पाच वर्षे कार्यकर्त्यांनी तनमनधनांनी राबायचे, निवडणुकीत उमेदवारी मात्र तिसऱ्याच कुणाला तरी द्यायची. कुणी बिल्डर, कोचिंग क्लासवाला, किंवा दुसऱ्या प्रस्थापित पक्षांतील नाराज वा बंडखोरांना पायघडय़ा टाकायच्या. बहुजन समाज पक्षाच्या आतापर्यंतच्या या परंपरेला साजेशी लोकसभा निवडणुकीसाठी सात उमेदवारांची पाहिली यादी जाहीर करण्यात आली. बसपने ईशान्य मुंबईतील उमेदवारी चाटे क्लासवाले मच्छिंद्र चाटे यांच्या गळ्यात घातली आहे.
बसपचे महाराष्ट्राचे प्रभारी खासदार वीरसिंग व प्रदेशाध्यक्ष विलास गरुड यांनी गुरुवारी लोकसभा निवडणुकीतील सात उमेदवारांची यादी जाहीर केली. महाराष्ट्रातील सर्व ४८ जागा बसप लढणार आहे. पुढचे उमेदवार लवकरच जाहीर केले जातील, अशी माहिती गरुड यांनी दिली. गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या यादीत पक्षाचे कधीपासूनचे कार्यकर्ते आहेत, असे विचारले असता, काही दोन वर्षांपासूनचे आहेत, काही सहा महिन्यांपूर्वी सदस्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बसपचे उमेदवार
* मच्छिंद्र चाटे (ईशान्य मुंबई)
* पुष्पा भोळे (उत्तर-पश्चिम मुंबई)
* अ‍ॅड. गणेश अय्यर (दक्षिण-मध्य मुंबई)
* अशोक सिंग (उत्तर मुंबई)
* दीपक कांबळे (लातूर)
* हबीब शेख (नांदेड)
* दिनकर पाटील (नाशिक)

Web Title: Lok sabha elections 2014 bsp first list of candidates declared
First published on: 07-03-2014 at 03:32 IST