लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी या वेळी मोठय़ा प्रमाणावर म्हणजे सुमारे सात लाख अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत.  निवडणूक प्रक्रियेच्या पूर्ण कालावधीसाठी नेमणुका करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना त्यांचे मूळ वेतन व ग्रेड वेतनाच्या आधारावर १५ हजार ते ६० हजार रुपयांपर्यंत मानधन मिळणार आहे, तर काही विशिष्ट कामासाठी नेमणुका करण्यात आलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन व आहार भत्त्यातही घसघशीत वाढ करण्यात आली आहे.
 मुंबईत एक लाख मनुष्यबळ निवडणूक कामात गुंतले आहे. त्यात सुमारे २५ हजार अधिकाऱ्यांचा व ७५ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर पडणारा ताण, कामाची व्याप्ती व कामाचे दिवस लक्षात घेऊन राज्य, जिल्हा व तहसील स्तरावरील राजपत्रित अधिकाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार लागू असलेले मूळ वेतन अधिक ग्रेड वेतन एवढी रक्कम मानधन म्हणून देण्याचा राज्य शासनाने निर्णय घेतला आहे.
त्याचबरोबर मतदान, मतमोजणी वा इतर प्रासंगिक कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या निवडणूक भत्त्यातही चांगली वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ही निवडणूक म्हणजे अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी लाभदायक ठरणार आहे. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही याच दराने मानधन व निवडणूक भत्ता मिळणार आहे.

निवडणूक कामावरील अधिकारी-कर्मचारी
– पहिला टप्पा- १,४३, ८८०
– दुसरा टप्पा- २,७६,५९२
– तिसरा टप्पा- २,६२,७२४
– एकूण      – ६,८३,१९६

Lok Sabha polls West Bengal elections
ममतादीदी आणि भाजपा आमनेसामने; एनआयएवरील हल्ल्याचं नेमकं प्रकरण काय?
bjp royal family members ticket
Video: ‘घराणेशाही’वरून विरोधकांवर टीका करणाऱ्या भाजपाकडून राजघराण्यांतील १० सदस्यांना लोकसभेची उमेदवारी
pimpri chinchwad cp vinay kumar choubey marathi news
पिंपरीत ‘चौबे पॅटर्न’, पोलीस आयुक्तांनी ३९ आरोपींवर लावला मोक्का; आतापर्यंत एकूण ३९६ आरोपींवर कारवाई
mahayuti and maha vikas aghadi face problem with alliance partner over seat sharing issue
विश्लेषण : राज्यात दोन्ही आघाड्यांची कोंडी का होत्येय? विधानसभेच्या गणितांमुळे लोकसभेच्या जागावाटपात अडचण? 

राजपत्रित अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या मानधनाचा तपशील
* ब वर्ग अधिकारी- मूळ वेतन-९३००-३४८०० (ग्रेड वेतन-४४००)
* अ वर्ग अधिकारी- मूळ वेतन-१५६००-३९१००(ग्रेड वेतन-७६००)
* आयएएस अधिकारी- मूळ वेतन-३७४००-६७०००(ग्रेड वेतन-८७००)
 अधिकारी-कर्मचाऱ्यांना मिळणारा निवडणूक भत्ता
* क्षेत्रीय अधिकारी-दंडाधिकारी- १५०० रुपये (एकत्रित एकदा)
* मतदान केंद्राध्यक्ष- मतमोजणी पर्यवेक्षक-३५० रुपये(प्रतिदिन)
* मतदान अधिकारी-मतमोजणी साहाय्यक-२५० (प्रतिदिन)
*  चतुर्थ श्रेणी कर्मचारी- १५० रुपये (प्रतिदिन)
* आहार भत्ता- १५० रुपये (प्रतिदिन)