कशाहीप्रकारे उद्धट भाषेतून नरेंद्र मोदींवर टीका करत राहुल गांधींना बाजूला सारून प्रकाशझोतात येण्यात प्रियांका गांधी यशस्वी झाल्याची खोचक टीका भाजप नेते अरुण जेटली यांनी केली आहे.
अरुण जेटली म्हणाले की, नरेंद्र मोदींवर दररोज मुद्दाम टीका करून प्रियांका यांनी राहुल गांधींना बाजूला सारून प्रकाशझोतात येण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे. मोदींवर टीका करणे हा राजकीय डावपेच असला तरी, यातून प्रियांका यांनी राहुल यांचे महत्व कमी केल्याचा परिणाम त्यांना भोगावा लागणार आहे. राजकारणाचे यापेक्षाही अनेक पैलू आहेत यांची जाणीव प्रियांका यांना ठेवावी लागेल केवळ एकाच कुटुंबाभोवती देशाचे राजकारण आता फिरणार नाही. त्यामुळे मोदींवर प्रियांकांनी केलेली टीका त्यांनाच घातक ठरेल. असेही जेटली म्हणाले.
तसेच भाजप कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी केवळ विकास, नेतृत्व आणि देशाची आर्थिक स्थिरता याप्रश्नांकडेच लक्ष द्यावे इतरांनी केलेल्या टीकांवर बोलू किंवा लक्षच देऊ नये कारण, काँग्रेसने केलेल्या टीका आता त्यांनाच महागात पडणार आहेत. आपल्याला प्रत्युत्तर देण्याची गरजच आता राहिलेली नाही. असेही जेटली पक्षाचे कार्यकर्ते आणि नेत्यांना आपल्या लेखातून सांगतात.
राहुल गांधींना नरेंद्र मोदींच्या विरोधात अपेक्षित प्रतिक्रिया मिळत नसल्याचे जाणून केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी प्रियांका गांधींना आता जाणूनबूजून पुढे करण्यात येत आहे. परंतु, यातून काँग्रेसजनांमध्येच आपल्या नेत्याबद्दल गोंधळ निर्माण झाल्याचे अरुण जेटली म्हणाले.