मनोज बोरगावकर
विनोद म्हणजे आयुष्याच्या सीरियसली काढलेल्या नोट्स असतात. आणि हे ज्याला उमजतं त्याचा विनोद अभिजाततेच्या मार्गाने मार्गस्थ होतो. गेली तीस वर्षे सातत्याने आणि निष्ठेने विनोदी लेखन करणारे डॉ. रवींद्र तांबोळी याच पठडीतले लेखक. बोलता, वागताना विनोद करणे तसे सोपे असते, पण विनोद कागदावर उतरवून वाचकाची आवड रुदांवणे तसेही फार अवघड असते. कारण बोलताना हावभाव, बोलण्याचे टोन, अंगविक्षेप यांचा आधार घेऊन विनोदाला खुमारी देता येते आणि सामोरासमोर प्रतिसाद मिळत असल्याकारणाने विनोद किती स्ट्रेच करावा याचे संकेत मिळतात. कागदावर विनोद उतरवताना या कशाचाही आधार नसतो… त्यामुळे ती फार नफिस अशीच करामत असते… आणि ही करामत ‘फुकटचेच सल्ले’ या पुस्तकातून डॉ. रवींद्र तांबोळी यांना सहजी जमली आहे असेच वाटत राहते. रवींद्र तांबोळी यांच्या विनोदाचे आणखी एक वैशिष्ट्य अधोरेखित करावे ते म्हणजे रवींद्र यांचा विनोद तुम्हाला कोणतीही इजा न करता नि:शस्त्र करणारा असाच आहे. आमची अविरत प्रेमकरणे… या पहिल्याच घडामोडीत आपण इतके आकंठ बुडतो की बास रे बास आणि याचा शेवट ज्या ओळीने होतो ती ओळ इतकी कलात्मक आहे की फार मोठा अवकाश ती फार लीलया पेलून जाते. ‘तात्पर्य काय तर हिरव्या पानाचा देठ हा पोपटीच असतो.’ हे वाक्य वाचल्यानंतर वाटतं की या माणसाला विनोदातला विनोदच नाही तर विनोदातले काव्यदेखील सापडले आहे.

टोकाच्या विसंगत गोष्टींमध्ये एक संगती असते. ती अधोरेखित करण्यासाठी विनोदाएवढे भक्कम माध्यम नाही याचे सजग भानही आहे. कुठं थांबावं हे न कळल्यामुळे अनेक महेफिलीचा विचका झालेला आपण पाहतो. आपला विनोद किती स्ट्रेच करावा याचे जातिवंत भान रवींद्र यांना आहे. लेखनाचे नेमके एडिटिंग झालं नाही तर त्याचाही विनोद होऊन बसतो. त्यामुळे एडिटिंगवर झालेले काम ही या लेखसंग्रहाची जमेची बाजू आहे. रान मोकळे आहे म्हणून पेरत राहिले तर उगवायचा राहत नाही, पण जमिनीचा कस खालावतो याचे भान असलेला हा अस्सल विनोद आहे. पुस्तक वाचून संपल्यावरही दरवळत राहतो. आधुनिक लेखकाविषयी म्हटले जाते ‘Modern wrighter adds too much water to there ink!’ रवींद्र तांबोळी यांनी हे टाळून अत्यंत घोटीव पद्धतीने फुकटचेच सल्ले मधल्या विनादाचा बाज मोठ्या अस्सल पद्धतीने सांभाळला आहे.

bold novel on an uncommon subject dubhangalel jivan
अचर्चित विषयावरची धाडसी कादंबरी
Shyam Manohar, Shyam Manohar's stories, Deep Societal Insights, story on contemporaray situation, story on contemporaray political situation, lokrang article, loksatta lokrang,
म्हणा…
Putin, Putin news,
केवळ योगायोग…!
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Loksatta lokrang Documentary A journey of professorial documentaries Film Institute
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : माझ्या आयुष्यातील रजतयोग!
Loneliness, Loneliness of Life , Life Without a Partner, life partner, Emotional Isolation, chaturang article, marathi article,
‘एका’ मनात होती : जोडीदाराशिवायचं एकटेपण!
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Parables of lok sabha election 2024 marathi news
निवडणूक निकालाच्या बोधकथा…!

हेही वाचा : ‘ईव्हीएम’चा प्रवास वाद आणि प्रवाद…

लेखक जेव्हा स्वत:साठी आम्ही हा शब्द वापरून आपल्या लेखनाची सुरुवात करतो; तेव्हा आपोआप वाचकाच्या चेहऱ्यावर हास्याची लकेर तरळते. आत्मपर विनोद हे या लेखनाचे आणखी एक बलस्थान म्हणावे लागेल. आगळीवेगळी शब्दकळा घेऊन हा विनोद अधिक उन्नत होत जातो. मासल्यादाखल वापो (वाढलेले पोट), मुखग्रंथ, सुखसंक्रमण असे अनेक शब्द या लेखसंग्रहात मुबलक प्रमाणात आढळतात.

एका ‘असामान्य सामान्याचे बालपण’ हा लेख वाचताना तर आत्मपर विनोदाचे उत्तम उदाहरण आहे. या लेखातील जखमजुडीमुळे त्यावेळी लेखकाच्या शरीराची जखम खरोखरंच भरली का नाही हे माहीत नाही. पण हा लेख सभोवार पसरलेल्या दु:खावर मलमासारखे काम करतो हे खरे!

हेही वाचा : आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : निसर्गसंवर्धनाची गाथा

या लेखनप्रपंचातल्या काही ओळी अधोरेखित करण्याचा मोह मला आवरता येत नाही. ‘‘हे दशक प्रत्येक मराठी माणसाच्या हाती छोटा पडदा असलेले अँड्राईडधारी साधन देऊन गेले. त्यावर काहीही अक्षर टाइप करून लिहिता येई. यात केवळ अंगठ्याचा उपयोग गरजेचा असे. प्रत्येक मराठी साक्षर या अर्थाने अंगठेबहादर होत गेला.’’ केवढा अस्सल आणि नजाकतदार विनोद. अर्थाचे पदर अलगद बाजूला करून शब्दांना अत्यंत लवचीकपणे हाताळता हाताळता त्यांना पीळ न पडू देण्याची नफीस करामत डॉ. तांबोळी यांच्या लेखनाची खास अदा आहे.
‘फुकटचेच सल्ले’, – डॉ. रवींद्र तांबोळी, मनोविकास प्रकाशन, पाने- १३२, किंमत-१९० रुपये.