28 January 2020

News Flash

संक्षेपात

समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’चे निरूपण करणारे हे पुस्तक. याचे उपशीर्षक आहे, ‘मानवी मनाचे व्यवस्थापन’.

| October 13, 2013 01:01 am

दासबोधाचे सुगम सार
समर्थ रामदासांच्या ‘दासबोधा’चे निरूपण करणारे हे पुस्तक. याचे उपशीर्षक आहे, ‘मानवी मनाचे व्यवस्थापन’. दासबोध हा समर्थ रामदासांच्या चिंतनशीलतेचा, तत्त्वज्ञानाचा आविष्कार आहे. गुरू-शिष्याच्या संवादरूपात दासबोध उलगडला असला तरी त्यात उत्तम नीतिमूल्यांची, चांगूलपणाची आणि व्यावहारिक शहाणपणाची शिकवण मोठय़ा प्रमाणावर आहे. भौतिक जीवनातील सर्वस्वाचा त्याग करून केवळ टाळ कुटत बसण्याचा सल्ला समर्थ रामदास देत नाहीत, तर जीवनात हरघडीच्या समस्यांची उकल करण्याचा सल्ला, मार्गदर्शन आणि प्रबोधन करतात. त्याचे सुगम निरूपण या पुस्तकात केले आहे. त्यामुळे दासबोध समजून घेण्यासाठी या पुस्तकाचा चांगला उपयोग होऊ शकतो.
‘दासबोध दशकसार’ – अरविंद ब्रह्मे, रामदासस्वामी संस्थान, सज्जनगड, पृष्ठे – २४०, मूल्य -१०० रुपये.

भन्नाट भटकंतीच्या गोष्टी
या पुस्तकाचे शीर्षक फारसे आकर्षक आणि विषय नीट स्पष्ट करणारे नसले तरी त्याचे उपशीर्षक- ‘ देश-विदेशातील भन्नाट भटकंतीचा’-मात्र अतिशय उचित आहे. या पुस्तकाचे ‘विदेशी रंग’ आणि ‘विदेशी संस्कृतीचे काही पैलू’ असे दोन विभाग असून त्यात अनुक्रमे नऊ आणि पाच अशी प्रकरणे आहेत. दुसऱ्या विभागातले ‘मी अनुभवलेलं हार्वर्ड बिझनेस स्कूल’, ‘चकित करणारी गुगलची कार्यसंस्कृती’ आणि ‘एका अवलियाचं घर’ हे तीन लेख वेगळे आणि वाचलेच पाहिजेत असे आहेत. इतरही लेख वेगवेगळ्या देशांतील पर्यटनानुभव सांगणारे आहेत. वेगळी आणि चिकित्सक दृष्टी असल्याने हे पुस्तक आनंद, लेखिकेच्याच शब्दांत संजीवनी देऊन जाते. चीन, दक्षिण आफ्रिका, ग्रीस, इजिप्त, अमेरिका अशा अनेक देशांची रंजक सफर घडवून आणतं.
‘पर्यटन : एक संजीवनी’ – डॉ. लिली जोशी, रोहन प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २२३, मूल्य – २०० रुपये.

खेळकर आणि खोडकर
व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांची व्यंगचित्रे जितकी विसंगती टिपतात, उपरोधिक टिपणी करतात आणि अतिशयोक्त कल्पनांनी हसू आणतात, तसेच ते लेखनही करतात. ५३ लेख आणि जवळपास तेवढीच व्यंगचित्रे असे या पुस्तकाचे स्वरूप आहे. हे सर्व लेख सदररूपाने वर्तमानपत्रातून दर रविवारी प्रकाशित होत असल्याने रविवारचा वाचकांचा मूड लक्षात घेऊन केलेले हे लेखन आहे. त्यामुळे त्यात वरवर साध्या वाटणाऱ्या घटनांवर रेशमी चिमटे काढत, त्यातील विरोधाभास टिपत खेळकरपणा जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. संडे म्हणजे सेलिब्रेशन, असे समीकरण असल्याने आठवडय़ाच्या गोळाबेरजेवर चेष्टा, मस्करी, अतिशयोक्ती आणि उपहास हा उतारा देण्यातून या लेखनाची निर्मिती झाली. पुस्तकरूपात सलग वाचताना मात्र ती जरा जास्त वाटते. पण तरीही हे पुस्तक वाचनीय आहे, हे नक्की.
‘संडे मूड’- मंगेश तेंडुलकर, स्नेहल प्रकाशन, पुणे, पृष्ठे – २२३, मूल्य – २२५ रुपये.

‘त्यांना’ समजून घेण्यासाठी..
हे पुस्तक मानसिक आजाराविषयी आहे. लेखिका स्वत: मानसोपचारतज्ज्ञ असल्याने त्यांनी वाचकांना विश्वासात घेत वेगवेगळ्या समस्या उलगडून सांगितल्या आहेत. ‘अवघड माणसे’ – डॉ. अनुराधा सोवनी, उन्मेष प्रकाशन, पुणे,
पृष्ठे – ९६, मूल्य – ९० रुपये.    

First Published on October 13, 2013 1:01 am

Web Title: manavi manache vyavsthapan book on dasbodh
Next Stories
1 स्टीव्ह जॉब्जपश्चात…
2 चॉकलेट्स आणि कोको
3 पाहिले म्या डोळा…
Just Now!
X