सांगली जिल्ह्यातील एक लाख आठ हजार नावे पुणे लोकसभा मतदारसंघात घुसवण्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली असून योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
भाजप प्रवक्ते माधव भांडारी आणि कायदा विषयक आघाडीचे विनायक अभ्यंकर यांनी केंद्रीय निवडणूक उपायुक्त सुधीर त्रिपाठी यांची रविवारी नवी दिल्लीत भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणला. दोन्ही मतदारसंघात समान नावे असून या मतदारांवर कारवाई करण्यात यावी, त्यांच्या ओळखपत्रांची काटेकोर छाननी केल्याशिवाय मतदान करण्याची परवानगी देऊ नये, असे निवेदन भाजपने निवडणूक आयोगाला दिले आहे. पुणे जिल्ह्य़ात शिरूर येथे नरेंद्र मोदी यांच्या थ्रीडी सभेचे साहित्य नेणाऱ्या गाडय़ा पोलिसांनी अडवून त्रास दिला व आचारसंहितेचा गैरवापर केल्याची तक्रारही आयोगाकडे करण्यात आली आहे.