लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज, शनिवारी अखेरचा दिवस आहे. या पाश्र्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी शुक्रवारी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्जासोबत जोडलेल्या मालमत्ता माहितीच्या रकान्यात बहुतेक उमेदवारांनी आपण करोडपती असल्याचे म्हटले आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री व नाशिक लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार छगन भुजबळ यांच्या संपत्तीत तर गेल्या पाच वर्षांत तिप्पट वाढ झाली. त्यांच्यापेक्षा त्यांच्या धर्मपत्नीच सर्वात श्रीमंत असल्याचे भुजबळांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत छगन भुजबळ यांच्या नावे  तीन कोटी ६६ लाख तर त्यांच्या पत्नीकडे चार कोटी आठ लाख रुपये मालमत्ता होती. पाच वर्षांत मालमत्तेची एकूण आकडेवारी २१ कोटी ७५ लाख रुपयांच्या घरात गेली आहे. भुजबळांच्या पत्नीच्या नावे ११ कोटींची तर भुजबळांकडे आठ कोटींची मालमत्ता आहे.

एकनाथ गायकवाड
(काँग्रेस, दक्षिण-मध्य मुंबई)
*एक कोटी ३२ लाखांची स्थावर संपत्ती
* ५० लाखांची जंगम मालमत्ता
*८२ लाखांची जमीन मालकीची
*पत्नीच्या नावावारील घर व दुकान यांची किंमत एक कोटी रुपये  
*कर्ज नाही

मीरा संन्याल
(आप, दक्षिण  मुंबई)
*जंगम मालमत्ता :  २६ कोटी ९९ लाख
*शेअर्स/ बाँड्स : १९ कोटी
*दागिने : ३ कोटी ९२ लाख
*सार्वजनिक भविष्यनिर्वाह निधी : ४ कोटी २६ लाख
*कर्ज : १ कोटी ३८ लाख ५० हजार रुपये.

किरीट सोमय्या
(भाजप, ईशान्य मुंबई)
*एकूण मालमत्ता : सात कोटी २१ लाख रुपये
*जंगम मालमत्ता : तीन कोटी दहा लाख रुपये
*मुलुंडमधील सदनिकेची किंमत ७५ लाख रुपये
*शेव्हर्ले आणि होंडा सिटी गाडी
*कर्ज : २८ लाख रुपये

आनंद परांजपे
(राष्ट्रवादी, कल्याण)
*एकूण जंगम मालमत्ता : १ कोटी ३ लाख
*पत्नीची जंगम मालमत्ता- १ कोटी १४ लाख
*एकूण स्थावर मालमत्ता :  ९१ लाख १८ हजार ८००
*पत्नीची स्थावर मालमत्ता- ३९ लाख ७८ हजार ८००

विजय पांढरे
(आप, नाशिक)
*एकूण संपत्ती
  दीड कोटींची
*१५० ग्रॅम सोने, मारुती ओम्नी
*जंगम मालमत्ता ५७ लाखांची
*बुलडाणा जिल्ह्य़ात नऊ एकर शेती व बंगला

मिलिंद देवरा
 (काँग्रेस, दक्षिण मुंबई)
*जंगम मालमत्ता : २७ कोटी ६६ लाख रुपये
*रोख : १ लाख
    ९२ हजार ५९८
*बँकेतील ठेवी : ६२ लाख
    १८ हजार
*बाँड्स/ शेअर्स : ४४ लाख
*इतरांना दिलेले कर्ज:  
    २५  कोटी ७७ लाख

राजन विचारे
(शिवसेना, ठाणे)
*एकूण स्थावर मालमत्ता : ४ कोटी ७६ लाख
*पत्नीची स्थावर मालमत्ता :  ३ कोटी ३९ लाख
*एकूण कर्ज : १ कोटी, ७ लाख ९३
*वाहन : फोर्ड एन्डेव्हेयर
*पत्नीचे वाहन :  फॉच्र्युनर

बाळा नांदगावकर
(मनसे,  दक्षिण मुंबई)
*जंगम मालमत्ता –  १ कोटी, ३३ लाख,
*रोख रुपये ९६ हजार
*शेअर्स  ६५ लाख ८१ हजार
*स्थावर मालमत्ता – एकूण ४ कोटी ७ लाख

८९,४७९
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यासाठी १० एप्रिल रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी सज्ज असलेल्या मतदान केंद्रांची ही संख्या. विदर्भातील १० मतदारसंघांसाठी हे मतदान होत असून, एक कोटी २१ लाख ७५ हजार ६६२ मतदार या वेळी आपला हक्क बजावणार आहेत.