माधव गाडगीळ

गेल्या पाच तपांचे सखोल संशोधन, भारतातील निसर्गाची अन् जीवशास्त्राची अद्भुत कोडी सोडवणारा प्रदीर्घ व्यासंग आणि सामान्यातल्या सामान्य माणसाप्रति मानत असलेले उत्तरदायित्व या साऱ्यांचे विलक्षण मिश्रण म्हणजे पद्मभूषण माधव गाडगीळ. साहित्यिक अंगाने अन् ललितशैलीने नटलेल्या या निसर्गवैज्ञानिकाचे आत्मवृत्त ‘सह्याचला आणि मी : एक प्रेमकहाणी’ राजहंस प्रकाशनातर्फे अलीकडेच प्रकाशित झाले. या आत्मचरित्रातील निवडक भाग.

up pharmacy college latest news
पेपरमध्ये लिहिलं ‘जय श्रीराम, पास होऊ देत’, विद्यार्थी ५६ टक्क्यांनी उत्तीर्ण! दोन प्राध्यापकांची झाली गच्छंती
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड
Biopic ‘Amar Singh Chamkila’ released
अमर सिंग चमकीला यांचा चरित्रपट प्रदर्शित; २७ व्या वर्षी हत्या झालेले ‘एल्विस ऑफ पंजाब’ नेमके कोण?
Child beaten teacher pune, pune,
पुणे : शिक्षिकेकडून मुलाला बेदम मारहाण; समाजमाध्यमात चित्रफीत प्रसारित

मुंबई विद्यापीठात प्राणिशास्त्रात सागरी जीवशास्त्र विषय उपलब्ध होता. परिसरशास्त्राच्या जवळचा म्हणून इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समध्ये एमएस्सी करायला मुंबईला गेलो. मुंबईत सह्यगिरीइतकाच सागराच्या प्रेमात पडलो. उत्साहाने मासेमारी धक्क्यांकडे आणि मासळी बाजाराकडे चकरा मारत मासे, मासेमारीबद्दल शिकत राहिलो. पुळणी आणि चिखलाट समुद्रकिनाऱ्यांवर जाऊन तिथल्या प्राणिजीवनाचे निरीक्षण केले. एमएस्सीला एका संशोधन निबंधाचा पर्याय होता. मला शास्त्रीय संशोधनाला आरंभ करायचा होताच. तेव्हा मी मांदेली माशाचा अभ्यास करायचे ठरवले.

हेही वाचा >>> पुरोगामी बापाच्या मुली..

आमच्या महाविद्यालयाच्या ग्रंथालयात ग्रंथांचा, शास्त्रीय नियतकालिकांचा उत्तम संग्रह होता. मनापासून वाचायला लागलो. बेव्हर्टन व होल्ट या दोघा शास्त्रज्ञांनी आपल्या संशोधनात गणिताचा झकास वापर केला होता. मला गणिताची आवड होती. बीएस्सी करताना मुद्दाम घरी गणित शिकून घेतले होते, तेव्हा हे संशोधन उत्साहाने वाचले. माशांच्या गणसंख्या कशा बदलतात, मासे किती जगतात, किती पिले घालतात, त्यांची वाढ काय गतीने होते या प्रश्नांवर त्यांनी उत्तम दर्जाचे काम केलेले होते. ते समजावून घेऊन मांदेलीवरचे संशोधन सुरू केले. त्यासाठी आठवडय़ातून एकदा पहाटे मासेमारी धक्क्यावर जाऊन मासे घेऊन यायचो. मासेमारांशी, त्यांच्या सहकारी संस्थेच्या सचिवांशी दोस्ती केली. एक छानसा प्रबंध पुरा केला.

मुंबईत असताना मी सिमदराच्या मेव्यावर मनसोक्त ताव मारला. आमच्या घरी अंडय़ाखेरीज दुसरे काहीही अभक्ष्य भक्षण केले जायचे नाही. केंब्रिजला शिकलेले, घराबाहेर मांसाहारी बाबाही घरात त्याचा आग्रह करत नसत. पण त्यांचे खास जवळीक असलेले मावसभाऊ शंकरकाका मुंबईत राहायचे आणि त्यांच्या गोव्याच्या पत्नी माणिककाकू मोठय़ा सुगरण होत्या; त्यांच्याकडे रोज कायम मासे-िझगे-कोळंबी-खेकडे-शेवंडांची मेजवानी असायची. दर सुटीच्या दिवशी मी यांचा समाचार घ्यायचो.

जपानी ट्रॉलरवर याच्या पुढचे पाऊल उचलत मी सिमदराचा कच्चा मेवा खायला शिकलो. आपल्या मच्छीमारांना या नव्या तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण द्यायला जपान्यांनी एक ट्रॉलर मुंबईला पाठवला होता. मी त्या ट्रॉलरवर दिवसा दिवसाच्या दोन सफरी केल्या. पहिल्याच वेळी त्यांनी जाळय़ात सापडलेला एक भला मोठा अजून जिवंत खेकडा उचलला आणि त्याची नांगी तोडून जणू काय काकडी खातो आहोत असे तिच्यातले कच्चे मांस खायला सुरुवात केली. मला नव्या नव्या चवींचा आस्वाद घेण्याची अतोनात हौस आहे, तेव्हा मीपण त्यांच्या बरोबरीने हे ताज्या खेकडय़ाचे मांस खाऊन पाहिले. मोठे खुसखुशीत, चविष्ट होते.

हेही वाचा >>> ‘शिवराज्याभिषेक’ ग्रंथाची निर्मितीकथा

मुंबईचे मच्छीमार ट्रॉलरच्या उपयोगाबद्दल साशंक होते. म्हणाले, ‘सुरुवातीला खूप मासे सापडतील, पण या ट्रॉलरने समुद्राचा तळ खरडून काढला जातो आणि याच्यातून माशांच्या विणीवर वाईट परिणाम होऊन दूरच्या पल्ल्याने मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.’ आज त्यांचे हे भाकीत खरे ठरले आहे. मच्छीमार जी मांडणी करत होते त्याला आता ‘सावधानतेचे तत्त्व’ (Precautionary principle) म्हणतात.

‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’चे हॉर्नबिल हाऊस आमच्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्सच्या जवळच होते. सलीम अली तिथे जवळजवळ रोज यायचे तेव्हा मी दुपारी जेवायच्या सुटीत पुष्कळदा जाऊन त्यांच्याशी गप्पा मारायचो. मी त्यांना त्यांच्या संशोधन प्रकल्पाबद्दलच्या कल्पना विचारल्या. जरी त्या आकर्षक होत्या, तरी मला केवळ तशा वर्णनात्मक कामापुरते मर्यादित राहायचे नव्हते.

मी मुंबईला एमएस्सी करत असताना पुढे काय करायचे याची घरी चर्चा झाल्यावर सांगितले की, उच्च शिक्षणासाठी मला हार्वर्ड किंवा स्टॅनफर्डसारख्या एखाद्या चांगल्या विद्यापीठात जायला आवडेल. आई-बाबांची अनुमती होती; पण आई मला म्हणाली, ‘अरे तू गद्धेपंचविशीत तिथे असशील; एखाद्या परदेशी मुलीच्या प्रेमात पडशील. ते काही मला आवडणार नाही. तेव्हा आताच तुला कोणत्याही जातीची, धर्माची – ती एखादी सालीम अलींच्या नात्यातली मुसलमान किंवा तू नेहमी कौतुक करतोस तशी फग्र्युसन कॉलेजच्या मुलींच्या हॉकीच्या संघाची कप्तान रिटा ही बेने इझ्रेली ज्यू असली तरी माझी काहीही हरकत नाही. पण आपल्याकडली कोणतीही मुलगी तुला आवडली असेल, तर तिच्याशी लग्न करून टाक.’ मी म्हणालो, ‘अशी एकच आहे सुलोचना फाटक. पण माझी तिची प्रत्यक्ष ओळख नाही. जर ती हो म्हणाली, तर मी खुशीत लग्न करेन, एरवी नाही.’ आई सगळे तडकाफडकी करायची. म्हणाली, ‘म्हणजे डॉ. फाटकांची मुलगी ना? इंदुताईंना विचारते.’ संध्याकाळी फग्र्युसन कॉलेजचा वार्षिक अंक बरोबर घेऊन त्यांच्या घरी गेली. त्या अंकात एका पानावर उत्तम गुण मिळाल्याबद्दल शिष्यवृत्ती मिळालेल्या मुला-मुलींची छायाचित्रे होती. त्यात सुलोचनाचे आणि माझे शेजारी-शेजारी होते. दुसऱ्या पानावर महाविद्यालयाच्या अ‍ॅथलेटिक्स चमूचे छायाचित्र होते. त्यात मी कप्तान म्हणून झळकत होतो. तीन दिवसांत फाटकांकडून निरोप आला, की आमची संमती आहे. बाबा खूश झाले, कारण त्यांचा सुलोचनाचे आजोबा डॉ. व्ही. डी. फाटक यांच्याशी परिचय होता. मुळशीच्या सत्याग्रहात ते सेनापती बापटांचे मुख्य साथीदार होते. 

हेही वाचा >>> कण.. कण.. हत्या

त्या वेळी हिंद महासागराच्या अभ्यासाची एक आंतरराष्ट्रीय मोहीम सुरू होती. मला एखाद्या चांगल्या विद्यापीठात पीएचडी करण्याची इच्छा होती. तेव्हा मी हार्वर्डला जैविक सागरशास्त्रात प्रवेशासाठी अर्ज केला. हार्वर्डचे मत्स्यशास्त्रज्ञ जाईल्स मीड हे या मोहिमेत सहभागी होते. मला हार्वर्डकडून उत्तर आले, की जाईल्स मीड मुंबईला येणार आहेत. ते तुझी मुलाखत घेतील. मी भेटलो. मोठे दिलखुलास व्यक्तिमत्त्व होते. माझ्याशी दोन तास माझ्या शास्त्रीय कामावर गप्पा मारून म्हणाले, ‘ठीक आहे, मी शिफारस करतो.’ महिनाभरात हार्वर्डकडून उत्तर आले की तुला प्रवेश व शिष्यवृत्ती देताहोत.

दरम्यान, सुलोचनाशी लग्न ठरले. तिला म्हटले की, तूपण  पीएचडी करायचा विचार कर. तिला ती कल्पना आवडली.  मी सागरी जीवशास्त्रात काम पुढे करण्याच्या विचारात होतो, म्हणून तिने फिजिकल ओशनोग्राफीत काम करायचे ठरवले. आम्ही जोडीने हार्वर्ड, स्टॅनफर्ड अशा काही चांगल्या विद्यापीठांत अर्ज केले. सुदैवाने सुलोचनालाही हार्वर्डला प्रवेश मिळाला. दोघांनी एमएस्सी संपता संपता लग्न केले आणि वयाच्या तेविसाव्या वर्षी १९६५ सप्टेंबरला हार्वर्डकडे कूच केले. हार्वर्ड विद्यापीठाने मोठय़ा अगत्याने सुलोचनाचे व माझे स्वागत केले. जीवशास्त्रात पीएचडी करणारा आल्बर्ट आणि संशोधन सहायक म्हणून काम करणारी त्याची पत्नी कॅथी रुएसिंक आमचे यजमान होते. आल्बर्ट  दुसऱ्या दिवशी मला हार्वर्डच्या परिसरशास्त्र आणि उत्क्रांतीशास्त्र विषयात काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना भेटायला घेऊन गेला. आम्ही म्युझिअम ऑफ कम्पॅरेटिव्ह झूऑलॉजीत तिथल्या वेगवेगळय़ा प्राण्यांचे अवशेष साठवलेल्या कपाटापुढून चालत चालत अपृष्ठवंशीय प्राण्यांचा क्युरेटर म्हणून काम करणाऱ्या हॉवर्ड बॅरॉक्लो फेलच्या खोलीत पोचलो. फेल समोर एक समुद्रसाळूंनी भरलेले तबक घेऊन त्यांचा अभ्यास करत होता. ते बाजूला ठेवून मी कुठला, काय शिकलो आहे अशा थोडय़ा गप्पा मारल्या आणि मग मला काय प्रकारचे काम करण्याची इच्छा आहे असे विचारले. माझा माशांवर काम करायचा विचार आहे असे सांगितल्यावर म्हणाला की, मग तू जाईल्स मीडच्या गटात सामील होणार आहेस आणि मला मीडच्या खोलीकडे घेऊन गेला. मीडने माझे मोठय़ा उत्साहाने स्वागत केले आणि मी त्याच्या खूशखबर विद्यार्थ्यांच्या गटात सामील झालो. हा एक ग्रीक, एक न्यूझीलंडचा, मी आणि चार अमेरिकेतील असा संच होता. त्यातल्या जाईल्स मीडला आणि एका अमेरिकी विद्यार्थ्यांला स्कुबा डायव्हिंगचा छंद होता. पुढची चार वर्षे या सगळय़ांबरोबर मोठय़ा आनंदात गेली.