नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघात ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा प्रकारची घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. याला काँग्रेसने तीव्र आक्षेप घेतला असून, या घोषणेविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली
आहे.
वाराणसीमध्ये मोदी यांच्या सभेत व्यासपीठावर भगवान शंकराचे छायाचित्र लावण्यात आले होते. अशा प्रकारचे छायाचित्र लावणे हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. कोणताही माणूस देवाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारची घोषणाबाजी मोदींसाठी करणे अयोग्य आहे, असे काँग्रेसच्या विधी विभागाचे के. सी. मित्तल यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 28th Mar 2014 रोजी प्रकाशित
‘हर हर मोदी’ला काँग्रेसचा विरोध
नरेंद्र मोदी निवडणूक लढवत असलेल्या वाराणसी मतदारसंघात ‘हर हर मोदी, घर घर मोदी’ अशा प्रकारची घोषणाबाजी भाजप कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

First published on: 28-03-2014 at 03:45 IST
TOPICSकाँग्रेसCongressभारतीय जनता पार्टीBJPलोकसभाLoksabhaलोकसभा निवडणूक निकाल २०२४ (Lok Sabha Election Result 2024)Lok Sabha Election
मराठीतील सर्व लोकसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress moves ec against bjps har har modi slogan