07 July 2020

News Flash

निवडणुकीनंतर काँग्रेसचे तिसऱ्या आघाडीला बळ?

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी याां रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा, असा मतप्रवाह काँग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे.

| April 27, 2014 01:38 am

लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसला बहुमत मिळाले नाही तर नरेंद्र मोदी याां रोखण्यासाठी तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा, असा मतप्रवाह काँग्रेसच्या वर्तुळात सुरू आहे. काँग्रेसने तिसऱ्या आघाडीला पाठिंबा द्यावा, अथवा सरकार स्थापनेसाठी गरज भासल्यास तिसऱ्या आघाडीची मदत घ्यावी, असे मत केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद यांनी शनिवारी व्यक्त केले आहे.
राममंदिर प्रश्नावरून भाजपला एकेकाळी मिळालेल्या बहुमताचा उल्लेख करीत खुर्शीद म्हणाले की, देवाची लाट काँग्रेसला थोपवू शकली नाही, तर मोदीलाट काँग्रेसची लाट कशी थोपविणार? मोदी हे देशासाठी किंवा काँग्रेससाठीच नव्हे तर भाजपसाठीही मोठी समस्या ठरणार आहेत, असेही ते म्हणाले.
यूपीए ३ अशक्य नाही
काँग्रेस आघाडीला पुन्हा सरकार स्थापन करता येणे अशक्य नाही, असे मत पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 27, 2014 1:38 am

Web Title: congress could extend support to third front to form govt salman khurshid
Next Stories
1 वाढत्या गुजराती टक्क्य़ामुळे शिवसेना-मनसेपुढे आव्हान
2 काँग्रेसला अल्पसंख्याकांचे अपेक्षित मतदान नाही
3 मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावास भाजप,राष्ट्रवादीचा विरोध
Just Now!
X