scorecardresearch

‘टोलमुक्ती’साठी मुंडेंनी विचार केलाच असेल -गडकरी

भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे जाहीर करणाऱ्या गोपीनाथरावांनी त्या संदर्भात नक्कीच विचार केला असेल.

‘टोलमुक्ती’साठी मुंडेंनी विचार केलाच असेल -गडकरी

भाजप-शिवसेना-रिपाइं महायुती सत्तेवर आल्यानंतर टोलमुक्त महाराष्ट्र करण्याचे जाहीर करणाऱ्या गोपीनाथरावांनी त्या संदर्भात नक्कीच विचार केला असेल. योग्य वेळी ते याविषयीची माहिती देतील, असे सांगत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी गोपनाथ मुंडे यांच्या कोर्टात चेंडू ढकलला. टोलसंदर्भात गोपीनाथराव आणि मी, आमच्या दोघांच्याही भूमिका बरोबर असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत प्रसारमाध्यमेच आमच्यामध्ये वितुष्ट असल्याच्या बातम्या दाखवितात, असा दावा केला.
आता टोल आकारणीचा अतिरेकच झाला आहे, असेही ते म्हणाले. टोलचे पितृत्व माझ्याकडेच जाते. ठाणे-भिवंडी हा बायपास करताना लागू करण्यात आलेला टोल ही मजबुरी होती, असे सांगून गडकरी म्हणाले, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग पूर्ण झाल्यानंतर टोल आकारणीमुळे त्याची किंमत वसूल झाली. खासगी गुंतवणूक आली नसती, तर मुंबईमध्ये ५५ उड्डाणपूल झालेच नसते, असेही त्यांनी सांगितले.

‘आप’ची लाट ओसरलीय
‘आप’चा प्रभाव तात्पुरता होता. ही लाट आता ओसरत चाललीय़  लोकसभा निवडणुकीत आपचा प्रभाव जाणवणार नाही, असे गडकरी यांनी सांगितल़े

मराठीतील सर्व लोकसभा ( Loksabha ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-03-2014 at 04:54 IST

संबंधित बातम्या