डॉ. संजय ओक sanjayoak1959@gmail.com

यावर्षी पावसाने खरोखरच कहर केला. पूर, ढगफुटी, तलावभरती आणि विध्वंस.. किती म्हणून संकटे साहायची? या साऱ्या उच्छादामुळे साहेबाचे गाणे आठवले..

Shani Maharaj & Budh Made Panchgrahi Yog On Hanuman Jayanti
हनुमान जयंतीला शनी- बुधाचा पंचग्रही योग बनल्याने ‘या’ राशींचे नशीब घेईल कलाटणी; चहूबाजूंनी बरसणार अपार श्रीमंती
Loksatta chaturang Decisive women vote in election
निर्णायक ठरणारी स्त्री-मतं!
Martand Sun Temple, Kashmir
विश्लेषण: काश्मीरमधील १६०० वर्षे जुने मार्तंड सूर्यमंदिर उद्ध्वस्त करणारा ‘तो’ परकीय आक्रमक कोण?
Guru Gochar 2024
गुरु कृतिका नक्षत्रात करणार प्रवेश, या राशींच्या लोकांचा होईल भाग्योदय, धन-संपत्तीत होईल चांगली वाढ

‘Rain, rain go away

 little Johnny wants to playl

जॉनीच काय, जनार्दन, जनू, जन्या आणि जमालचीही तीच मन:स्थिती झाली आहे. त्यात करोनाचा कहर. विपन्नावस्था, वैराग्य आणि विध्वंसाच्या त्रिशूलाचा ताप सहन करत असतानाचा आश्विन आला आणि मला दुर्गाबाई भागवतांच्या ‘ऋतुचक्रा’ची आठवण झाली. मला मॉडर्न हायस्कूलमधील मराठीचा दहावीचा तास आठवला. ‘सोनेरी आश्विन’ हा दुर्गाबाईंचा ललित लेख पुस्तकात होता. मला तो सुरुवातीला अतिशय क्लिष्ट वाटला. मी तो ऑप्शनला टाकला. पण जसजसा ऑक्टोबर महिना आला आणि आश्विन महिन्याने सोनेरी रंगाची उधळण पानाफुलांवर केली, तसतसा मला त्या लेखातील शब्दाशब्दांचे प्रतिबिंब आजूबाजूच्या निसर्गात उमटलेले दिसू लागले. दुर्गाबाई एका अहिरी लोकगीतामधील बाभळीच्या गळत्या पानांचे सुंदर वर्णन करताना लिहित्या होतात. बाभळीची गळती पाने म्हणजे जणू एक-एक मोत्याचा दाणाच!

‘पानामें पाना बाम्बुरस पाना

एकेक दाना गिरे मोतियन दाना’

आश्विन मास आपल्याबरोबर घटस्थापनेचा शुभशकुन घेऊन आला आणि सर्वव्यापी शुभंकराची, मांगल्याची जाणीव होऊ लागली. नऊ दिवसांचा सोहळा, नऊ रंग आणि देवीची नऊ रूपे! आज या लेखातून नव्या अर्थाने, नव्या रंगरूपाने मी या प्रतीकांचा धांडोळा घेऊ इच्छितो.

शारदीय नवरात्रारंभ करणारा पहिला दिवस माता शैलपुत्रीचा. ही पर्वतकन्या म्हणून पार्वती. भवानी आणि हेमवती हीसुद्धा तिचीच रूपे. दोन हात आणि कपाळावर चंद्रकोर. साक्षात् पर्वतराज हिमालयाची कन्या. नदीवर आरूढ आणि हातात कमलपुष्पे. मूलचक्राची ती देवी आहे. घटस्थापनेतून स्त्रीशक्तीचा संदेश देणारी ही शैलपुत्री नवरात्रीची पहिली मानकरी.

नवरात्रीचा दुसरा दिवस ब्रह्मचारिणीचा. या दिवसाला मान शुभ्रतेचा. शुभ्रता म्हणजे आरस्पानी पवित्र, शुद्धता आणि ध्यानसमाधीचा सहयोग. ब्रह्मचारिणी श्वेतवस्त्रा आहे. आणि एका हातात रुद्राक्षांची माळ, तर दुसऱ्या हाती कमंडलू आहे. बुद्धिचातुर्य, निष्ठा आणि स्नेह यांचे प्रतीक इथे व्यक्त होते. शुभ्रतेला केवळ आडवा विस्तार नसतो, तर एक उभी खोलीही लाभते. कोणत्याही स्थळाला व्याप्ती द्यायची असेल तर शुभ्रतेचे शिंपण हवे. शुभ्रता ही नव्याच्या प्रारंभाला आमंत्रण देणारी ठरते. मार्केटिंगच्या क्षेत्रातही शुभ्रतेचा वापर मुक्त हस्ते केला जातो. हेवलेट पॅकार्ड, फोक्स-व्ॉगन, स्टारबक्स, फिशर-प्राईस या नामांकित कंपन्यांची बोधचिन्हे पांढऱ्याचे महत्त्व अधोरेखित करतात.

तिसरा दिवस म्हणजे चंद्रघंटेची सत्ता. देवी चंद्रघंटेचा महिमाच आगळा. शौर्य, पराक्रम आणि धाडसाचे हे द्योतक. लाल रंग रक्ताचा, सळसळत्या साहसाचा आणि धडधडत्या हृदयाचा. लाल रंग रागाचा आणि अनुरागाचाही. सशक्त, निरोगी अस्तित्वाचा आणि स्नेहमयी सर्वकालीन सहवासाच्या तत्त्वाचा. लाल रंग उत्कटतेचा, अनिर्बंध ऊर्जेचा, भौतिक स्थर्याचा आणि आध्यात्मिक आत्मशांतीचा. देवीचे हे रूप म्हणजेच चंद्रिकेचे आणि रणचंडीचे. त्रिशूळ व कमळाचा वापर आणि व्याघ्रारूढ रूप.

चौथ्या दिवसाची पूजाअर्चा देवी कुष्मांडाची.  आपल्यातून उष्ण, वैश्विक ऊर्जेचे उत्सर्जन करणारी अष्टभुजा. आरोग्यवर्धक आणि साऱ्या विश्वाची निर्माती. केवळ आपल्या स्मिताने जीवनात चतन्य भरणारे हे देवीचे अनोखे रूप. सूर्यशक्तीचा स्रोत अशी ही कुष्मांडा.

पाचवा दिवस स्कंदमातेचा. कार्तिकेयाची जननी त्रिनयना, चतुर्भुजा, सिंहाधिष्ठित, अभयमुद्रेत बसणारी ही माता. कमळात स्थान ग्रहण केले की पद्मासनी म्हणून ओळखली जाणारी ही देवी. आशा आणि सकारात्मकतेचे प्रतीक. अग्नीची देवता हा मानही स्कंदमातेला प्राप्त झाला आहे.

सहावा दिवस देवी कात्यायनीचा. प्रत्यक्ष महिषासुरमर्दिनीच ती. अगदी ४, १० किंवा १८ हात आणि दुष्टसंहाराचे सूचक प्रतीक. कोल्हापूर आणि तुळजापूरची शक्तिपीठे ही छत्रपतींची प्रेरणास्थाने. आणि शिवरायांना भवानी तलवार देणारे रूप कात्यायनीचेच!

सातवा दिवस देवी कालरात्रीचा. असुरांचा संहार करणारी, नकारात्मक भावनांचे दमन करणारी ही शुभंकर देवी. दुर्गेचे हे सर्वात हिंसक आणि भयकारी स्वरूप. सर्व वाईट गोष्टींच्या संहाराचे हे प्रतीक. काल म्हणजे साक्षात मृत्यू, त्याचेही दमन करणारी ही कालरात्री. धर्य आणि शांती ही वरदाने भक्ताला कालरात्रीकडून प्राप्त होतात.

आठवा दिवस महागौरीचा. पावित्र्य, शांतता इथे एकत्र नांदतात. शाळकरी मुलींना घरी बोलावून ‘कंजाक पूजा’ ही प्रथा पाळून त्यांचा सन्मान केला जातो.

नववा दिवस सिद्धिदात्रीचा. सर्व मनोकामना पूर्ण करणारी ही दुर्गेची प्रतिमा. कमळ, गदा, चक्र आणि शंखधारिणी सिद्धीदात्री हे देवी पार्वतीचे मूळ रूप होय. अष्टसिद्धींची ही स्वामिनी आहे आणि प्रत्यक्ष भगवान शंकरांना या सिद्धी तिच्याकडूनच प्राप्त झाल्या आहेत.

या नऊ दिवसांत उत्साहाला उधाण येईल. जांभळ्या, तांबडय़ा, निळ्या, पिवळ्या, मोरपंखी रंगांची उधळण होईल. प्रत्येक रंग उत्साह, उमेद, धर्य, सळसळ यांचे प्रतीक बनेल. एकेका दिवशी त्या, त्या रंगांच्या साडय़ा परिधान केलेल्यांचे दिमाखदार ग्रुप फोटो येतील. या संपूर्ण नऊ दिवसांत कार्यालये सजतील. पण रस्त्यावर उन्हातान्हात उभ्या राहणाऱ्या माझ्या पोलीस भगिनी आणि रखरखाटाची पर्वा न करता पत्रे वाटणाऱ्या माझ्या पोस्टवुमन ताई आपापल्या खाकीमध्ये; तर रुग्णालयात राबणाऱ्या माझ्या सिस्टर्स आपल्या पांढऱ्या युनिफॉर्ममध्ये हे नऊ रंग शोधतील. त्यात कर्तव्यपूर्तीचे समाधान असेल. सद्रक्षणाय, खलनिग्रहणाय आणि स्वास्थ्यवर्धनाचे उद्देश असतील. त्यांच्याप्रति सन्मान, स्नेह, सद्भावना व्यक्त करण्याचे कर्तव्य मात्र आम्हा पुरुषांनाच पार पाडावे  लागेल. एकवटलेली देवीची सगळी रूपे पाहायला मग आम्हाला देवळात जावे लागणार नाही. घरात किंवा ऑफिसात, रस्त्यात किंवा रुग्णालयात ती आमच्या अवतीभोवतीच असतील.

नजारे नतमस्तक होण्यासारखे आहेतच; गरज आहे ती आमची नजर बदलण्याची!