महाराष्टात महायुतीने बाजी मारली असून ‘एक्झिट पोल’ने वर्तविलेल्या सर्वेक्षणाहून अधिक जागांवर महायुतीने कब्जा केला आहे. राज्यात मिळालेल्या अभुतपूर्व विजयामुळे महायुतीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे. यावेळी राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पूर्णपणे सुफडासाफ झाला असून काँग्रेसला केवळ नांदेड मतदार संघात अशोक चव्हाण आणि हिंगोली मतदार संघात राजीव सातव यांच्या रुपात केवळ दोन ठिकाणी विजय मिळाला आहे.
त्यामुळे मोदी लाटेचे त्सुनामीत रुपांतर झाल्याचे राज्यासह देशभर चित्र आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून छगन भुजबळ यांचा तब्बल पावणे दोन लाख मतांनी पराभव झाला असून शिवसेनेचे हेमंत गोडसे यांनी विजय साजरा केला आहे. रायगडमध्येही चुरशीची लढाई झाली. यामध्ये राष्ट्रावादीच्या सुनील तटकरेंना शिवसेनेच्या अनंत गीतेंकडून २ हजार मतांनी मात मिळाली आहे. सोलापूरातही सुशीलकुमार शिदेंना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. अशाप्रकारे राज्याता आघाडीेचे परिस्थिती दयनीय असताना दुसरीकडे राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला(मनसे) आपले खातेही उघडता आलेले नाही.
तसेच नंदुरबारमधील यावेळीच्या ऐतिहासिक लढाईत, काँग्रेसकडून तब्बल नऊ वेळा निवडून आलेले माणिकराव गावित यांचा पराभव झाला असून देशातील सर्वात तरुण लोकसभा उमेदवार ठरलेल्या भाजपच्या हिना गावित यांनी लाखभर मतांनी विजय मिळविला आहे. त्यामुळे माणिकराव गावितांचा सलग दहा वेळा लोकसभेवर निवडणूक जाण्याचा विक्रम हुकला असला तरी, सर्वात तरुण उमेदवार लोकसभेवर निवडणूक जाण्याचा विक्रम हिना गावित यांच्या माध्यमातून रचला गेला आहे. 

विजयी उमेदवार-
* सातारा- राष्ट्रवादीचे उद्यनराजे भोसले ३ लाख ६६ हजार मतांनी विजयी
*
रायगड- शिवसेनेचे अनंत गिते विजयी; सुनील तटकरेंचा २ हजार मतांनी पराभव
* नाशिक- छगन भुजबळ यांचा पावणेदोन लाख मतांनी पराभव; शिवसेनेचे हेमंत गोडसे विजयी तसेच विशेष म्हणजे मनसेचे उमेदवार डॉ.प्रदीप पवार यांची अनामत रक्कम जप्त
* जळगाव- भाजपचे एटी.नाना. पाटील ३ लाख मतांनी विजयी
* पुणे- भाजपचे अनिल शिरोळे दीड लाख मतांनी विजयी
*
वर्धा- भाजपचे रामदास तडस दीड लाख मतांनी विजयी; काँग्रेसच्या सागर मेघेंचा पराभव
* दिंडोरी- भाजपचे हरिचंद्र चव्हाण विजयी; राष्ट्रावादीच्या भारती पवारांचा केला पराभव
* उस्मानाबाद- शिवसेनेचे रवी गायकवाड लाखभर मतांनी विजयी
* रावेर- भाजपच्या रक्षा खडसे लाखभर मतांनी विजयी
* जालना- भाजपचे रावसाहेब दानवे दीड लाख मतांनी विजयी
* नागपूर- भाजपचे नितीन गडकरी दोन लाख मतांनी विजयी
* लातूर – भाजपचे सुनील गायकवाड दीड लाख मतांनी विजयी
* शिरुर- शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील विजयी
* सोलापूर- भाजपचे शरद बनसोडे विजयी; काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेचा पराभव
* भंडारा-गोदीयात भाजपचे नाना पटोले विजयी झाले असून प्रफुल्ल पटेलांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
* शिरुर- शिवसेनेचे श्रीरंग बारणे दीड लाख मतांनी विजयी
* गडचिरोली-चिमूर- भाजपचे अशोक नेते विजयी
* चंद्रपूर- भाजपचे हंसराज अहिर विजयी; काँग्रेसच्या संजय देवतळेंचा पराभव
* अहमदनगर- भाजपचे दिलीप गांधी विजयी; राष्ट्रवादीच्या राजीव राळचेंचा पराभव
* हिंगोली- काँग्रेसचे राजीव सातव विजयी; शिवसेनेच्या सुभाष वानखेडेंचा पराभव
* बारामती- राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे विजयी
* रामटेक- भाजपचे कृपाल तुमाणे विजयी
* नंदुरबार- भाजपच्या हिना गावित लाखभर मतांनी विजयी; काँग्रेसचे माणिकराव गावित पराभूत
* बीड- भाजपचे गोपीनाथ मुंडे विजयी
* सांगली- भाजपचे संजय काका पाटील २,२९,२९२ मतांनी विजयी; काँग्रेसचे प्रतिक पाटील पराभूत
* माढा- विजयसिंह मोहीते पाटील विजयी
* हातकणंगले- राजू शेट्टी विजयी; रघुनाथ दादा पाटील आणि कल्लाप्पाण्णा आवाडेंचा पराभव

 

आतापर्यंत आलेल्या निकालांनुसार पक्षीय बलाबल-
महायुती: भाजप- २३ , शिवसेना- १८
आघाडी: काँग्रेस- २ , राष्ट्रवादी- ४