

जून महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात माझा करोना बळावला आणि मला मुलुंडच्या फोर्टिस हॉस्पिटलच्या आय. सी. यू.मध्ये दाखल केले गेले. १३ नंबरची कॉट मिळाली आणि ‘आय. सी. यू.- आय-१३’ अशी नवी ओळख प्राप्त झाली. आता मी संजय ओक नव्हतो, डॉक्टर नव्हतो, सी. ई. ओ., टास्क फोर्सचा अध्यक्ष यांपकी काहीही नव्हतो. एकेक अंगरखे उतरविले गेले होते आणि आय. सी. यू.चा गणवेश अंगावर चढला होता. पायजमा कमरेत जमावा तर खाली पाव फूट तोकडा असावा, शर्टाला गुंडय़ा नसाव्यात, पण लांबलचक कापडी नाडय़ांनी गाठी मारता याव्यात.. हे सारं नवं होतं. कारण आता अस्तित्वच मुळी फक्त ‘आय. सी. यू.-आय-१३’ असे उरले होते. पुढचे दहा दिवस तीच माझी ओळख होती. त्याच्याच जोडीला हॉस्पिटलचा एक स्र्ं३्रील्ल३ वल्ल्र०४ी ्रीिल्ल३्रऋ्रूं३्रल्ल ूीि होता आणि त्याला जुळणारा बारकोडही स्टिकर्सवर मिरवत होता. एकसष्ठ वर्षांचे माझे आयुष्य दोन सेंटिमीटरच्या बारकोडमध्ये सामावले गेले होते. माझे वैद्यकीय ज्ञान, अनुभव, पदव्या, पदे, प्रतिष्ठा जणू सारं काही विरघळलं किंवा वितळलं होतं आणि मी फक्त एक करोनाचा रुग्ण म्हणून उरलो होतो.

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
Virat Kohli Dancing on Chiku Chants While Fielding
विराट कोहलीला चिकू हाक मारताच त्यानं फिल्डिंग सोडून केलं असं काही..चाहते झाले थक्क; पाहा Video
hardik pandya
हार्दिकच्या योजनांचे आश्चर्य! बुमराच्या वापरावरून स्मिथकडून मुंबई इंडियन्सच्या कर्णधारावर टीका
IPL 2024 Ravindra Jadeja Comment on Wife Rivaba Instagram Post Goes Viral
IPL 2024: “माझा हुकूम आहे…” पत्नी रिवाबाच्या पोस्टवरील जडेजाची कमेंट व्हायरल

पुढचे दहा दिवस माझ्या क्युबिकलमधून मी फक्त निरीक्षण करू शकत होतो. माझ्याच हृदयाची गती, स्पंदने आणि खालावणारे प्राणवायूचे आकडे. फोनही काढून घेतला गेला.  वर्तमानपत्राचे दर्शनही नाही. बाहेर पावसाळी हवा. काळोखे, कुंद दृश्य मागच्या खिडकीतले.  शेजारच्या रुग्णांपासून पडद्यांनी फारकत केलेली. आणि ते दोघेही व्हेंटिलेटरवर असल्यामुळे जाणिवा-नेणिवांच्या पलीकडे. नस्रेस कामात प्रचंड व्यग्र आणि डॉक्टर मंडळी ठरावीक वेळेला येऊन ठरावीक विषय आणि पुढचे निर्णय याबद्दलच बोलणार. एकाकीपणा म्हणजे काय,  याचा मला खूप मोठा अंगावर येणारा अनुभव आला.

मी गेली ३७ वष्रे ऑपरेशन थिएटर आणि आय. सी. यू.च्या वाऱ्या रोज करत होतो, पण तेव्हा मी दोन पायांवर उभा होतो. बेडवर आडवे पडून वरच्या पांढऱ्या छताकडे पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. आय. सी. यू.तले सगळे उग्र वास माझ्या रोजच्या परिचयाचे होते; पण आता करोनाने माझ्या नाकाचा वास आणि तोंडाची चव पळवली होती.

मला माझ्या मुलाची तीव्रतेने आठवण झाली.  मी त्याला एक पत्र लिहिले. कोणत्याही पापभीरू, मध्यमवर्गीय प्रामाणिक माणसाच्या नीतिमत्तेनुरूप आपल्याला कोणकोणत्या कर्जाचे ई. एम. आय. अजून भरायचे आहेत याचा साद्यंत वृत्तांत लिहिला. ही माझी निरवानिरव होती. व्हेंटिलेटर आणि इतर औषधांच्या वापराचा उल्ल२ील्ल३ ऋ१े सही करून मी डॉ. राहुल पंडितांच्या हाती दिला आणि डोळे बंद केले.

आता ३७ वर्षांत प्रथमच वैद्यकीय क्षेत्रातील असहायतेची जाणीव झाली. कारण मी प्रथमच एक सर्जन म्हणून नाही, तर सीरियस रुग्ण म्हणून विचार करत होतो. वैद्यक सेवेच्या काही मर्यादा आणि काही तातडीने बदलाव्यात अशा गोष्टी आता मला जाणवू लागल्या. तुम्ही intensivist किंवा surgeon बनता तेव्हा तुमचा अर्जुन होतो. त्याला जसा फक्त पोपटाचा डावा डोळा दिसत होता, तद्वैत Surgeon आणि intensivist ला फक्त रुग्णाचे विद्ध शरीर आणि रोग दिसतो. तो आजार हा त्या डॉक्टरचा वैयक्तिक शत्रू बनतो. मला स्वत:ला माझ्याबाबतीत हे अनेकदा जाणवले आहे. जेव्हा जेव्हा एखादा बालरुग्ण माझ्याकडे छातीत, फुप्फुसात किंवा पोटात कॅन्सरची गाठ घेऊन येतो तेव्हा तेव्हा मी इरेला पेटतो. ती गाठ आमच्या भाषेत काढण्याजोगी म्हणजे resectable करणे हे माझे त्या काळातले एकमेव उद्दिष्ट ठरते. मग मी झपाटल्यासारखा त्या रुग्णाच्या मागे लागतो. त्याची गरिबी मला गेल्या तीस वर्षांत कधी आड आली नाही. त्याच्या केमो-रेडिओथेरपीसाठी मी ट्रस्टकडे किंवा माझ्या विविध क्षेत्रांतील धनवान मित्रांकडे भीक मागतो. मला त्याचे जराही वैषम्य वाटत नाही. के. ई. एम.समोरच्या परेल केमिस्टला फोन करून ‘‘मोहन, मला ही ही ड्रग्ज पाठवून दे..’’ हे सांगताना त्याची किंमत मला रोखत नाही. आणि पुढच्या तासाभरात केमिस्टचा माणूस औषधे घेऊन येतो, हा मोहनचा मोठेपणा. ज्या क्षणाला दोन-तीन तासांची लढाई संपवून कॅन्सरची गाठ थिएटरमधून माझ्या हातातून नर्सच्या ट्रॉलीवर विसावते तेव्हा मला एक वेगळेच समाधान लाभते. या साऱ्या गोष्टी माझ्यातल्या सर्जनला सुखावतात, अहंकाराला फुंकर घालतात. आज मला प्रश्न पडलाय- ते पुढचे चार दिवस त्या बाळाला आईपासून दूर आय. सी. यू.त काय वाटत असेल?

करोनाने रुग्ण झाल्यावर माझ्या वैद्यकाचा मला आरसा दाखवला आहे. आय. सी. यू.तल्या रुग्णाला heart, lungs, kidneys  आणि pancreas असतात तसेच एक मन असते.  त्यात काळजी, माया, विरह, ताटातूट आणि तडफड या भावना असतात. त्या कशा आणि कोणी monitor करावयाच्या? जीव वाचवण्याचा प्रयत्न स्तुत्यच; पण जीव लावण्याचा यत्नही कोणी का करू नये? ती १०० टक्के Non-productive Activity म्हणून का गणली जावी? करोनाच्या काळात याचा विचार झाला. मी बरा होऊन कामाला लागल्यावर टास्क फोर्सच्या मीटिंगमध्ये आय. सी. यू. केअरमध्ये कुटुंबातील सदस्यांबरोबरच्या संवादाचा विषय घेतला. ठरावीक वेळेला घरातल्या सदस्यांशी व्हिडीओ कॉल करण्याचा प्रघात सुरू झाला. यापुढच्या काळात हा विषय अधिक महत्त्वाने पुढे जावा आणि सर्व तांत्रिक प्रगती ही केवळ शारीरिक तंदुरुस्तीसाठी न वापरता मानसिक व भावनिक स्थर्य आणि समाधानासाठी वापरली जावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

..फोर्टिसमधून डिसचार्ज घेऊन घरी आलो.  कुटुंबासमवेत बसलो होतो आणि कुटुंबाने एकत्रित सल्ला दिला-  ‘‘अरे, प्रायॉरिटीने सगळी लोन्स फेडून टाक. मागे ठेवू नकोस.’’