07 July 2020

News Flash

पुण्यातील मतदारांची नावे गहाळ : : संबंधितांवर कारवाईसाठी याचिका

पुणे येथील मतदार यादीतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.

| April 22, 2014 12:02 pm

पुणे येथील मतदार यादीतून सुमारे एक लाख मतदारांची नावे गाळणाऱ्या जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी वर्गावर फौजदारी कारवाईची मागणी करणारी जनहित याचिका सोमवारी उच्च न्यायालयात करण्यात आली.
दरम्यान, अशाप्रकारे मतदारांची नावे गाळून त्यांना मतदानाच्या अधिकारापासून दूर ठेवणे म्हणजे लोकशाहीत त्यांच्या मूलभूत अधिकारावर घाला घालण्यासारखे असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. मात्र मतदान हा मूलभूत अधिकार नसल्याचे आणि निवडणुकीबाबत कुठलाही दिला जाऊ शकत नसल्याचे स्पष्ट करीत याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे दाद मागण्याची सूचना न्यायालयाने केली. त्यावर हे प्रकरण गंभीर असल्याचे याचिकाकर्त्यांनी सांगितल्याने अखेर पुढील आठवडय़ात याचिकेवर सुनावणी घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले.
मतदार यादीत नाव नसल्याने मतदानापासून वंचित राहिलेल्या पुणे येथील प्रताप गायकवाड यांनी अ‍ॅड्. व्ही. पी. पाटील यांच्यामार्फत ही याचिका केली असून न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठासमोर ती सादर करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 22, 2014 12:02 pm

Web Title: erased pune voters pil for action against collectorate staff
Next Stories
1 मोदींची वैवाहिक स्थिती : निवडणूक आयोगाकडून तक्रारीची छाननी
2 मुस्लिम बांधवांपर्यंत पोहोचणे ही जबाबदारी- नरेंद्र मोदी
3 राज्यातील अंतिम टप्प्यातील प्रचारतोफा थंडावल्या; गुरुवारी मतदान
Just Now!
X