डॉ. मोहसीना मुकादम
खाद्यासंस्कृतीमध्ये कोश वाङ्मय महत्त्वाचे आहे. आपल्याकडे खाद्यासंस्कृतीच्या साहित्याचे दस्तावेजीकरण झाले नाही, कारण तो विषय आपण गांर्भीयाने घेत नाही. आता कॉफीटेबल बुक्स आली आहेत. ऑगस्ट महिन्यात खाद्याला वाहिलेले अंक असतात. आज आपण सर्रास हॉटेलांमध्ये जाऊन खातो. स्वीगी, झोमॅटोवरून सहज अन्न मागवतो. परंतु एक काळ असा होता की खानावळीत खाणे फार चांगले मानले जात नसे. कारण घरातली बाई जेवण बनवत नाही हे पाप असल्यासारखे मानले जाई.

इंग्रजीत फूड बायोग्राफी आहेत परंतु मराठीत नाहीत. मराठीत खानावळीवर उत्तम लेख आहेत. ते गाजलेही… यातून तत्कालीन समाज कळतो. त्या समाजाची मानसिकता कळते. बटाटा आणि टोमॅटोची रंजक गोष्ट आहे. टॉमॅटोचा रंग, त्याचा लिबलिबितपणा यामुळे ते मांसफळ मानले जात असे. भाजीविक्रेेतेही अन्य भाज्यांबरोबर टॉमेटो आणत नसत. इतका तो त्याज्य मानला जात असे. पण आता तो आपल्या आहारात सहज मुरला आहे. बटाटाही आपण नाकारला होता, परंतु आपल्या जेवणात मोठ्या प्रमाणात वापरला जातो. सुपशास्त्रामध्ये जर आपण बघितले तर बटाट्याच्या फक्त दोन पाककृती आहेत, टोमॅटोची एकही पाककृती नाही. समाज सुधारकांच्या घरीदेखील टोमॅटो चिरण्यासाठी वेगळी विळी होती.

आपल्याकडे जातीयता ही खाद्यासंस्कृतीच्या बाबतीत किंवा सुगरणपणाच्या बाबतीत मारक नसून ती तारक आहे. मुस्लिम संस्कृतीतले पुलाव, बिर्याणी, कबाब, कोरमा असे अनेक पदार्थ सहजपणे आपण स्वीकारलेले आहेत. त्यामुळे केवळ आपल्याच खाद्यासंस्कृतीचा अतिरेकी अभिमान बाळगू नये.पातळीवर स्थान प्राप्त करून देऊ शकू.